Farhan-Shibani Wedding | नव्या वर्षात फरहान अख्तर-शिबानी दांडेकर अडकणार लग्नबंधनात, विवाह सोहळ्याचे ठिकाणही ठरले!
बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (farhan Akhtar) आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते इंडस्ट्रीतील सर्वात चार्मिंग आणि क्युट कपल मानले जाते. दोघेही नेहमी मोकळेपणाने आपलं प्रेम व्यक्त करतात आणि सोशल मीडियावर दोघांची फॅन फॉलोइंगही अफलातून आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (farhan Akhtar) आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते इंडस्ट्रीतील सर्वात चार्मिंग आणि क्युट कपल मानले जाते. दोघेही नेहमी मोकळेपणाने आपलं प्रेम व्यक्त करतात आणि सोशल मीडियावर दोघांची फॅन फॉलोइंगही अफलातून आहे. अनेक दिवसांपासून दोघांचे चाहते या जोडप्याने लग्न करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. आता लवकरच दोघेही त्यांच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करणार आहेत.
View this post on Instagram
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानीने मार्च 2022 मध्ये मुंबईत आलिशान लग्नाची योजना आखली होती. मात्र, आता हे जोडपे या लग्नाचे आयोजन खूपच कमी प्रमाणात आणि जवळच्या मित्रांसोबत करणार आहे. कारण, कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. याशिवाय मुंबईत असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे अलीकडेच कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत.
जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार
रिपोर्टमध्ये एका जवळच्या सूत्राने सांगितले की, आता फक्त फरहान आणि शिबानीचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र या लग्नात सहभागी होणार आहेत. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत राहत आहेत आणि कोरोनामुळे त्यांच्या लग्नाला खूप उशीर झाला आहे. आता दोघांनाही हे लग्न आणखी पुढे ढकलायचे नाही.
लग्नाचे ठिकाण कुठे?
मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे ठिकाण म्हणून एक 5 स्टार हॉटेल बुक केले आहे आणि जवळपास सर्व काही फायनल झाले आहे. फरहान आणि शिबानी यांनीही विकी कौशल आणि कतरिना कैफ प्रमाणेच डिझायनर सब्यसाचीचे कपडे परिधान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या कपड्यांचा रंग हलका पण आकर्षक असणार आहे. गेल्या 3 वर्षांपासून हे जोडपे एकमेकांसोबत नात्यात आहे. शिबानी दांडेकरने फरहानच्या नावाचा टॅटू देखील काढला आहे. दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे रोमँटिक क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. या जोडीचे फोटो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात.
हेही वाचा :
स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!
जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!
Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?