Video | चक्क फराह खान हिने उडवली करण जोहर याच्या कपड्यांची खिल्ली, रस्त्यावरच म्हणाली…

फराह खान हिने काही दिवसांपूर्वीच बिग बाॅस 16 मधील स्पर्धेकांसाठी एका खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये बिग बाॅस 16 तील सर्व सदस्य आणि काही बाॅलिवूड स्टार देखील उपस्थित होते. या पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Video | चक्क फराह खान हिने उडवली करण जोहर याच्या कपड्यांची खिल्ली, रस्त्यावरच म्हणाली...
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 3:29 PM

मुंबई : फराह खान हिचा भाऊ साजिद खान हा बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) मध्ये दाखल झाल्यानंतर मोठा हंगामा झाला. त्यानंतर बिग बाॅस 16 मध्ये फॅमिली विकमध्ये फराह खान ही थेट बिग बाॅस 16 मध्ये पोहचली होती. बिग बाॅस 16 चा फिनाले होऊन आता बरेच दिवस उलटले आहेत. बिग बाॅस 16 च्या घरातील सर्व सदस्यांसाठी फराह खान (Farah Khan) हिने खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सर्वजण धमाल करताना दिसले. या पार्टीत फक्त बिग बाॅस 16 मधील सदस्यच नाहीतर अनेक बाॅलिवूड (Bollywood) स्टार देखील उपस्थित होते. या पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

करण जोहर हा देखील कायमच चर्चेत असतो. नुकताच फराह खान हिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फराह खान आणि करण जोहर हे दिसत आहे. सर्वांनाच माहिती आहे की, फराह खान आणि करण जोहर हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. इतकेच नाहीतर यांनी अनेकदा सोबत कामही केले आहे.

फराह खान हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांचा मजाक उडवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे फराह खान आणि करण जोहर यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडलाय. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना चाहते हे दिसत आहेत. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, करण जोहर आणि फराह खान हे लॉस एंजिल्सच्या रोडवर एकमेकांना भेटतात. यावेळी फराह खान ही करण जोहर याला विचारते की, तू इथे काय करत आहे? ज्यावर करण जोहर म्हणतो की, फराहला बेव्हरली हिल्समध्ये पाहून धक्का बसला. यानंतर करण जोहर याच्या फॅशन सेन्सची खिल्ली उडवताना फराह खान दिसते.

फराह खान ही करण जोहर याला म्हणते की, ख्रिसमसला खूप वेळ आहे आणि त्याला विचारते की, तू हिरव्या ड्रेसमध्ये का? परत फराह म्हणते संपूर्ण ख्रिसमस ट्री येथे आहे….करण जोहर मग तिची बॅग घेतो आणि म्हणतो की बीचवर जायला खूपच उशीर झाला आहे…दोघेही एकमेकांच्या फॅशन सेन्सची खिल्ली उडवताना दिसले. शेवटी करण जोहर हा थेट फराह खान हिला टूडल्स असे म्हणतो…मग फराह खान ही करण जोहर याला नूडल्स म्हणते आणि तिथून निघून जाते. आता हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.