फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाला एकही अवॉर्ड न मिळाल्याने अनुपम खेर यांनी बाॅलिवूडला दाखवला आरसा, म्हणाले…
द कश्मीर फाईल्स हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 हा पार पडलाय. या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये द कश्मीर फाईल्स चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात एकही अवॉर्ड हा द कश्मीर फाईल्स चित्रपटाला मिळाला नाहीये.
मुंबई : 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सबद्दल (Filmfare Awards 2023) चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता सुरूवातीपासूनच बघायला मिळत होती. विशेष म्हणजे बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान याने या फिल्मफेअर अवॉर्ड्सला (Filmfare Awards) होस्ट केले आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्सचे नामांकन सर्वात अगोदर जाहीर करण्यात आले होते. मात्र, 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सवर विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी बहिष्कार घातला. या संदर्भातील एक पोस्ट विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर शेअर केली. मुंबईतील जियो गार्डनमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 पार पडला.
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांना सन्मानित केले गेले. या 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये द कश्मीर फाईल्स आणि गंगूबाई काठियावाडीचा जलवा बघायला मिळेल असा सर्वांचा अंदाजा होता.
प्रत्यक्षात फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये द कश्मीर फाईल्स या चित्रपटाला एकही अवॉर्ड्स मिळाला नाही. या द कश्मीर फाईल्स चित्रपटाला चाहत्यांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केला. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ सुरूवातीपासूनच बघायला मिळत होती. फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये द कश्मीर फाईल्स चित्रपट मैदान मारेल असा अंदाज होता.
फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये द कश्मीर फाईल्स चित्रपटाला एकही अवॉर्ड्स मिळाला नाही. यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. आता यावर अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिलीये. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, आदर ही एक खूप मोठी भेट आहे, स्वस्त लोकांकडून त्याची अपेक्षा करू नका…आता अनुपम खेर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
#TheKashmirFiles pic.twitter.com/npPHwLkLHG
— Anupam Kher (@AnupamPKher) April 28, 2023
फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये द कश्मीर फाईल्स चित्रपटाला एकही अवॉर्ड्स मिळाला नसल्याने अनुपम खेर यांनी अखेर आपली नाराजी जाहिर केलीये. चाहते आता अनुपम खेर यांच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 हा पैसे देऊन खरेदी केले जात असल्याचा आरोप केला. दुसऱ्याने लिहिले की, बाॅलिवूड चित्रपटावर चाहते ज्याप्रमाणे बहिष्कार टाकत आहेत, त्याचप्रमाणे यांच्या फिल्मफेअर अवॉर्ड्सवरही बहिष्कार टाका.
विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अगोदरच फिल्मफेअर अवॉर्ड्सवर बहिष्कार टाकत असल्याचे जाहिर केले. मात्र, द कश्मीर फाईल्स चित्रपटाला एकही फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळावा नसल्याचे चाहत्यांमध्येही नाराजी बघायला मिळत आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्सवर 2023 मध्ये आलिया भट्ट हिच्या चित्रपटाचा जलवा बघायला मिळाला. सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड्स हे गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला मिळाले आहेत.