Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Filmfare awards 2023 | जाणून घ्या कधी आणि कुठे पार पडतोय फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023

Filmfare awards 2023 Date and Time : फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 ची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. या फिल्मफेअर अवॉर्ड्स बद्दल सर्वांमध्ये कमालीची आतुरता बघायला मिळत आहे. बाॅलिवूड कलाकारांचा जलवा या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये दिसणार आहे. मस्तीचा

Filmfare awards 2023 | जाणून घ्या कधी आणि कुठे पार पडतोय फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 1:55 PM

मुंबई : फिल्मफेअर अवॉर्ड्स म्हटले की, कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांमध्येच उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 (Filmfare awards 2023) चा जलवा लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आपल्या सर्वांचा आवडता स्टार अर्थात सलमान खान हा फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 ला होस्ट करताना दिसणार आहे. हा 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स आहे. चाहते देखील फिल्मफेअर अवॉर्ड्सची आतुरतेने वाट पाहताना दिसतात. 27 एप्रिल रोजी 68 व्या फिल्मफेअरचा जंगी असा कार्यक्रम पार पडतोय. या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बाॅलिवूडमधील दिग्गज कलाकार (Artist) दरवेळी उपस्थित राहतात. फक्त उपस्थितच नाही तर यांच्या डान्सचे जलवे देखील प्रेक्षकांना बघायला मिळतात.

फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 चे आयोजन हे मुंबईतील बांद्रा परिसराती रिलायंस जियो गार्डनमध्ये करण्यात आले आहे. या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 ची जंगी तयारीही सुरू करण्यात आलीये. या फिल्मफेअर अवॉर्ड्सची नॉमिनेशन लिस्ट देखील पुढे आलीये. मनोरंजनाचा जबरदस्त असा तडका प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चाहते देखील 27 एप्रिल 2023 ची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.

कोणत्या बाॅलिवूड अभिनेत्याला फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळतो, याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. बेस्ट चित्रपटांच्या यादीमध्ये बधाई दो, भूल भुलैया 2, द कश्मीर फाइल्स, ऊंचाई, गंगूबाई काठियावाडी, ब्रह्मास्त्र हे चित्रपट नॉमिनेशनमध्ये आहेत. आता यापैकी कोणता चित्रपट बाजी मारतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

बेस्ट डायरेक्टर यादीमध्ये अनीस बज्मी भूल भुलैया 2, सूरज आर. बड़जात्या ऊंचाई, अयान मुखर्जी ब्रह्मास्त्र, विवेक रंजन अग्निहोत्री द कश्मीर फाइल्स, संजय लीला भन्साळी गंगूबाई काठियावाडी, हर्षवर्धन कुलकर्णी बधाई दो हे आहेत. आता यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या संपूर्ण फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये दोन ते तीन चित्रपटांचे वर्चस्व बघायला मिळत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या चित्रपटाचा देखील जलवा या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये दिसणार असल्याचे स्पष्ट आहे.

फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये अनेक बाॅलिवूड स्टारचे डान्स होणार आहेत. इतकेच नाही तर फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये धमाल ही बघायला मिळणार आहे. मुंबईतील बांद्रा परिसरात हा फिल्मफेअर अवॉर्ड्स पार पडणार आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये द कश्मीर फाइल्स आणि गंगूबाई काठियावाडी या चित्रपटांचा दबदबा बघायला मिळतोय. हे चित्रपट फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 गाजवणार असल्याची चर्चा आहे. हे दोन्ही चित्रपट सर्वाधिक अवॉर्ड्स आपल्या नावावर करतील, अशी एक चर्चा दबक्या आवाज सुरू आहे.

'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.