Filmfare awards 2023 Winners Live : सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट, गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील भूमिकेसाठी अवॉर्ड
Filmfare awards 2023 Live Updates : आज मुंबई येथे 68 वा फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 पार पडत आहे. या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बाॅलिवूडच्या कलाकारांचा जलवा हा बघायला मिळणार आहे. चाहत्यांमध्ये देखील या फिल्मफेअर अवॉर्ड्सबद्दल चांगलाच उत्साह हा बघायला मिळतोय.
मुंबई : 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 (Filmfare awards 2023 live) ला अगदी थोड्यावेळामध्ये सुरूवात होणार आहे. फक्त बाॅलिवूड स्टारचे नाही तर चाहत्यांमध्येही या फिल्मफेअर अवॉर्ड्सबद्दल मोठा उत्साह दिसतोय. या 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 ची सर्वात खास गोष्ट म्हणजे सलमान खान (Salman Khan) हा फिल्मफेअर अवॉर्ड्स होस्ट करताना दिसणार आहे. बाॅलिवूड स्टारचे जलवे हे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बघायला मिळणार आहेत. मुंबईच्या (Mumbai) बांद्रा येथील जियो गार्डनमध्ये हा 68 वा फिल्मफेअर अवॉर्ड्स पार पडणार आहे. या 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 ला बाॅलिवूडचे जवळपास सर्वच कलाकार हजेरी लावणार आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
Filmfare awards 2023 Live : सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फिल्मफेअर अवॉर्ड्स हा आलिया भट्ट हिला मिळाला आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी आलिया हिला हा अवॉर्ड्स मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Live : फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सनी लिओनीचे आगमन
सनी लिओनी हिने नुकताच फिल्मफेअर अवॉर्ड्सला हजेरी लावलीये. अत्यंत खास खास लूकमध्ये सनी लिओनी ही दिसत आहे.
-
-
Filmfare awards 2023 Winners Live : फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये अनिल कपूर याचा जलवा मिळाला हा अवॉर्ड्स
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स (पुरुष) मध्ये बाॅलिवूड अभिनेते अनिल कपूर यांना मिळाला आहे. अनिल कपूर यांना हा अवॉर्ड्स जुग जुग जियो चित्रपटासाठी मिळालाय.
Congratulations!
The Filmfare Award for Best Actor in a Supporting Role (Male) goes to #AnilKapoor for #JugJuggJeeyo at the 68th #HyundaiFilmfareAwards 2023 with #MaharashtraTourism. pic.twitter.com/XJMMgDG1AP
— Filmfare (@filmfare) April 27, 2023
-
Filmfare awards 2023 Winners Live : शीबा चड्ढा हिला मिळाला फिल्मफेअर अवॉर्ड्स
सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स महिलांमधून शीबा चड्ढा हिला मिळाला आहे. हा अवॉर्ड्स बधाई दो चित्रपटासाठी मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Winners Live : भूमी पेडणेकर हिला मिळाला हा अवॉर्ड
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) हा अवॉर्ड भूमी पेडणेकर हिला बधाई दो चित्रपटासाठी मिळाला आहे.
-
-
Filmfare awards 2023 Winners Live : फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये तब्बूचा जलवा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड्स (समीक्षक) हा तब्बू हिला मिळाला आहे. हा अवॉर्ड्स तब्बू हिला भूल भुलैया 2 या चित्रपटासाठी मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Live : सर्वोत्कृष्ट अभिनेता अवॉर्ड्स- संजय मिश्रा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स (समीक्षक) हा संजय मिश्रा याला वध चित्रपटाला मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Live : बेस्ट डायलाॅग उत्कर्षिणी वसिष्ठ आणि प्रकाश कापडिया
बेस्ट डायलाॅग उत्कर्षिणी वसिष्ठ आणि प्रकाश कापडिया यांना गंगूबाई काठियावाडीसाठी मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Live : सर्वोत्कृष्ट स्टोरीसाठी बधाई दो चित्रपटाची बाजी
सर्वोत्कृष्ट स्टोरीसाठी फिल्मफेअर पुरस्कार हा बधाई दो चित्रपटाला मिळाला आहे. अक्षत आणि सुमन अधिकारी यांना मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Live : आलिया भट्ट फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये दिसली जबरदस्त लूकमध्ये
बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही देखील फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सहभागी झालीये. काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये आलिया भट्ट हिचा लूक जबरदस्त दिसतोय.
-
Filmfare awards 2023 Live : नोरा फतेही फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये दाखल
बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिने देखील काही वेळापूर्वीच फिल्मफेअर अवॉर्ड्सला हजेरी लावलीये. अत्यंत बोल्ड लूकमध्ये नोरा फतेही ही पोहचलीये.
-
Filmfare awards 2023 Live : फिल्मफेअर अवॉर्ड्स जसपाल सिंग संधूचा जलवा
सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शकासाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स हा जसपाल सिंग संधू आणि राजीव यांना मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Live : अंकुश गेडाम झुंडसाठी अवॉर्ड
सर्वोत्कृष्ट डेब्यू (पुरुष) साठी फिल्मफेअर अवॉर्ड झुंडसाठी अंकुश गेडामला मिळाला आहे. झुंड चित्रपटामध्ये बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे मुख्य भूमिकेत होते.
-
Filmfare awards 2023 Live : प्रेम चोप्रा यांना फिल्मफेअर जीवनगाैरव अवॉर्ड्सने सन्मानित
खलनायक’ बनून तब्बल 60 वर्ष मनोरंजन करणारे अभिनेते प्रेम चोप्रा यांना फिल्मफेअर जीवनगाैरव अवॉर्ड्सने सन्मानित केले गेले.
-
Filmfare awards 2023 Live : फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये पूजा हेगडे हिचे आगमन
सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपट मुख्य भूमिकेत असलेली पूजा हेगडे ही देखील फिल्मफेअर अवॉर्ड्सला पोहचलीये.
-
Filmfare awards 2023 Live : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचा हजेरी
बिग बाॅस विजेती तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे देखील 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सला पोहचले आहेत.
-
Filmfare awards 2023 Live : आयुष्मान खुराना याने आगमन
बाॅलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचे देखील फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये नुकतास आगमन झाले आहे. काळ्या रंगाच्या सूटमध्ये आयुष्मान खुराना याचा लूक जबरदस्त असा दिसत आहे.
-
Filmfare awards 2023 Live : फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये संजय लीला भन्साळी यांचे आगमन
संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये धमाका करताना दिसत आहे. आता नुकताच संजय लीला भन्साळी यांचे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आगमन झाले आहे.
-
Filmfare awards 2023 Live : ब्रह्मास्त्र चित्रपटाला जलवा कायम
सर्वोत्कृष्ट संगीत अल्बमसाठी फिल्मफेअर अवॉर्ड हा ब्रह्मास्त्रसाठी प्रीतमला मिळाला आहे. फिल्मफेअर अवॉर्डमध्ये फक्त आणि फक्त ब्रह्मास्त्र चित्रपटाला जलवा हा बघायला मिळतोय.
-
Filmfare awards 2023 Live : अमिताभ भट्टाचार्य मिळाला सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी अवॉर्ड
सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी अमिताभ भट्टाचार्य मिळाला अवॉर्ड. ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या गाण्यासाठी हा अवॉर्ड मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Live : फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये कविता सेठ हिची बाजी
फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये कविता सेठ हिने देखील बाजी मारलीये. कविता सेठ हिला बेस्ट प्लॅबॅक सिंगरचा (महिला) अवॉर्ड मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Live : अरजीत सिंहला मिळाला फिल्मफेअर अवॉर्ड
फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये अरजीत सिंह याला बेस्ट प्लॅबॅक सिंगरचा अवॉर्ड मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Live : रवीना टंडन हिचे आगमन
बाॅलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिचे देखील आगमन फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये झाले आहे. पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये रवीना टंडन ही पोहचलीये.
-
Filmfare awards 2023 Live : काजोल हिचे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आगमन
बाॅलिवूड अभिनेत्री काजोल ही देखील नुकताच फिल्मफेअर अवॉर्ड्ससाठी पोहचलीये. जबरदस्त असा लूक काजोल हिचा दिसत आहे.
-
Filmfare awards 2023 Live : ब्रह्मास्त्र चित्रपटाला मिळाला थेट वीएफएक्स अवॉर्ड्स
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाला वीएफएक्स अवॉर्ड्स मिळाला आहे. या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये फक्त रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा जलवा बघायला मिळतोय.
-
Filmfare awards 2023 Live : गंगूबाई काठियावाडीला मिळाला अजून एक अवॉर्ड्स
आलिया भट्ट हिचा चित्रपट फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये धमाका करताना दिसत आहे. अजून एक फिल्मफेअर अवॉर्ड्स हा आलिया भट्ट हिच्या चित्रपटाला मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Live : परवेज शेखला बेस्ट अॅक्शन अवॉर्ड्स
बेस्ट अॅक्शन अवॉर्ड्स हा विक्रम वेधा चित्रपटासाठी परवेज शेखला मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Live : गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी सुदीप चॅटर्जीला मिळाला अवॉर्ड्स
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठी फिल्मफेअर पुरस्कार हा गंगूबाई काठियावाडीसाठी सुदीप चॅटर्जी यांना मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Live : निनाद खानोलकरला फिल्मफेअर अवॉर्ड्स
अॅक्शन हिरोसाठी चित्रपटासाठी निनाद खानोलकर देखील फिल्मफेअर अवॉर्ड्स हा मिळाला आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना हा मुख्य भूमिकेत होता.
-
Filmfare awards 2023 Live : कृती महेश नृत्यदिग्दर्शनासाठी अवॉर्ड्स
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी फिल्मफेअर अवॉर्ड्स हा गंगूबाई काठियावाडीच्या ढोलिडासाठी कृती महेशला मिळाला आहे.
-
Filmfare awards 2023 Live : गंगूबाई काठियावाडीचा बोलबाला
फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये गंगूबाई काठियावाडीचा बोलबाला दिसत आहे. आतापर्यंत अवॉर्ड्स या चित्रपटाच्या नावावर झाले आहे.
-
Filmfare awards 2023 Live : ब्रह्मास्त्र चित्रपटाने जिंकला फिल्मफेअर अवॉर्ड्स
अयान मुखर्जी याच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने फिल्मफेअर अवॉर्ड्स जिंकला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे मुख्य भूमिकेत होते.
-
Filmfare awards 2023 Live : राजकुमार राव याने केले मोठे भाष्य
राजकुमार राव हा देखील फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये पोहचलाय. शाहरुख आणि सैफ अली खान यांची फिल्मफेअर अवॉर्ड्स होस्ट करणारी बेस्ट होस्ट असल्याचे देखील राजकुमार राव याने म्हटले आहे.
-
Filmfare awards 2023 Live : अनु मलिक यांचे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आगमन
नुकताच अनु मलिक यांचे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आगमन झाले आहे. काळ्या रंगाच्या शर्टवर अनु मालिक हे पोहचले आहेत.
#AnuMalik arrives for the 68th #HyundaiFilmfareAwards2023 with #MaharashtraTourism. ♥️ pic.twitter.com/G5r2mTpEDS
— Filmfare (@filmfare) April 27, 2023
-
Filmfare awards 2023 Live : पद्मिनी कोल्हापुरे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये एन्ट्री
पद्मिनी कोल्हापुरेने नुकताच फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये एन्ट्री घेतलीये. फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सुंदर अशा काळ्या रंगाच्या लाॅन्ग गाऊनमध्ये पद्मिनी कोल्हापुरेने एन्ट्री घेतलीये.
-
Filmfare awards 2023 Live : अनिल कपूर यांचे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आगमन
बाॅलिवूड अभिनेते अनिल कपूर यांचे देखील फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आगमन झाले आहे. पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये अनिल कपूर हे पोहचले आहेत.
-
Filmfare awards 2023 Live | गोविंदाची फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये एन्ट्री
बाॅलिवूड अभिनेता गोविंदा देखील काही वेळेपूर्वीच फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये पोहचलाय. या वेळी गोविंदासोबत त्याची पत्नी देखील दिसत आहे.
-
Filmfare awards 2023 Live : अनुपम खेर यांचे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आगमन
फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचेही नुकताच आगमन झाले आहे. अनुपम खेर याचा चित्रपट द काश्मीर फाईल्स चित्रपटाचा फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये बोलबाला दिसत आहे.
-
Filmfare awards 2023 Live : टायगर श्रॉफची धमाकेदार एन्ट्री
बाॅलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा देखील फिल्मफेअर अवॉर्ड्सला पोहचलाय. गुलाबी रंगाच्या सूटमध्ये टायगरचा लूक जबरदस्त असा दिसत आहे.
-
Filmfare awards 2023 live : भूमिका चावला पोहचली फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये
अभिनेत्री भूमिका चावला हिने देखील फिल्मफेअर अवॉर्ड्सला हजेली लावलीये. भूमिका चावला ही सुंदर अशा लाल ड्रेसमध्ये पोहचलीये.
-
जान्हवी कपूर दिसली जबरदस्त लूकमध्ये
68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्ससाठी आता जान्हवी ही पोहचलीये. अत्यंत खास लूकमध्ये जान्हवी आलीये. विशेष म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये जान्हवी कपूर हिचा जबरदस्त असा डान्स देखील बघायला मिळणार आहे.
-
फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सलमान खान पोहचला
68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 साठी बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान हा पोहचलाय. काळ्या रंगाच्या खास शर्टमध्ये सलमान खान याचा लूक जबरदस्त असा दिसतोय.
-
गंगूबाई काठियावाडी नामांकनमध्ये सर्वात पुढे
संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ला यंदा सर्वाधिक 16 नामांकने मिळाली आहेत. त्यानंतर ‘बधाई दो चित्रपटाला, यान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाला 14 नामांकने मिळाली आहेत.
Published On - Apr 27,2023 7:43 PM