Filmfare Awards 2023 Winners List | फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाने मारली बाजी, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण विजेत्यांची यादी…
Filmfare awards 2023 Ceremony Highlights and Winners Updates : नुकताच मुंबईमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्स पार पडलाय. या फिल्मफेअर अवॉर्ड्सला बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड्स हा आलिया भट्ट हिला मिळाला आहे.
मुंबई : फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 (Filmfare Awards 2023) चे आयोजन मुंबईतील बांद्रा येथील जियो गार्डनमध्ये करण्यात आले. या 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सला बाॅलिवूडच्या जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये आलिया भट्ट हिच्या गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळाला. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटाने देखील फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये बाजी मारलीये. ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर हे मुख्य भूमिकेत होते. आज रात्री 9 वाजता हा फिल्मफेअर अवॉर्ड्स कॅलर्स टिव्हीवर बघायला मिळणार आहे. गोविंदाचा धमाकेदार असा डान्स देखील पार पडलाय.
फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 चे मैदान हे आलिया भट्ट हिच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाने मारले आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बाॅलिवूड चित्रपट ठरला आहे. बधाई दो चित्रपटाने देखील सर्वांना मोठा धक्का देत अनेक अवॉर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये ब्रह्मास्त्र चित्रपटाचा देखील जलवा बघायला मिळाला. जाणून घेऊयात कोणत्या चित्रपटाला कोणता फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाला आहे.
68 वा फिल्मफेअर पुरस्कार 2023 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा (Filmfare Awards 2023 Winners List)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – राजकुमार राव (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट चित्रपट – (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी)
फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023 – प्रेम चोप्रा
सर्वोत्कृष्ट संवाद – प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शीबा चड्ढा (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अनिल कपूर (जुग जुग जियो)
सर्वोत्कृष्ट पटकथा – अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
सर्वोत्कृष्ट कथा – अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी (बधाई दो)
Congratulations!
The Filmfare Award for Best Film goes to #GangubaiKathiawadi at the 68th #HyundaiFilmfareAwards 2023 with #MaharashtraTourism. pic.twitter.com/bpJKuXrCm5
— Filmfare (@filmfare) April 27, 2023
आलिया भट्ट हिच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड्स जिंकून बाजी मारली आहे. फक्त आलिया भट्ट हिला नाही तर चित्रपटाला देखील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड्स मिळाला आहे. विवेक अग्नीहोत्री यांनी या फिल्मफेअर अवॉर्ड्सवर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये द कश्मीर फाईल्स चित्रपटाला एकही अवॉर्ड्स न मिळाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण झाले आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वाधिक अवॉर्ड्स आपल्या नावावर करत एक इतिहास निर्माण केलाय. सोशल मीडियावर चाहते हे फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाल्याबद्दल आलिया भट्ट हिचे अभिनंदन करताना दिसत आहेत.