Heropanti 2 : रशियामध्ये हीरोपंती 2’चं चित्रिकरण, मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये अ‍ॅक्शन सीन चित्रित होणार

चित्रपटाचं दुसरं शुटिंग शेड्यूल रशियात पार पडणार आहे. टाइगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत ही टीम पुढच्या महिन्यात मॉस्कोमध्ये आणि त्यानंतर रशियात सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रीकरण करणार आहे. (Filming of Heropanti 2 in Russia, action scenes to be filmed in Moscow and St. Petersburg)

Heropanti 2 : रशियामध्ये हीरोपंती 2'चं चित्रिकरण, मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये अ‍ॅक्शन सीन चित्रित होणार
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 3:24 PM

मुंबई : अहमद खान दिग्दर्शित साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala) यांचा आगामी चित्रपट ‘हीरोपंती 2’ (Heropanti 2) च्या टीमनं मार्च महिन्यात मुंबईमध्ये एक छोटी शुटींग शेड्यूल पूर्ण केली यानंतर आता संपूर्ण टीमनं आपला मोर्चा रशियाकडे वळवला आहे. त्यामुळे आता चित्रपटाचं दुसरं शुटिंग शेड्यूल रशियात पार पडणार आहे. टाइगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत ही टीम पुढच्या महिन्यात मॉस्कोमध्ये आणि त्यानंतर रशियात सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रीकरण करणार आहे.

टीम मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये शूटिंग

हीरोपंती 2 शी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘टीम मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रपटातील प्रमुख अ‍ॅक्शन दृश्य आणि एका गाण्याचं चित्रीकरण करण्याची योजना बनवत असून तिथल्या स्थानिक टीमसोबत मिळून परफेक्ट लोकेशनचा शोध घेत आहे. शिवाय चित्रपटातील लार्जर दॅन लाइफ एक्शन दृशांना चित्रित करण्यासाठी अनेक स्टंट डिजाइनर्ससोबत बोलणं सुरु आहे ज्यामध्ये एक नाव सुप्रसिद्ध मार्टिन इवानो यांचे आहे, जे स्कायफॉल (2012), द बॉर्न अल्टीमेटम (2007) आणि द बॉर्न सुप्रमसी (2004) साठी ओळखले जातात.’

शूटिंगपूर्वी लसीकरणावर जोर

सूत्रांनी या पुढे सांगितले की, ‘रशियात जाण्याआधी सर्व क्रू मेंबर्स, कलाकार अर्थात संपूर्ण टीमचं लसीकरण पूर्ण करण्याकडे साजिद नाडियाडवाला हे काटेकोरपणे लक्ष देत आहेत.’

हीरोपंती 2 मध्ये देखील पाहायला मिळणार चमकदार आणि स्टाइलिश एक्शनचा जलवा

हीरोपंती या चित्रपटाद्वारे नाडियाडवाला यांनी टाइगर श्रॉफला धुव्वादार एक्शनसोबत जगासमोर आणलं होतं. नुकतंच या चित्रपटानं आता 7 वर्ष पूर्ण केले आहेत. याच चित्रपटातून कृती सॅनॉननं बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात कृतीसोबत टायगर श्रॉफ होता. कृती सॅनॉन आणि टायगरचा हा पहिलाच चित्रपट होता. या पहिल्याच चित्रपटावरून दोघांनी सिद्ध केलं होतं की ते मोठ्या पडद्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी तयार झाले आहेत. या चित्रपटात टायगर आणि कृतीची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. आता  हीरोपंती 2 मध्ये देखील चमकदार आणि स्टाइलिश एक्शनचा जलवा पहायला मिळणार हे नक्की.

संबंधित बातम्या

Rhea Chakraborty : ‘द टाइम्स’कडून मोस्ट डिझायरेबल वुमनची यादी जाहीर, रिया चक्रवर्ती अव्वल स्थानी

Photo : अंशुला कपूर हिंदुजा रुग्णालयात दाखल, भेटीला पोहोचले जान्हवी आणि बोनी कपूर

Video : जुन्नरमधील श्वेता शिंदेचा धमाकेदार डान्स पाहिलात?, ‘ड्रीमम वेकपम’गाण्यावर धरला ठेका

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.