Karan Johar | शेवटी करण जोहर याला आपली चुक कळाली, बाॅलिवूड चित्रपट फ्लाॅप जाण्यास मी…
बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जाण्याची अनेक कारणे ही सांगितली जात आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप होत आहेत. बाॅलिवूड चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये. मात्र, साऊथचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करताना दिसत आहेत. बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जाण्याची अनेक कारणे ही सांगितली जात आहेत. बाॅलिवूडचे जास्त चित्रपट हे साऊथचे रिमेक असल्याने देखील याचा फटका चित्रपटांना बसत आहे. अगोदरच साऊथच्या चित्रपटांची स्टोरी प्रेक्षकांपर्यंत पोहचलेली असते. इतकेच नाही तर चित्रपटांमध्ये नव्या कलाकारांना संधी देण्यापेक्षा स्टार किड्सलाच लाॅन्च करण्यावर बाॅलिवूडचा भर आहे.
बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात असतानाच आता करण जोहर याने मोठे विधान केले असून करण जोहर म्हणाला की, बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जाण्यास कुठेतरी मिच कारणीभूत आहे.
कारण गेल्या काही दिवसांपासून आम्ही फक्त रिमेक चित्रपटांवर अधिक भर दिलाय. एखादा चित्रपट साऊथमध्ये हीट असेल पण तो बाॅलिवूडच्या प्रेक्षकांना आवडेलच असे अजिबात होत नाही.
View this post on Instagram
बाॅलिवूडचे चित्रपट सातत्याने फ्लाॅप जात असल्याने याचा परिणाम मोठा होत आहे. कोरोनाच्या अगोदर ज्याप्रमाणे चित्रपट कमाई करत होते. त्या तुलनेत आता अजिबात करत नाहीत. प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट जास्त प्रमाणात बघत नाहीयेत.
यापूर्वी जे चित्रपट 70 कोटीची कमाई बाॅक्स ऑफिसवर करत होते. ते आता 30 कोटींची कमाई करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे बिग बजेटचे चित्रपट देखील बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जात आहेत.
अक्षय कुमार, आमिर खान, कतरिना कैफ, रणबीर कपूर अशा मोठ्या बाॅलिवूड स्टारर्सचे चित्रपट देखील फ्लाॅप गेले आहेत. जान्हवी कपूरचा मिली, सोनाक्षी सिन्हाचा डबल XL हे चित्रपट देखील बाॅक्स ऑफिसवर काहीच धमाका करू शकले नाहीयेत.