डेव्हिड धवन आणि गोविंदाची 20 वर्षांची सुपरहिट जोडी का तुटली?, जाणून घ्या मोठं कारण

90च्या दशकात गोविंदा (Govinda) आणि डेव्हिड धवन यांची जोडी खूप चांगली जमली होती. जिथे प्रत्येकजण या जोडीचे चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होता. केवळ 90च्या दशकातच नाही, आजही प्रेक्षकांना या जोडीचे चित्रपट खूप आवडतात. पण एक वेळ आली जेव्हा या गोविंदा आणि डेव्हिडच्या मैत्रीमध्ये दुरावा आला.

डेव्हिड धवन आणि गोविंदाची 20 वर्षांची सुपरहिट जोडी का तुटली?, जाणून घ्या मोठं कारण
David Dhawan-Govinda
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 8:13 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक मोठे चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. जिथे त्या दिग्दर्शकाला त्या अभिनेत्याला त्याच्या प्रत्येक चित्रपटात घ्यायचे असते, असाच एक दिग्दर्शक डेव्हिड धवन (David Dhawan) आहे. डेव्हिडने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली आहे. 90च्या दशकात गोविंदा (Govinda) आणि डेव्हिड धवन यांची जोडी खूप चांगली जमली होती. जिथे प्रत्येकजण या जोडीचे चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होता. केवळ 90च्या दशकातच नाही, आजही प्रेक्षकांना या जोडीचे चित्रपट खूप आवडतात. पण एक वेळ आली जेव्हा या गोविंदा आणि डेव्हिडच्या मैत्रीमध्ये दुरावा आला.

डेव्हिड धवन चित्रपट दिग्दर्शित करण्यापूर्वी चित्रपट संपादित करत असे. ज्यामुळे त्यांना चित्रपटांच्या तपशीलांबद्दल त्याला खूप चांगली समज होती. जेव्हा, डेव्हिडने चित्रपटांचे दिग्दर्शन सुरू करण्याचा विचार केला, तेव्हा गोविंदा हळूहळू इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण करत होता. पण डेव्हिड सोबत त्याने त्याच्या काळातील सर्वात मोठे आणि हिट चित्रपट दिले, गोविंदाचा प्रसिद्ध चित्रपट ‘स्वर्ग’ देखील डेव्हिड धवनने दिग्दर्शित केला होता. तो चित्रपट हिट झाल्यानंतर, डेव्हिड गोविंदाच्या बहुतेक चित्रपटांचे दिग्दर्शन करत असे. डेव्हिडने गोविंदासोबत ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर 1’, ‘हिरो नंबर 1’ असे अनेक मोठे चित्रपट केले होते.

डेव्हिडचं काम सुरु, पण गोविंदाचं थांबलं!

परंतु 2000 पासून, गोविंदाचे नाव बॉलिवूडमध्ये उतरणीला लागले, त्यानंतर त्याने आपली राजकीय कारकीर्द सुरू करण्याचा विचार केला आणि त्यांनी चित्रपट सोडले व राजकारणी होण्याच्या दिशेने गेला. या कारकिर्दीतही काम न झाल्यामुळे तो पुन्हा चित्रपटांकडे परतला, पण यावेळी चित्रपटात त्याला कोणतेही काम मिळत नव्हते. त्याला सतत पुनरागमन करायचे होते, पण डेव्हिड धवनची एक गोष्ट त्याला खूप लागली होती.

जेव्हा गोविंदाला पुनरागमन करायचे होते…

पुनरागमन करण्यासाठी, जेव्हा गोविंदा बॉलिवूडमध्ये स्वत:साठी काम शोधत होता, तेव्हा त्याला सतत सहायक भूमिकांच्या ऑफर येत होत्या. त्याला मुख्य भूमिका देण्यास कोणीही तयार नव्हते. डेव्हिड धवननेही त्याला मुख्य भूमिकेसाठी योग्य मानले नाही. त्यांनी गोविंदाला फोनवर सांगितले की, छोट्या छोट्या भूमिका कर. गोविंदाने स्वतः आपल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. ही मुलाखत गोविंदाने बॉलिवूड हंगामाला दिली होती. डेव्हिडने या सर्व गोष्टी गोविंदाला नाही, तर शशी भैय्याला सांगितल्या होत्या. पण गोविंदा फोनवर या सर्व गोष्टी ऐकत होता.

गोविंदाने डेव्हिडच्या या गोष्टी खूप मनावर घेतल्या, त्यानंतर त्याने त्याच्यासोबत कधीच काम केले नाही. डेव्हिड आजही बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. अलीकडेच त्याने आपला मुलगा वरुण धवनसोबत ‘कुली नंबर 1’ चित्रपट बनवला, जो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता.

(Find out big reason why the 20-year-old superhit duo of David Dhawan and Govinda broke up)

हेही वाचा :

Birthday Special : सैफ अली खान- ‘हम तुम’ ते ‘तान्हाजी’… आगळ्यावेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता!

मुख्यमंत्र्यांना सर्वांसमक्ष जाब विचारला, रिपब्लिकन ऐक्यासाठी धडपड; वाचा एका शाहिराची कथा!

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....