‘कौन प्रवीण तांबे?’; श्रेयस तळपदे पुन्हा एकदा दिसणार क्रिकेटच्या मैदानात
'माझी तुझी रेशीमगाठ' या छोट्या पडद्यावरील मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) लवकरच बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. श्रेयसच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून हा एक बायोपिक आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या छोट्या पडद्यावरील मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) लवकरच बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. श्रेयसच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून हा एक बायोपिक आहे. श्रेयसने ‘इक्बाल’ या चित्रपटात क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तो खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe) असं या बायोपिकचं नाव असून यामध्ये क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. वय हा केवळ आकडा आहे, ही म्हण प्रवीण तांबे यांना तंतोतंत लागू होते. वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून ‘इंडियन प्रीमिअर लीग’मध्ये (IPL) पदार्पण करणाऱ्या तांबेंनी हे दाखवून दिलं की, वयानुसार स्वप्नांची व्याख्या करता येत नाही.
श्रेयसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या आगामी बायोपिकचा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. येत्या 1 एप्रिल रोजी हा चित्रपट ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कौन है प्रवीण तांबे? क्रिकेटमधील सर्वांत अनुभवी पदार्पण आणि सर्वांत प्रेरणादायी क्रिकेट स्टोरी’, असं कॅप्शन देत त्याने हा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर येत्या 9 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात श्रेयससोबत आशिष विद्यार्थी, परम्ब्रता चॅटर्जी आणि अंजली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. जयप्रद देसाई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
View this post on Instagram
श्रेयससाठी क्रिकेटचं मैदान काही नवीन नाही. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इक्बाल’ या पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटातून त्याने आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. जवळपास 17 वर्षांनंतर तो पुन्हा एकदा क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुष्यात अशी सुवर्णसंधी एकदाच येते, अशी भावना त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. या भूमिकेसाठी श्रेयसने बरीच मेहनत घेतली आहे. या भूमिकेसाठी काम करताना त्याला प्रवीण तांबे यांच्याकडूनही बरंच काही शिकायला मिळालं.
‘कौन प्रवीण तांबे?’ या चित्रपटात त्यांचा 20 वर्षांपासूनचा प्रवास पहायला मिळणार आहे. सुरुवातीला ते मुंबईसाठी रणजी करंडक खेळण्याची आकांक्षा बाळगत होते. सीए फर्म आणि डायमंड कंपनीत छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत त्यांनी देशांतर्गत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं हे स्वप्न 2012 मध्ये साकार झालं, जेव्हा राजस्थान रॉयल्सचा कर्णधार राहुल द्रविडने विजय हजारे टूर्नामेंटमधील त्यांची कामगिरी पाहिल्यानंतर त्यांना जयपूर फ्रँचाईझीसाठी निवडलं.
हेही वाचा:
Jhund : नागराजचा ‘झुंड’ वेग पकडतोय? बॉक्स ऑफिसवर दुपटीनं कलेक्शन, चालू आठवडा निर्णायक ठरणार
‘कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षामध्ये मी आहे’; ओळखलंत का या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला?