Video | काय सांगता? फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी तब्बल इतक्या वेळा जेवते? पाहा व्हिडीओ
व्यायाम आणि योगा करतानाचे शिल्पाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
मुंबई : चार ते पाच दिवसांपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टी तब्बूच्या बर्थडे पार्टीत पोहचली होती. पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शिल्पा शेट्टी, फराह खान आणि तब्बू या बेस्टी आहेत. शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. व्यायाम आणि योगा करतानाचे शिल्पाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. इतकेच नाही तर कायमच शिल्पा आपल्या डाएटवर देखील प्रचंड लक्ष देते. जंक फूड शिल्पा अजिबात खात नाही. बाॅलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून शिल्पा शेट्टीकडेच पाहिले जाते.
View this post on Instagram
शिल्पा शेट्टीचा फिटनेस पाहून सर्वांना वाटते की, ती दिवसभरातून अत्यंत कमी वेळा आणि कमी अन्न खात असेल. मात्र, नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आर्श्चयाचा धक्का बसेल. कारण या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी सतत खाताना दिसत आहे. विशेष म्हणजे शिल्पा दिवसभरातून तब्बल 10 वेळा जेवण करते. सर्वांना प्रश्न पडला असेल की, इतके जास्त खाऊन शिल्पा फिट कशी आहे?
शिल्पा शेट्टी दिवसभरातून जरी 10 वेळा खात असेल तरीही शिल्पा प्रत्येक वेळी हेल्दी गोष्टी खाते. जंक फूड वगैरे अजिबाच नाही. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शिल्पा विविध प्रकारची फळे आणि ड्रायफूड खात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात काही प्राॅब्लेम सुरू असून राज कुंद्राचे अश्लील व्हिडीओ प्रकरणात नाव आले आहे. इतकेच नाही तर शर्लिन चोप्रा हिने राज कुंद्रासोबतच शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप केले आहेत.