गंगा नदीत तरंगणारे मृतदेह नायजेरियाचे; कंगना रनौतचा जावईशोध

आपल्या बेताल वक्तव्यांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. (floating bodies around ganga are of nigeria, says kangana ranaut)

गंगा नदीत तरंगणारे मृतदेह नायजेरियाचे; कंगना रनौतचा जावईशोध
Kangana ranaut
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 7:00 PM

मुंबई: आपल्या बेताल वक्तव्यांमुळे प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. गंगेत वाहून येत असलेले मृतदेह हे भारतातील नसून ते नायजेरियाचे असल्याचा जावईशोध कंगनाने लावला आहे. कंगनाच्या या अजब तर्कटावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (floating bodies around ganga are of nigeria, says kangana ranaut)

कंगना रनौतला ट्विटरवर बॅन करण्यात आल्याने ती इन्स्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. नुकतीच तिने चाहत्यांना ईद आणि अक्षय तृतियाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तसेच सर्वांनी एकत्र राहून कोरोनाविरुद्धची लढाई लढण्याचं आवाहनही केलं आहे. तिने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला असून त्यातून तिने हे आवाहन केलं आहे.

तरीही इस्रायल लढतोय

जग अनेक गोष्टींशी सामना करताना दिसत आहे. कोरोना असो की अन्य काही देशांचा संघर्ष सुरू आहे. चांगल्या काळात संयम घालवता कामा नये आणि वाईट काळात हिंमत गमावता कामा नये. आपल्याला यातून काय शिकायला मिळतंय? आता इस्रायलचंच पाहा. काही लाख लोक या देशात आहेत. पण सहा सात देश त्यांच्यावर हल्ला करत आहेत. तरीही हा एकटा देश त्यांच्याविरोधात लढत आहे, असं कंगनाने म्हटलं आहे. त्या देशात असं काय आहे? तुम्ही स्ट्राईक केलीय आम्ही त्याला जुमानत नाही, असं युद्धात उभं राहून कोणी बोलत नाही. अशा प्रकारची घाणेरडी वृत्ती तिथे नाहीये. काही लोक नुसती गंमत बघतात. आनंद लुटतात. आता कोरोना काळात एखादी महिला रस्त्यावर बसून ऑक्सिजन घेत आहे आणि ही बातमी इंटरनॅशनल लेव्हलला व्हायरल होते. आणि मग नंतर माहीत पडतं की हे चित्रं कोरोना काळातील नाही, असं कंगनाने म्हटलं आहे.

विरोध करायचा नाही का?

आता काल जे फोटो व्हायरल झाले, ते गंगा नदीचे असल्याचं सांगितलं जातं. मात्र, ते फोटो गंगेचे नसून नायजेरियाचे आहेत. अशा फोटोंचा आपण विरोध करायचा नाही का?, असा सवाल कंगनाने केला आहे.

भारतीयता हाच सर्वांचा धर्म असावा

इस्रायलप्रमाणे प्रत्येक विद्यार्थाला आर्मीत सेवा देणं बंधनकारक करावं. आम्हीही करू. तसेच आपल्याच धर्माचे लोक आपले आहेत, असं ज्याही धर्मात म्हटलं आहे. त्यांची पुस्तके हटवण्यात यावीत, अशी मागणीही तिने केली आहे. तुम्ही हिंदू असो की मुसलमान. शीख असो की ख्रिश्चन असो. आपल्या सर्वांचा एकच धर्म असावा. तो म्हणजे भारतीयता. तुमच्याकडे माणुसकी असायला हवी. आपण एकमेकांची कदर केली तर सर्व मिळून पुढे जाऊ, असंही तिने सांगितलं. (floating bodies around ganga are of nigeria, says kangana ranaut)

संबंधित बातम्या:

भारतात घाई-गडबड नको, अमेरिकेप्रमाणे मास्क हटवण्याचा निर्णय तूर्तास नाही : AIIMS

पीएम केअर्स फंडाचं काय करायचं?; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोणत्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोनाचे किती रुग्ण? कुठे निर्बंध?

(floating bodies around ganga are of nigeria, says kangana ranaut)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.