Forbes India’s list of most influential : विजय देवरकोंडा आणि समंथा पडले मागे, नॅशनल क्रश रश्मिका मंदना पुन्हा ठरली अव्वल!

नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna ) सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये खूप व्यस्त आहे. अभिनेत्रीची गणना दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. फोर्ब्स इंडियाच्या यादीत रश्मिका मंदानाचे नाव आघाडीवर आहे.

Forbes India’s list of most influential : विजय देवरकोंडा आणि समंथा पडले मागे, नॅशनल क्रश रश्मिका मंदना पुन्हा ठरली अव्वल!
Celebs
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 11:33 AM

मुंबई : नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna ) सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये खूप व्यस्त आहे. अभिनेत्रीची गणना दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. फोर्ब्स इंडियाच्या यादीत रश्मिका मंदानाचे नाव आघाडीवर आहे. अभिनेत्रीचे सोशल मीडियावरही खूप चाहते आहेत. तिचा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होतो. रश्मिका मंदना तरुण पिढीमध्ये खूप लोकप्रिय आहे. अलीकडेच, अभिनेत्री रश्मिका मंदन्ना फोर्ब्सच्या सर्वाधिक प्रभावशाली स्टार्सच्या यादीत पहिल्या स्थानावर आली आहे. रश्मिकाने समंथा, विजय देवरकोंडा आणि यश यांना देखील मागे सोडले आहे.

बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यामुळे अभिनेत्री उत्तरेतही खूप लोकप्रिय ठरत आहे. यामुळे तिच्या सोशल मीडिया पेज आणि अकाऊंटवर फॉलोअर्सची संख्याही लक्षणीय वाढली आहे. रश्मिकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात तेलुगु आणि कन्नड चित्रपटांपासून केली होती आणि आज तिचे नाव सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांच्या यादीत अव्वल आहे.

विजय देवरकोंडासह ‘या’ कलाकारांना मागे सोडले!

‘पेली चोपुलअप’ आणि ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटांमधून दक्षिणचे सुपरस्टार विजय देवरकोंडा यांना खूप नाव कमावले. या यादीत त्याचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे कन्नड स्टार यश आहे. समंथा रूथ प्रभू या यादीत चौथ्या स्थानावर आहे, तर अभिनेता अल्लू अर्जुन पाचव्या क्रमांकावर आहे.

या यादीमध्ये, सरासरी पसंती, सरासरी टिप्पण्या, सरासरी व्हिडीओ व्हू आणि सोशल मीडियावरील फॉलोअर्स सरासरी गणना केली गेली आहे. हे ‘कोरोझ स्कोअर’ द्वारे दर्शविले जाते, ज्यात 10 पैकी काही गुण दिले जातात. रश्मिकाला या यादीमध्ये 9.88 गुण देण्यात आले आहेत. तर, विजय देवरकोंडाकडे 9.67 आहे. यशचा स्कोअर 9.54 आहे, तर समंथाचा स्कोअर 9.49 आहे. यानंतर अल्लू अर्जुनला 9.46 गुण देण्यात आले आहेत. फोर्ब्स 30 सप्टेंबरपर्यंत तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपट उद्योगातील लोकप्रिय सेलिब्रिटींच्या इन्स्टाग्राम क्रियाकलाप पाहून रँकिंग करत आहे.

रश्मिका मंदन्ना अल्लू अर्जुनच्या आगामी ‘पुष्पा’ या अॅक्शन-ड्रामामध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका साकारत आहे, तर ती लवकरच शर्वानंदच्या ‘अडावल्ली मिकू जोहरलू’ मध्ये दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री ‘मिशन मजनू’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.

रश्मिका करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिकाने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. रश्मिका तिचे अनेक फोटो सेटवरून शेअर करत असते.

या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर रश्मिका म्हणाली होती की, या चित्रपटात काम करताना तिला खूप आनंद होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सीमा आणखी विस्तारल्या आहेत. मला आनंद आहे की मी बॉलिवूडमध्ये माझ्या करिअरची सुरुवात या सुंदर लोकांसोबत केली.

हेही वाचा :

Sardar Udham | जिथं तिथं चर्चा विकी कौशलच्या ‘सरदार उधम’ची! ओटीटीवर गाजतोय ‘उधम सिंहं’चा बायोपिक!

Money Laundering Case : तीन वेळा ईडीचा समन्स, जॅकलिन फर्नांडिस चौकशीला हजर राहण्याची शक्यता!

बिहारमध्ये भर दिवसा महिला मॉडेलवर गोळीबार, मोना रायची प्राणज्योत मालवली, हत्येमागील रहस्य रहस्यच राहिल?

Non Stop LIVE Update
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्...
सरवणकरांच्या धनुष्यबाणाला अमित ठाकरेंचा आधार, आमने-सामने आलेत अन्....
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन
उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्वेत कुटुंबासह केलं मतदान, नागरिकांना आवाहन.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसह बजावलं मतदानाचं कर्तव्य.
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क
देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कुटुंबासह नागपुरात बजावला मतदानाचा हक्क.
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल
कांदेंनी बोलावलेल्या मतदारांची वाट समीर भुजबळांनी आडवली, नेमकं काय घडल.
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात.
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?.
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?.
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.