प्रभास-अनुष्का ते तब्बू-नागार्जुन, ‘या’ कलाकारांच्या अफेअर्सच्या चर्चांनी चाहते देखील झाले अवाक्!

आपल्या दमदार कथेसाठी आणि जबरदस्त अॅक्शनसाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिणेतील कलाकार लोकांना खूप आवडतात. लोकांमध्ये दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीची क्रेझ खूप वाढत आहे. बॉलिवूडसोबतच आता साऊथचे चित्रपटही लोकांच्या पसंतीस उतरत आहेत.

प्रभास-अनुष्का ते तब्बू-नागार्जुन, ‘या’ कलाकारांच्या अफेअर्सच्या चर्चांनी चाहते देखील झाले अवाक्!
Celebs
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 6:49 PM

मुंबई : आपल्या दमदार कथेसाठी आणि जबरदस्त अॅक्शनसाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिणेतील कलाकार लोकांना खूप आवडतात. लोकांमध्ये दक्षिण भारतीय फिल्म इंडस्ट्रीची क्रेझ खूप वाढत आहे. बॉलिवूडसोबतच आता साऊथचे चित्रपटही लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. अशा परिस्थितीत आता साऊथ चित्रपटांतील कलाकारांची फॅन लिस्ट सुद्धा कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही. हिंदी सिनेसृष्टीतील स्टार्सप्रमाणेच साऊथ सिनेसृष्टीतील कलाकारांचीही लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

यासोबतच या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याचीही लोकांना उत्सुकता चाहत्यांना आहे. मनोरंजन विश्वात कलाकारांची नावे एकमेकांशी जोडणे सामान्य आहे. टॉलिवूडमध्येही अशी अनेक जोडपी आहेत, त्यांच्या अफेअरची बातमी समोर येताच लोकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. चला तर मग जाणून घेऊया साऊथ अशाच काही अफेअर्सबद्दल…

अनुष्का शेट्टी-प्रभास

साऊथ सुपरस्टार प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या नात्याबाबत बऱ्याच दिवसांपासून अनेक अफवा समोर येत आहेत. मात्र, या बातम्या वाढत असल्याचे पाहून दोघांनीही स्वत:ला एकमेकांचे चांगले मित्र म्हणवून घेत या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले.

राय लक्ष्मी- श्रीशांत

तेलगू, तामिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री राय लक्ष्मी माजी भारतीय क्रिकेटर श्रीशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, श्रीशांतने या लिंक अपचे वृत्त नाकारले होते. मात्र, लक्ष्मी राय यांना त्यांच्या चित्रपटांच्या सेटवर भेटल्याचे त्यांने कबूल केले होते.

तमन्ना भाटिया-कार्थी

साऊथ चित्रपटांव्यतिरिक्त हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलेली अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे तामिळ अभिनेता कार्थीसोबत नाते असल्याची चर्चा होती. मात्र, अभिनेत्रीने हे वृत्त फेटाळून लावले होते. तो फक्त माझा सहकारी असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. जर मी कोणावर प्रेम केले तर, मी ते नाकारणार नाही. मी ही बातमी माझ्या चाहत्यांशी आनंदाने शेअर करेन, असे देखील तमन्ना भाटिया म्हणाली.

त्रिशा-राणा दग्गुबती

टॉलिवूड अभिनेत्री श्रिया सरनच्या आधी  अभिनेता राणा डग्गुबतीचे नाव त्रिशा कृष्णनसोबत जोडले गेले होते. खरे तर काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघे वेगळे झाले. कॉफी विथ करण या शोमध्ये राणाने खुलासा केला की, ‘ती एक दशकापासून माझी मैत्रीण आहे. आम्ही बर्‍याच काळापासून चांगले मित्र आहोत आणि एकमेकांना डेटही केले होते, पण मला वाटतं की गोष्टी चांगल्या झाल्या नाहीत.

(From Prabhas-Anushka to Tabu-Nagarjuna, the discussions about the affairs of these artists also surprised the fans)

हेही वाचा :

अनन्या पांडेने सुरु केले ‘लायगर’चे चित्रीकरण, ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यामुळे लागला होता ब्रेक!

Katrina Kaif- Vicky Kaushal Wedding | ठरलं! राजस्थानच्या शाही किल्ल्यात आयोजित होणार विकी कौशल-कतरिनाचा लग्नसोहळा!

‘इर्शाद’ नव्हे ‘काव्य पहाट’, ‘No Bindi No Business’नंतर आता शेफाली वैद्यंचा मोर्चा संदीप खरे-वैभव जोशींच्या कार्यक्रमाकडे!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.