शाहरुख खान ते अक्षय कुमारपर्यंत, बॉलिवूडकरांनी भारतीय हॉकी संघावर केला शुभेच्छांचा वर्षाव!

भारतीय हॉकी संघाच्या विजयानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाली आहे. बॉलिवूड सेलेब्स सोशल मीडियावर भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करत आहेत.

शाहरुख खान ते अक्षय कुमारपर्यंत, बॉलिवूडकरांनी भारतीय हॉकी संघावर केला शुभेच्छांचा वर्षाव!
इंडियन हॉकी संघ
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 12:40 PM

मुंबई : भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 असा विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच भारताने हॉकीमधला 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला आहे. तब्बल 41 वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात पदक जिंकलं आहे. भारतीय हॉकी संघाच्या विजयानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाली आहे. बॉलिवूड सेलेब्स सोशल मीडियावर भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करत आहेत.

शाहरुख खानने ट्विट करून भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. शाहरुख खानने लिहिले- ‘वाह… भारतीय पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा. लवचिकता आणि कौशल्य त्याच्या शिखरावर होते, किती सुंदर सामना.’

त्याचबरोबर अक्षय कुमारनेही सोशल मीडियावर टीमचे अभिनंदन केले. त्याने लिहिले, ‘टीम इंडिया इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी अभिनंदन. 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक. काय सामना होता, आणि काय दमदार कमबॅक.’

तापसी पन्नूने ट्विट केले आणि लिहिले, ‘..आणि हे कांस्य पदक’.

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी 5 वे पदक जिंकले आहे. त्याचबरोबर ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय हॉकीच्या नावावर हे तिसरे कांस्यपदक आहे. यापूर्वी 1968 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्य पदकाच्या लढतीत पश्चिम जर्मनीचा पराभव केला होता, तर भारताने 1972च्या ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या कांस्य पदकाच्या लढतीत नेदरलँड्सचा पराभव केला होता.

असा रंगला सामना?

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत जर्मनीने भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पण भारत आत्मविश्वासने खेळत होता. पहिल्या क्वार्टरनंतर जर्मनीला -1-0 ने आघाडी मिळाली. म्हणजेच पहिल्या क्वार्टरवर जर्मनीचं वर्चस्व राहिलं.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये सुरुवातीलाच भारताच्या सिमरनजीतने एक गोल करत जर्मनीशी बरोबरी केली. पण नंतर पुन्हा जर्मनीने दोन करत भारताला बॅकफूटला ढकललं. पण जर्मनीच्या दोन गोलनंतरही भारतीय संघ तसूभरही मागे हटला नाही.

भारताने जिद्द न सोडता आपला खेळ दिमाखात सुरु ठेवला. प्रत्येक भारतीय खेळाडूच्या मनात आज आत्मविश्वास ठासून भरला होता. मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घ्यायचा हे भारतीय संघाने ठरवलं होतं. त्यानुसार हार्दिक सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीची आघाडी कमी केली. तसंच हरमनप्रीतने पुन्हा गोल करत जर्मनीशी बरोबरी केली. म्हणजेच तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 5 गोल झाले…

आणि 41 वर्षानंतरचा तो ऐतिहासिक क्षण आला…!

काहीही करुन आजचा सामना जिंकायचाच, असा निश्चय भारतीय संघाने केला होता. त्यानुसार तिसऱ्या क्वार्टरची सुरुवात भारतीय संघाने जबरदस्त केली. सामन्याच्या 29 व्या मिनिटाला रुपिंदर सिंगने गोल केला. तिथंच भारताला आघाडी मिळाली. लगेचच 5 मिनिटांनी सिमरनजीतने गोल करुन भारताला आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर जर्मनीने पेनल्टी कॉर्नर मिळवले पण त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यास जर्मनीला अपयश आलं. सरतेशेवटी कांस्य पदकाच्या सामन्यात भारताने जर्मनीला 5-4 ने पराभूत करुन 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला.

संबंधित बातम्या :

Tokyo Olympic 2020 : ‘चक दे इंडिया’, 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक, भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय

IND vs ENG : पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीलाच विराट पराभूत, ‘या’ गोष्टी सर्वाधिक पराभवाचा रेकॉर्ड नावावर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.