Singer KK: ‘तुझी जाण्याची ही योग्य वेळ नाही’; केकेच्या निधनाने संगीतविश्व हळहळलं
केके (KK) (कृष्णकुमार कुन्नथ) यांचं मंगळवारी रात्री उशिरा कोलकाता (Kolkata) इथल्या एका कार्यक्रमात हृदयविकाराने निधन झालं. अवघ्या 53व्या वर्षीय केके यांच्या मृत्यूमुळे संगीतविश्व आणि बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत आघाडीचा गायक म्हणून पुढे आलेले गायक केके (KK) (कृष्णकुमार कुन्नथ) यांचं मंगळवारी रात्री उशिरा कोलकाता (Kolkata) इथल्या एका कार्यक्रमात हृदयविकाराने निधन झालं. अवघ्या 53व्या वर्षीय केके यांच्या मृत्यूमुळे संगीतविश्व आणि बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. संगीत विश्वातील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे. सोनू निगम (Sonu Nigam), श्रेया घोषाल, विशाल दादलानी, मोहित चौहान यांसह इतरही कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 1999 मध्ये ‘पल’ या म्युझिक अल्बमद्वारे या गायकाची भारतीय संगीतप्रेमींना ओळख झाली होती. त्यातील ‘यारो, दोस्ती’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक सरस गाणी दिली.
‘केके मेरे भाई, हे ठीक नाही’, असं लिहित गायक सोनू निगमने शोक व्यक्त केला. ‘महकी हवाओं मे’ हे गाणं केके आणि सोनू निगम यांनी एकत्र गायलं होतं. गायिका श्रेया घोषालने ट्विट करत लिहिलं, ‘केकेच्या निधनाची बातमी मला अजूनही पचनी पडत नाहीये. केके का असं केलंस? या गोष्टीचा स्वीकार करणंच खूप कठीण आहे.’
सोनू निगमची पोस्ट-
श्रेया घोषालचं ट्विट-
I am unable to wrap my head around this news. Numb. #KK Why! This is too hard to accept! Heart is shattered in pieces.
— Shreya Ghoshal (@shreyaghoshal) May 31, 2022
प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि ‘पेंटाग्राम’ या रॉक बँडचा एक भाग असलेल्या विशाल दादलानीने लिहिलं, ‘माझे अश्रू थांबतच नाहीतेय. त्याचा आवाज, त्याचं हृदय, एक व्यक्ती म्हणून तो खूपच भारी होता. केके तू कायम आमच्यासोबत राहशील’
विशाल दादलानीचं ट्विट-
The tears won’t stop. What a guy he was. What a voice, what a heart, what a human being. #KK is FOREVER!!!
— VISHAL DADLANI (@VishalDadlani) May 31, 2022
मोहित चौहानचं ट्विट-
KK… not fair man. Not your time to go. This was the last time we were together to announce a tour together. How can you just go??? In shock. In grief. A ear dear friend, a brother is gone. RIP KK. Love you. pic.twitter.com/lCdwIRf3W6
— Mohit Chauhan (@_MohitChauhan) May 31, 2022
‘केके.. हे बरोबर नाही. तुझी जाण्याची ही योग्य वेळ नाही. टूरची घोषणा करण्यासाठी आपण अखेरचं एकत्र आलो होतो. तू असा कसा जाऊ शकतोस? माझा जवळचा मित्र, माझा भाऊ मला सोडून गेला’, अशा शब्दांत मोहित चौहानने शोक व्यक्त केला.