Gangubai Kathiawadi: ‘गंगुबाई काठियावाडी’ची चार दिवसांत दणक्यात कमाई; जमवला इतक्या कोटींचा गल्ला

'गंगुबाई काठियावाडी'ची (Gangubai Kathiawadi) भूमिका स्वीकारून अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) तिच्या करिअरमधील सर्वांत मोठा धोका पत्करला होता. आता चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहता आलियाच्या करिअरमधील हा सर्वांत महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे.

Gangubai Kathiawadi: 'गंगुबाई काठियावाडी'ची चार दिवसांत दणक्यात कमाई; जमवला इतक्या कोटींचा गल्ला
आलिया भट्टच्या गंगूबाईची बॉक्स ऑफिस चांगली कमाईImage Credit source: इंस्टाग्राम
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 1:35 PM

‘गंगुबाई काठियावाडी’ची (Gangubai Kathiawadi) भूमिका स्वीकारून अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) तिच्या करिअरमधील सर्वांत मोठा धोका पत्करला होता. आता चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहता आलियाच्या करिअरमधील हा सर्वांत महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा (Sanjay Leela Bhansali) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. मुंबईत 50 टक्के आसनक्षमता असतानाही चित्रपटाने सोमवारी चांगला गल्ला जमवला, असं मत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने व्यक्त केलं. या चित्रपटाने चार दिवसांत तब्बल 47.31 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन्सवरही चांगली कमाई होताना दिसत आहे. हुसेन झैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकातील कथेवर आधारित या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.

गंगुबाई काठियावाडीची आतापर्यंतची कमाई पहिला वीकेंड- 39.12 कोटी रुपये सोमवार- 8.19 कोटी रुपये चार दिवसांत- 47.31 कोटी रुपये

View this post on Instagram

A post shared by Instagram (@instagram)

कोण होत्या गंगुबाई काठियावाडी?

हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना गंगूबाई हे पात्र सापडलं. गंगुबाई या मूळच्या गुजरातच्या होत्या. वयाच्या सोळाव्या वर्षी प्रेमविवाह करून त्या मुंबईत पळून आल्या होत्या. मात्र लग्नानंतर त्यांच्या पतीने फक्त ५०० रुपयांसाठी त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं होतं. कामाठीपुरा परिसरात वेश्या व्यवसाय करताना गंगुबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात करीम लाला यांच्याशी गंगुबाईंची गाठ पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधत भाऊ मानलं. या घटनेनंतर करीम लालाने अवघा कामाठीपुरा गंगुबाईंच्या हातात दिल्याचं म्हटलं जातं. गंगुबाईंनी कधीही कोणत्याही मुलीला तिच्या इच्छेविरोधात वेश्या व्यवसाय करू दिला नव्हता, असंही सांगितलं जातं.

संबंधित बातम्या: भव्यदिव्य सेट, सुरेल गाण्यांचा नजराणा, आलिया भटचा गंगुबाई काठियावाडी प्रेक्षकांच्या भेटीला

संबंधित बातम्या: आलियाच्या नव्या चित्रपटाच्या अडचणीत वाढ, गंगुबाई काठियावाडी यांच्या मुलाकडूनच कोर्टात याचिका, कारण…

संबंधित बातम्या: ‘गंगूबाई काठियावाडी’साठी संजय लीला भन्साळी घेणार मोठा निर्णय, आलिया भट्ट स्विकारणार हा बदल?

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.