Glimpse of LIGER | विजय देवरकोंडाचा जबरदस्त पंच..! लायगरचा टिझर टॉप ट्रेंडिंग..!

विजय देवराकोंडा(Vijay Devarakonda)च्या लायगरची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. काल त्याचा Glimpse of LIGER या नावानं टिझर रिलीज झाला. अवघ्या काही तासांतच त्याला 15M+व्ह्यूज मिळालेत. हा टिझर यूट्यूब(Youtube)वर ट्रेंडिंग एकवर आहे.

Glimpse of LIGER | विजय देवरकोंडाचा जबरदस्त पंच..! लायगरचा टिझर टॉप ट्रेंडिंग..!
विजय देवरकोंडा
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 11:07 AM

मुंबई : विजय देवराकोंडा(Vijay Devarakonda)च्या लायगरची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. काल त्याचा Glimpse of LIGER या नावानं टिझर रिलीज झाला. या टिझरवर चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडल्या आहेत. काल टिझर रिलीज झाला आणि अवघ्या काही तासांतच त्याला 15M+व्ह्यूज मिळालेत. हा टिझर यूट्यूब(Youtube)वर ट्रेंडिंग एकवर आहे.

टॉप ट्रेंडिंग साऊथचा स्टार विजय देवरकोंडा या सिनेमात मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Panday) ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कालच टिझर रिलीज झाला, आणि आता तो ट्रेंडिंग आहे. हा चित्रपट या वर्षातला सर्वात मोठा अॅक्शन चित्रपट असेल किंवा तो एक मोठा ब्लॉकबस्टर ठरणार, असंच दिसतंय.

बॉक्सरच्या भूमिकेत हा एक बिग बजेट चित्रपट आहे आणि निर्मात्यांसह त्याचे चाहतेही चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहतायत. टिझरलाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लाइक केलं जातंय, सिनेमा तर हीट होणारच, अशी सर्वांना अपेक्षा आहे. तो बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल, असं बोललं जातंय. या चित्रपटात त्यानं जगप्रसिद्ध बॉक्सर माइक टायसनसोबत बॉक्सिंगही केलीय. बॉलिवूडमध्ये बॉक्सिंगवर आधारित अनेक चित्रपट असले तरी हा चित्रपट त्या सर्व बॉक्सिंग चित्रपटांपेक्षा वेगळा आहे.

रिलीज डेट आली समोर दिग्दर्शक पुरी जगन्नाथ (Puri Jagannadh) या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी करण जोहर(Karan Johar)च्या धर्मा प्रॉडक्शननं पार पाडलीय. करणनं या चित्रपटाचं पोस्टर खूप आधी रिलीज केलं होतं. त्यानंतर त्याची रिलीज डेट समोर आली आणि काही दिवसांपूर्वीच 31 डिसेंबर 2021ला त्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, त्यानुसार पहिली झलक जबरदस्त आहे. बॉलिवूड आणि साऊथमधले अनेक सेलिब्रिटी या चित्रपटाशी जोडले गेले आहेत. तो 25 ऑगस्ट 2022 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होईल, असं सांगण्यात येतंय.

Happy Birthday Vidya Balan | करिअरची संघर्षमय सुरुवात, ‘सिल्क स्मिता’च्या भूमिकेने विद्या बालनला प्रसिद्धी मिळवून दिली!

Happy Birthday Nana Patekar | नाना पाटेकरांच्या अभिनय कारकिर्दीत नीलकांती पाटेकरांचाही मोठा वाटा, आर्थिक संकटातही दिली साथ!

Kitchen Kallakar : राजकारणातले कल्लाकार किचनमध्ये..! धमाल उडवून देणारे लज्जतदार किस्से, पाहा Video

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.