Good News : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या जीवनावर आधारित चित्रपटाची तयारी, अभिनेत्रीचा शोध सुरू
NBT च्या बातमीनुसार मीराबाई चानू यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात येणार आहे. मात्र विशेष गोष्ट म्हणजे हा मणिपुरी चित्रपट असेल. (Good News: A film on Tokyo Olympics silver medalist weightlifter Mirabai Chanu's life)
मुंबई :टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ( Tokyo Olympic) रौप्य पदक जिंकणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानूचा (Mirabai Chanu) आज प्रत्येक देशवासियाला अभिमान आहे. जरी अनेक भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली असली तरी मीराबाई चानूनं देशासाठी उत्तम कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत, आता देशभरातील लोक मीराबाईंचं जीवन अधिक जवळून जाणून घेऊ इच्छित आहेत.
NBT च्या बातमीनुसार मीराबाई चानू यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्यात येणार आहे. मात्र विशेष गोष्ट म्हणजे हा मणिपुरी चित्रपट असेल. मीराचे आयुष्य मणिपुरी सिनेमाद्वारे सर्वांसमोर सादर केलं जाईल.
मीरावर बनवला जातोय चित्रपट
ऑलिम्पिक विजेता आणि इंफाळच्या सेउटी फिल्म्स प्रॉडक्शन यांच्यात शनिवारी मीराबाई चानूवर नोंगपोक काचिंग या गावातील तिच्या निवासस्थानी चित्रपट बनवण्यासाठी करार झाला आहे. म्हणजेच मीराबाई चानूनंही चित्रपट बनवण्याचं मान्य केलं आहे. मीराबाईंच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष या चित्रपटात दाखवला जाईल.
अभिनेत्रीचा शोध सुरू
त्याच वेळी, अध्यक्ष मनाओबी एमएमचे यांनी एक प्रकाशन जारी केलं आहे, मनाओबी एमएमने सांगितलं की हा चित्रपट इंग्रजी आणि विविध भारतीय भाषांमध्ये देखील ‘डब’ केला जाईल. एवढंच नाही तर त्यांनी म्हटलं आहे की, चित्रपटासाठी आम्ही मीराबाई चानूच्या भूमिकेला साजेशी मुलगी शोधत आहोत, ती मीरासारखी दिसते. हे शूटिंग सुरू होण्यास थोडा वेळ लागेल. आता देशवासियांना हा चित्रपट दाखवला जाईल, मीराबाई चानू यांनी दिवस -रात्र मेहनत करून आणि अडचणी बाजूला ठेवून देशासाठी पदक कसं जिंकलं आहे हे या चित्रपटात दाखवलं जाईल.
मीराबाई चानू ही ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.
संबंधित बातम्या
Birthday Special : तापसी पन्नूच्या ‘या’ चित्रपटांनी समाजाला दिला सल्ला, हे आहेत Must Watch चित्रपट