‘1947मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014ला मिळालं!’, कंगना रनौतने उधळली मुक्ताफळे!
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kanagana Ranaut) नुकतीच टाईम्स नाऊ समिटमध्ये हजेरी लावली, जिथे तिने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान, कंगनाने अनेक मुक्ताफळे देखील उधळली होती. यावेळी कंगनाने असे वक्तव्य केले ज्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kanagana Ranaut) नुकतीच टाईम्स नाऊ समिटमध्ये हजेरी लावली, जिथे तिने अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. दरम्यान, कंगनाने यावेळी अनेक वक्तव्ये देखील केली. ज्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. या मुलाखती दरम्यान कंगनाने थेट भारत देशाच्या स्वातंत्र्यावर वक्तव्य केले आहे.
कंगनाने ‘पद्मश्री’ मिळाल्यानंतर ही मुलाखत दिली आहे. यावेळी कंगना रनौत म्हणाली की, ‘रक्त वाहणारचं होतं, पण भारतीयांचं रक्त वाहायला नको होतं. त्यांना माहित होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. 1947मध्ये जी मिळाली ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर 2014ला मिळालं आहे.’ यावर मुलाखतकार कंगनाला म्हणाली की, ‘म्हणूनच तुम्हाला लोक भगवा म्हणतात’. यावर जोरदार टाळ्यांचा गडगडाट झाला. मात्र, आता अभिनेत्रीवर जोरदार टीका होत आहे.
पाहा व्हिडीओ :
लकड़ी के घोड़े पर प्लास्टिक की तलवार लेकर वीरांगना बनने वाली सरकारी चाटुकार आजादी के सिपाहियों का अपमान कर रही है। हज़ारों कुर्बानियों के नतीजे को भीख बता रही है। pic.twitter.com/gH4JbOd4l9
— Rofl Gandhi 2.0 ?? (@RoflGandhi_) November 10, 2021
संतप्त नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया…
अभिनेत्री कंगनाच्या या वक्तव्यानंतर आता तिच्यावर जोरदार टीका होत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले की, सोनू सूदने लोकांची मदत केली, त्याच्यावर आयटी धाडी टाकल्या..आणि ही व्यक्ती अशी काहीही बडबड करते तिला पद्मश्री दिला जातो’
The question is not why Kangana was awarded Padma Shri. Padma Shri is the highest civilian honor by awarding it to hate monger like Kangana prestige/significance of the award and also of those who have received award till now has fallen down #KanganaRanaut #AdnanSami pic.twitter.com/s4o7DaaaNF
— Sona G (@sona_520) November 10, 2021
एका युजरने लिहिले की, ‘कंगना म्हणाली की 1947चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले होते. आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, तिच्याकडून एवढीच अपेक्षा केली जाऊ शकते, त्यांच्या मते, सुभाष/भगत/चंद्रशेखर यांनी काहीही केले नाही. त्रास या प्रकरणावर टाळ्या वाजवणाऱ्यांमुळे होतोय. आज देश इथे उभा आहे.’
कंगना ने कहा कि 1947 की आज़ादी भीख में मिली थी, असली आज़ादी 2014 में मिली है। कोई आश्चर्यचकित करने वाली बात नही है, उस से इतनी ही उम्मीद की जा सकती है, उसके हिसाब से सुभाष/भगत/चंद्रशेखर के कुछ नही किया।
तकलीफ उनसे हुई जिन्होंने इस बात पर तालियां बजाई। आज देश यहां खड़ा है।
— Pankaj Jain (@pj77in) November 10, 2021
एकाने लिहिले की, ‘आमच्या स्वातंत्र्यसैनिकांचा आदर करणारे सरकार आता असते, तर असे लज्जास्पद विधान करणाऱ्या या महिलेवर आतापर्यंत गुन्हा दाखल झाला असता..’
Had there been a govt that respected our freedom fighters this woman would have been booked by now Such a shameful statement https://t.co/NKzljZMt7Y
— Sakshi Joshi (@sakshijoshii) November 10, 2021
पंतप्रधान खरे सुपरस्टार!
यादरम्यान कंगनाने ती कोणाला सुपरस्टार मानते हे देखील सांगितले. कंगना म्हणाली- ‘मी ज्या कुटुंबातून आले आहे, त्यात पंतप्रधानांना सुपरस्टार मानले जाते. पंतप्रधान माझ्या कुटुंबासाठी सुपरस्टार आहेत आणि नेहमीच असतील. माझ्या आई-वडिलांनी माझ्या चित्रपटाच्या मुहूर्तावर प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली, तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता.
दरम्यान, कंगनाला विचारले गेले की, ‘सुपरस्टार कंगना रनौतलाही पंतप्रधान सुपरस्टार वाटतात का? जसे तुमच्या कुटुंबाचाही विश्वास आहे.’ उत्तरात कंगना म्हणते की, ‘नक्कीच, पीएम मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. यात शंका नाही. ते आपल्या देशासाठी आपल्याला मिळाले हे आपले भाग्य आहे. मला वाटते की, त्यांनी आपल्या देशाला अशा ठिकाणी नेले आहे, जिथे उभे राहण्याचा आपल्याला खूप अभिमान आहे.’
हेही वाचा :
बोल्ड अवतारात जान्हवी कपूरने वाढवला वाळवंटाचाही पारा! फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘हाय गर्मी….’