Happy Birthday Adil Hussain | वयाच्या 7व्या वर्षी अभिनयाची सुरुवात, स्टँडअप कॉमेडीयन ते अभिनेता असा प्रवास करणारे आदिल हुसैन!
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आदिल हुसैन (Adil Hussain) यांचा आज (5 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. गात वर्षी त्यांना इंडो जर्मन फिल्म वीकमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. आदिल हुसेन यांनी बॉलिवूडच्या अनेक चर्चित चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आदिल हुसैन (Adil Hussain) यांचा आज (5 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. गात वर्षी त्यांना इंडो जर्मन फिल्म वीकमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. आदिल हुसेन यांनी बॉलिवूडच्या अनेक चर्चित चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे आणि मोठ्या पडद्यावर आपली अमिट छाप सोडली आहे. चला तर, आदिल हुसेन यांच्या वाढदिवशी त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया…
अभिनेते आदिल हुसैन यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1956 रोजी आसाममध्ये झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. आदिल हुसेनने वयाच्या सातव्या वर्षी शाळेतील कार्यक्रमांमध्ये भाग घेत अभिनयाला सुरुवात केली. यानंतर, त्यांनी महाविद्यालयात बराच काळ अभिनय देखील केला. या काळात ते स्टँड-अप कॉमेडी करायचे आणि त्यांना बॉलिवूड कलाकारांची नक्कल करायलाही आवडायचे. महाविद्यालयानंतर आदिल हुसेन यांनी रंगभूमीवरही भरपूर काम केले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ड्रामा स्टुडिओ लंडनमध्येही काम केले.
मातृभाषेत कामाची सुरुवात!
आदिल हुसेन यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आसामी भाषेतील चित्रपटांपासून केली होती. त्यांनी आसामच्या चित्रपटांसाठी बराच काळ काम केले. यानंतर त्यांनी हिंदी सिनेमाकडे वळण्याचा निर्णय घेतला. टीव्ही सिरियल ‘डिटेक्टिव्ह विजय’ मध्ये आदिल हुसैन प्रथम दिसला होते. त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘कमिने’ होता. हा चित्रपट 2009 मध्ये आला. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होता.
‘इश्किया’ मिळवून दिली ओळख
आदिल हुसेनला 2010 साली हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये खरी ओळख मिळाली. ‘इश्किया’ हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्यांचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले. यानंतर, आदिल हुसैनने बॉलिवूडच्या अनेक चर्चित चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. हिंदी व्यतिरिक्त, त्यांनी इंग्रजी, तामिळ आणि बंगाली चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान
अलीकडे, आदिल हुसैनला इंडो जर्मन फिल्म वीकमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना हा सन्मान प्रकाश झा यांच्या ‘परीक्षा’ चित्रपटासाठी आणि आणखी एक चित्रपट ‘निर्वाण इन’ साठी मिळाला होता. आदिल हुसैनने ‘परीक्षा’ चित्रपटात रिक्षाचालकाची भूमिका साकारली होती. तो नक्कीच रिक्षा चालवतो, पण त्याची स्वप्ने मोठी आहेत. तो आपल्या मुलाला मोठ्या शाळेत पाठवण्याची स्वप्न बघतो आणि त्याला एक मोठा माणूस बनताना पाहू इच्छितो. पैशाअभावी तो दबावाखाली येतो आणि चोरीसारखी काही वाईट कामे करू लागतो. तथापि, पोलिस त्याच्या भावना समजून घेतात आणि एक अधिकारी त्याच्या मुलाला पूर्ण पाठिंबा देतो.
हेही वाचा :
‘मन उडु उडु झालं’ मालिकेला पडली ‘मनी हाईस्ट’ची भुरळ, हॉट एअर बलूनची सैर करत केलं प्रमोशन!
AlayaF | पूजा बेदीच्या लेकीचा हॉट अवतार, अलाया एफचा बिकिनीतील बोल्ड अंदाज https://t.co/YP3a4cX7eT#AlayaF | #Maldives | #MaldivesVacation | @AlayaF___
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 4, 2021