Amitabh Bachchan | 80 वर्षात अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात आले ‘हे’ 8 टर्निंग पॉइंट…
बिग बीने आपल्या करिअरमध्ये अनेक चढउतार नक्कीच बघितले आहेत. 1969 मध्ये चित्रपट क्षेत्रात राजेश खन्ना यांचे खूप मोठे वर्चस्व होते. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा होता.
मुंबई : आपल्या खास शैलीने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी प्रेक्षकांच्या मनावर गेली पाच दशके अधिराज्य गाजवले आहे. आज बिग बींचा वाढदिवस असून ते 80 वर्षांचे झाले आहेत. विशेष म्हणजे आजही अमिताभ बच्चन त्याच ताकतीने काम करतात. काैन बनेगा करोडपतीमध्ये (Kaun Banega Crorepati) अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास एपिसोड सोनी टीव्हीने ठेवलाय. यामध्ये जया बच्चन आणि अभिषेक बच्चनने हजेरी लावत अनेक मोठे खुलासे देखील केले आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरमध्ये बाॅलिवूडला (Bollywood) अनेक हीट चित्रपट दिले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरची सुरूवात 1969 मध्ये ख्वाजा अहमद अब्बास यांच्या सात हिंदुस्तानी या चित्रपटातून केली. या चित्रपटाच्या माध्यमातून ते पहिल्यांदा पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि याच चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटातील त्यांनी केलेल्या भूमिकेनंतर त्यांचे सर्वत्र काैतुकही करण्यात आले.
बिग बीने आपल्या करिअरमध्ये अनेक चढउतार नक्कीच बघितले आहेत. 1969 मध्ये चित्रपट क्षेत्रात राजेश खन्ना यांचे खूप मोठे वर्चस्व होते. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा होता. त्यामध्येच हृषिकेश मुखर्जीच्या ‘आनंद’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी काम केले. मात्र, या चित्रपटात मुख्य भूमिकेत राजेश खन्ना होते. या चित्रपटातील अमिताभ यांचा अमिनय देखील लोकांना प्रचंड आवडला.
अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात वळण देणारा जंजीर चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांना शोले चित्रपट भेटला. आजही शोले चित्रपटाचे अनेक फॅन आहेत. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना…हा डाॅयलाॅग ऐकला की, शोले चित्रपटाचा पुर्ण सीन डोळ्यासमोर उभा राहतो. शोले चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी जबरदस्त अभिनय केलाय.
कुली चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. इतकेच नाही तर ते काही दिवस कोमात देखील होते. यावेळी त्यांना तब्बल 60 बाटल्स रक्त देखील चढवण्यात आले होते. यावर मात करत परत एकदा अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाचे काम सुरू केले आणि चाहत्यांमध्ये त्यांची क्रेझ निर्माण झाली.
कुली चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांच्या जीवनात एक उतरता काळ आला. यादरम्यान बिग बीचे अनेक चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले. मात्र, 1996 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे तब्बल 15 वर्षांनंतर दुसरा राष्ट्रीय पुरस्कार हा अमिताभ बच्चन यांना मिळाला. अलिकडच्या काळात अमिताभ बच्चन यांनी सत्याग्रह यासारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले.
अमिताभ बच्चन यांनी काैन बनेगा करोडपतीच्या 14 व्या सीजनला सुरूवात केलीये. इतकेच नाही तर अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये देखील अमिताभ बच्चन महत्वाच्या भूमिकेत होते, हा चित्रपट 2022 मध्ये कोरोनानंतर चाहत्यांच्या भेटीला आलाय. रश्मिका मंदानासोबत अमिताभ बच्चन गुड बाय या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात ते एका वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.