मुंबई : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal ) यांनी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. अनुराधा पौडवाल यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1952 रोजी झाला. अनुराधा पौडवाल संगीतविश्वातील एक मोठे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या चित्रपटातील गाण्यापासून दूर आहे. आपल्या गोड आवाजाने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या अनुराधा पौडवाल यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
अनुराधा पौडवाल यांचे बालपण मुंबईत गेले. सुरुवातीपासूनच त्यांचा चित्रपट आणि संगीताकडे कल होता. अनुराधा पौडवाल यांनी 1973 मध्ये आलेल्या ‘अभिमान’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात अनुराधा पौडवाल यांनी जया बच्चन यांच्यासाठी एक श्लोक गीत गायले होते. यानंतर अनुराधा पौडवाल यांनी 1976 मध्ये ‘कालीचरण’ या चित्रपटात गाणे गायले. ‘आप बीती’ या चित्रपटातून त्यांनी एकल गाण्यास सुरुवात केली. चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिले होते. चित्रपटांमध्ये गाण्यासोबतच त्या स्टेज शोही करत असत. किशोर कुमार यांच्यासोबत त्यांनी जवळपास 300 स्टेज शो केले.
आपल्या कारकिर्दीत यशाच्या शिखरावर असताना, अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासोबत कास्ट करण्यात आले. लता मंगेशकरांच्या जागी कोणाला घेता येणार असेल, तर त्या अनुराधा पौडवाल आहेत, असाही समज होता. मात्र, कारकिर्दीच्या शीर्षस्थानी असताना त्यांनी चित्रपट गाण्यापासून दूर राहून भक्तिगीते, भजने गायला सुरुवात केली. त्याचा परिणाम असा झाला की 90च्या दशकातील गायिका अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती यांना अधिक फायदा झाला. हळुहळु त्यांची कारकीर्द केवळ भक्तिगीते गाण्यातच गुंतली.
अनुराधा पौडवाल यांनी अरुण पौडवाल यांच्याशी लग्न केले जे स्वतःसंगीतकार होते. अरुण पौडवाल यांच्या अकाली निधनाने त्या खूप दु:खी झाल्या होत्या. टी-सीरिजच्या सहकार्याने त्या फक्त एक-दोन गाणी गात राहिल्या. अनुराधा पौडवाल यांना आदित्य आणि कविता ही दोन मुले होती. आदित्यचा गत वर्षी सप्टेंबरमध्ये मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला होता.
अनुराधा यांनी त्यांच्या मधुर आवाजात अनेक हिट चित्रपट दिले. यामध्ये ‘धक धक करने लगा’, ‘तू मेरा हीरो’, ‘हम तेरे बिन’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘नजर के सामने’, ‘जिस दिन तेरी मेरी बात’, ‘मुझे ना आये’ आणि ‘बहुत प्यार करता है’ यांचा समावेश आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘बाबू’मध्ये नेहा महाजनची एंट्री, लॉकडाऊननंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार मराठीत ॲक्शनचा तडका!