Happy Birthday Arjun Kapoor | सलमान खानच्या बहिणाला डेट केल्यानंतर त्याच्या वहिनीच्या प्रेमात पडला अर्जुन कपूर!

अभिनेता अर्जुन कपूरने सलमान खानची बहीण अर्पिता खान हिला डेट केले होते. ते दोघेही 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. अर्जुन अर्पिताला डेट करत होता, तोपर्यंत त्याने चित्रपटात पाऊल ठेवले नव्हते. त्याने स्वतः सलमान खानला आपल्या नात्याबद्दल सांगितले होते.

Happy Birthday Arjun Kapoor | सलमान खानच्या बहिणाला डेट केल्यानंतर त्याच्या वहिनीच्या प्रेमात पडला अर्जुन कपूर!
अर्जुन कपूर
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 10:27 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun kapoor) याने आपल्या पहिल्या चित्रपटातून चाहत्यांची मने जिंकली. ‘इशकजादे’ या चित्रपटात त्याची अनोखी शैली दिसली होती, यामुळे तो पदार्पण करताच बॉलिवूडमध्ये व्यस्त झाला होता. व्यावसायिक आयुष्यापेक्षा अर्जुन आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आला आहे. आज (26 जून) अर्जुन आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुनचा जन्म 26 जून 1985 रोजी मुंबई येथे झाला होता. आज अर्जुनच्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही सांगणार आहोत…(Happy Birthday Arjun Kapoor know about actors love life)

अभिनेता अर्जुन कपूरने सलमान खानची बहीण अर्पिता खान हिला डेट केले होते. ते दोघेही 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. अर्जुन अर्पिताला डेट करत होता, तोपर्यंत त्याने चित्रपटात पाऊल ठेवले नव्हते. त्याने स्वतः सलमान खानला आपल्या नात्याबद्दल सांगितले होते. अर्जुनने एका मुलाखतीत म्हणाला होता की, सलमान भाईला माझ्याबद्दल आणि अर्पिताबद्दल काळाताच त्याला मोठा धक्का बसला होता, पण नंतर त्याने समजून घेतले.

ब्रेकअपनंतरही अर्जुनच्या पाठीशी उभा राहिला ‘भाईजान’

अर्जुन कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, ब्रेकअपनंतरही सलमान खानने माझी साथ सोडली नाही. तो नेहमी मोठ्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभा राहिला. त्याचवेळी तो हे देखील म्हणाला होता की, अर्पिताशी संबंध असतांना सलमान भाई नेहमीच माझी बाजू घेत असत.

आता सलमानच्या वहिनीशी जुळलं नातं

अर्जुन कपूर सध्या अभिनेत्री मलायका अरोराला डेट करत आहे. मलायका आणि अरबाजचे घटस्फोट झाला नव्हता, तेव्हा पासूनच मलायका आणि अर्जुनच्या नात्याबद्दल बातम्या येऊ लागल्या होत्या. कपूर आणि खान दोघेही कुटुंब त्यांच्या नात्याबद्दल जाणून चकित झाले होते. पण, अर्जुन आणि मलायका दोघांनीही एकमेकांची साथ सोडली नाही. अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर दोघांनीही सोशल मीडियावर आपल्या नातेसंबंधांबद्दल सर्वांना सांगितले होते.

दोघेही नेहमी एकत्र सुट्टीवर जातात आणि बर्‍याच कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. एवढेच नव्हे तर दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटोही शेअर करत असतात.

अर्जुन आणि मलायकाच्या नात्यावर बरेच लोक प्रश्न उपस्थित करतात. लग्नाबाबत अर्जुनने म्हटले होते की, जेव्हा त्याचे लग्न होईल, तेव्हा ते सर्वांना सांगूनच करेल. कोणापासूनही काहीही लपवणार नाही. दोघेही नेहमीच आपल्या नात्याबद्दल मोकळेपणाने बोलतात.

(Happy Birthday Arjun Kapoor know about actors love life)

हेही वाचा :

‘रामायणा’तील ‘कैकयी’ने अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेय काम, जाणून घ्या आता काय करते अभिनेत्री…

Ajay Devgn | अजय देवगणच्या नव्या चित्रपटाची घोषणा, आणखी एका साऊथ चित्रपटाचा रिमेक बनवणार!

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.