मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आशिष विद्यार्थी ( Ashish Vidyarthi) गेल्या तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi)आज (19 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. आशिषचा जन्म 19 जून 1962 रोजी दिल्ली येथे झाला होता. अभिनेत्याच्या वडिलांचे नाव गोविंद विद्यार्थी होते. आशिष सुरुवातीपासूनच एखाद्या कलाकाराच्या घराशी संबंधित असल्याने, त्याला लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये जायचे होते (Happy Birthday Ashish Vidyarthi know about actors career journey).
या अभिनेत्याने 1990मध्ये दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि दिल्लीत वास्तव्य करून त्याने अनेक नाटकांमधून कामं केली. त्यानंतर ते 1992मध्ये कामाच्या शोधात मुंबईत आले.
इथून सुरू झालेला आशिष विद्यार्थी यांचा प्रवास पुन्हा कधी थांबला नाही. त्यांनी आतपर्यंत अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटात काम केले आहे, ज्यात ‘नाजायज’, ‘जीत’, ‘भाई’, ‘दौड़’, ‘जिद्दी’, ‘मेजर साब’, ‘सोल्जर’, ‘हसीना मान जाएगी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्याचे असे काही चित्रपट होते, ज्याला प्रेक्षकांनी अफाट पसंती दिली. त्यातील एक म्हणजे ‘वास्तव’ चित्रपटातील त्यांची ‘विठ्ठल काण्या’ची भूमिका, हे पात्र कोणालाही विसरता येणार नाही. चित्रपटात या अभिनेत्याचा मृत्यू झालेला दाखवला असला तरी, संजय दत्तला साथ दिल्याबद्दल त्याची नेहमीच आठवण काढली जाते.
खलनायक असल्यामुळे आतापर्यंत 182 वेळा आशिष विद्यार्थी यांचे चित्रपटात ‘निधन’ झाले आहे. पण, सर्व जण त्याच्या अभिनयाचे चाहते आहेत. ‘बिच्छु’ या चित्रपटात आशिष यांनी ‘देवराज खत्री’ हे खलनायकी पात्र साकारले होते. या चित्रपटात प्रेक्षकांना त्याची भूमिका खूप आवडली. या चित्रपटात बॉबी देओल आणि राणी मुखर्जी या कलाकारांसह मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 2000मध्ये रिलीज झाला होता. नुकताच अभिनेता ‘सनफ्लॉव्हर’ या चित्रपटात दिसला होता.
आशिष विद्यार्थी यांनी 11 वेगवेगळ्या भाषांमधील 230 उत्कृष्ट चित्रपटांत काम केले आहे. त्यांचा जन्म एका मल्याळी कुटुंबात झाला होता. ज्यामुळे ते दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही चांगलेच गाजले आहेत. आशिषच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे तर, त्यांनी अभिनेत्री राजोशी बरुआशी लग्न केले आहे. राजोशी एक उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक छोट्या मोठ्या मालिकांमध्ये काम केले आहे. आशिष यांनी 24, ट्रक धनधिन यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
(Happy Birthday Ashish Vidyarthi know about actors career journey)
तब्बल 18 महिन्यांनंतर झाले मौसमी चटर्जींच्या मुलीच्या अस्थींचे विसर्जन, जावयाने सांगितले कारण!