Happy Birthday Asin | असिन नव्हे तर ‘गजनी’ फेम अभिनेत्रीच नाव वेगळंच! वाचा कसं मिळालं नवं नाव…
दक्षिण भारतीय आणि बॉलिवूड अभिनेत्री असिन थोट्टूमकल (Asin) हिचा आज (26 ऑक्टोबर) वाढदिवस आहे आणि ती 36 वर्षांची झाली आहे. असिनचा जन्म 26 ऑक्टोबर 1985 रोजी केरळमधील प्रसिद्ध शहर कोची येथे झाला.
मुंबई : दक्षिण भारतीय आणि बॉलिवूड अभिनेत्री असिन थोट्टूमकल (Asin) हिचा आज (26 ऑक्टोबर) वाढदिवस आहे आणि ती 36 वर्षांची झाली आहे. असिनचा जन्म 26 ऑक्टोबर 1985 रोजी केरळमधील प्रसिद्ध शहर कोची येथे झाला. ती मल्याळी सायरो-मलबार कॅथोलिक कुटुंबातील आहे. तिचे वडील जोसेफ थोट्टुमकल आणि आई सेलिन थोट्टूमकल यांनी खूप प्रेमाने तिला वाढवले. असिनचे वडील सीबीआय अधिकारी होते, जे नंतर एक प्रसिद्ध व्यापारी बनले आणि तिची आई व्यवसायाने सर्जन होती.
असिनने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र, तरीही ती अतिशय साधे जीवन जगली. असिन अभ्यासात खूप हुशार होती. तिला दहावीच्या बोर्ड परीक्षेत 90% गुण मिळाले होते. नंतर तिने सेंट तेरेसा कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात कला शाखेची पदवी घेतली.
‘असे’ पडले असिन नाव!
फार कमी लोकांना माहिती आहे की, असिनच्या जन्मानंतर तिच्या आजीने तिचे नाव मेरी ठेवले होते. पण, नंतर तिच्या वडिलांनी तिचे नाव बदलून असिन ठेवले. असिनच्या वडिलांना हे नाव आवडले ज्याचा अर्थ शुद्ध आणि निर्दोष असा आहे. ते म्हणतात की, त्यांची मुलगी देखील तिच्या नावाप्रमाणेच आहे.
अभिनय कारकिर्दीची सुरुवात
असिन 15 वर्षांची असताना तिच्या आयुष्यातील पहिला चित्रपट केला, जो 2001मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘नरेंद्रन माकन जयकांथन वाका’ हा मल्याळम चित्रपट होता, ज्याने असिनला चित्रपटसृष्टीत पुढे जाण्यास मदत केली. असिनला 2003 मध्ये रिलीज झालेल्या तिच्या ‘अम्मा नन्ना ओ तमिला अम्माई’ या तेलुगु चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटामुळे तिला त्या वर्षी सर्वोत्कृष्ट तमिळ अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.
खूप कमी लोकांना माहीत आहे की, असिन केवळ अभिनेत्री नाही तर ती एक बिझनेस वुमन आणि उत्कृष्ट मॉडेल देखील आहे.
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये उमटवला वेगळा ठसा
सगळ्यांनाच ‘गजनी’ हा चित्रपट आठवत असेल, ज्यात असिन अभिनेता आमिर खान सोबत दिसली होती. या चित्रपटाने असिनला अफाट यश मिळवून दिले, तिचा चित्रपट बॉलिवूड इंडस्ट्रीतील 100 कोटी क्लब चित्रपट बनणारा पहिला चित्रपट ठरला होता. असिनसाठी हा चित्रपट खूप भाग्यवान ठरला, त्यासाठी असिनला त्या वर्षी सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर ही अभिनेत्री पुन्हा ‘हाऊसफुल 3’, ‘खिलाडी नंबर 786’, ‘बोल बच्चन’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये दिसली.
शास्त्रीय नृत्यांगना आहे असिन
एक उत्कृष्ट अभिनेत्री, मॉडेल आणि बिझनेस वुमन असण्यासोबतच, असिन एक प्रशिक्षित भरतनाट्यम आणि कथकली नर्तक देखील आहे. असिन 8 भाषांमध्ये प्रवीण आहे. तिची मातृभाषा मल्याळम सोबतच तिला हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत, इटालियन, तेलुगू आणि तमिळ भाषाही येतात.
बॉलिवूड चित्रपटांसोबतच असिनने तिच्या करिअरमध्ये तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटही केले आहेत. ती तेलुगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपट उद्योगातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री राहिली आहे. ‘किझुकुम’ आणि ‘द साउंड ऑफ म्युझिक’ हे तिचे गाजलेले सिनेमे आहेत. चित्रपटांपूर्वी असिनला एक जाहिरात प्रोजेक्ट मिळाला होता, जो तिने खूप छान पूर्ण केला होता. बीपीएल ब्रँडची जाहिरात ही तिच्या कारकिर्दीतील पहिला प्रकल्प होता.
असिनने 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचे सह-मालक राहुल शर्माशी लग्न केले, त्यानंतर तिने 2017 मध्ये एका मुलीला जन्म दिला. तिच्या मुलेचे नाव अरिन आहे.
हेही वाचा :
Ashram 3 | ‘आश्रम 3’ वेब सीरीजच्या सेटवर बजरंग दलाचा हल्ला, प्रकाश झा यांच्या चेहऱ्यावर फेकली शाई!