Happy Birthday Diljit Dosanjh | मनोरंजन विश्वात येण्याआधी भजन-कीर्तन गायचा, ‘उडता पंजाब’ने दिली दिलजीत दोसांझच्या करिअरला कलाटणी!

पंजाबी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक आणि अभिनेता, दिलजीत दोसांझ याचा जन्म 6 जानेवारी 1984 रोजी झाला. यावर्षी दिलजीत त्याचा 38वा वाढदिवस साजरा करत आहे. दिलजीत सुरुवातीपासूनच पंजाबी इंडस्ट्रीत आपली चमक दाखवत आहे.

Happy Birthday Diljit Dosanjh | मनोरंजन विश्वात येण्याआधी भजन-कीर्तन गायचा, ‘उडता पंजाब’ने दिली दिलजीत दोसांझच्या करिअरला कलाटणी!
Diljit Dosanjh
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 8:00 AM

मुंबई : पंजाबी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायक आणि अभिनेता, दिलजीत दोसांझ याचा जन्म 6 जानेवारी 1984 रोजी झाला. यावर्षी दिलजीत त्याचा 38वा वाढदिवस साजरा करत आहे. दिलजीत सुरुवातीपासूनच पंजाबी इंडस्ट्रीत आपली चमक दाखवत आहे. आता दिलजीतने बॉलिवूडमध्येही आपली ताकद दाखवून दिली आहे. केवळ गाणीच नाही, तर त्याने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. चला तर दिलजीतच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया…

दिलजीत दोसांझचा जन्म पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील दोसांझ कलान गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बलबीर सिंग आणि आईचे नाव सुखविंदर कौर आहे. दिलजीतचे वडील पंजाब रोडवेजचे निवृत्त कर्मचारी आहेत. दिलजीतला एक लहान भाऊ आणि एक मोठी बहीण देखील आहे. दिलजीतचे संपूर्ण बालपण दोसांझच्या कलेमध्ये गेले. यानंतर दिलजीत पुढील अभ्यासासाठी लुधियानाला आला होता. इथे दिलजीतने अभ्यासासोबतच गाण्यातही करिअर केले.

कीर्तनांतून सुरु केली कारकीर्द

सुरुवातीच्या काळात दिलजीत कीर्तनात भजन गायचा. दिलजीतने 2004 मध्ये त्याच्या पंजाबी अल्बम ‘इश्क दा उडा ऐदा’ मधून करिअरला सुरुवात केली. यानंतर, 2009 मध्ये दिलजीतने रॅपर हनी सिंगसोबत ‘गोलियां’ हे गाणे गायले, ज्यामुळे तो आंतरराष्ट्रीय स्टार बनला. 2011 मध्ये ‘द लायन ऑफ पंजाब’ या चित्रपटातून दिलजीतने अभिनयाच्या विश्वात प्रवेश केला. त्याच्या ‘जट्ट अँड ज्युलिएट’ आणि ‘जट अँड ज्युलिएट 2’ या चित्रपटांनी पंजाबी चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड तोडले.

अभिनय विश्वही गाजवले!

यानंतर 2014 मध्ये आलेल्या अनुराग सिंगच्या पंजाबी चित्रपट ‘पंजाब 1984’ मधील दिलजीतच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. या चित्रपटानंतर दिलजीतसाठी हिंदी चित्रपटांचे मार्गही खुले झाले. 2016 मध्ये दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्या प्रसिद्ध हिंदी चित्रपट ‘उडता पंजाब’मध्ये दिलजीतने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातूनच त्यांनी अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर आणि आयफा पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तेव्हापासून दिलजीतची गणना बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये होऊ लागली. ‘उडता पंजाब’नंतर दिलजीत अनुष्का शर्मासोबत ‘फिल्लौरी’ चित्रपटात दिसला होता. 2018 मध्ये, त्याने माजी भारतीय हॉकीपटू संदीप सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘सूरमा’ चित्रपटात संदीप सिंगची भूमिका साकारली होती. यानंतर 2019 च्या उत्तरार्धात आलेल्या ‘गुड न्यूज’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातही दिलजीत दिसला होता. त्याचवेळी त्याचा ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. 2021 या वर्षात त्याच्या ‘हौसला रख’ या चित्रपटानेही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवला.

हेही वाचा :

Deepika Padukone | मॉडेलिंगपासून ते टॉप अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास, आजघडीला आलिशान आयुष्य जगते दीपिका पदुकोण!

कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?

नृत्यांगना ते अभिनेत्री…‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील ‘पिंकी’ने हेमा मालिनींसोबतही केलंय काम!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.