Happy Birthday Esha Deol | ज्याच्या कानाखाली काढला आवाज, त्याच्याशीच दोनदा बांधली लग्नगाठ! ‘अशी’ होती ईशा देओलची प्रेमकथा…
अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) आणि अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांनी बॉलिवूडवर वर्चस्व गाजवले. पण त्यांच्या मुलींना ही किमया करता आली नाही. हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओल (Esha Deol) हिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, पण अभिनयाच्या बाबतीत ती दूरच राहिली.
मुंबई : अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) आणि अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांनी बॉलिवूडवर वर्चस्व गाजवले. पण त्यांच्या मुलींना ही किमया करता आली नाही. हेमा मालिनी यांची मोठी मुलगी ईशा देओल (Esha Deol) हिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, पण अभिनयाच्या बाबतीत ती दूरच राहिली. 2004 ते 2011पर्यंत चित्रपट कारकिर्दीत ईशाने केवळ 23 चित्रपट केले. यातील काही चित्रपट हिट तर काही फ्लॉप ठरले. ईशा देओलने 2012 मध्ये लग्न केले आणि चित्रपट विश्वाला कायमचा अलविदा केला. भरत तख्तानीसोबत तिने सात फेरे घेतले.
आभिनेत्री ईशा देओल हिने 29 जून 2012 रोजी तिचा बालपणीचा मित्र भरत तख्तानीसोबत लग्न केले. त्यांना राध्या नावाची एक वर्षाची मुलगी आहे. आपले ज्या मुलाशी लग्न व्हावे, तो आपल्या वडिलांप्रमाणे असावा, अशी तिची इच्छा होती.
म्हणून त्याच्या कानाखाली आवाज काढला!
वयाच्या अवघ्या 13व्या वर्षापासून भरतला ईशा देओल आवडत होती. दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत होते. पण शाळेची आंतरशालेय स्पर्धा असायची तेव्हा दोघे भेटायचे. एका मुलाखतीदरम्यान ईशा देओलने सांगितले की, ‘एकदा भरतने माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा, मी त्याला थप्पड मारली होती. त्यावेळी मी त्याला म्हणाले की, तुझी हिंमत कशी झाली माझा हात पकडायची… त्यावेळी आम्ही बालिश होतो.’
10 वर्षांनंतर झाली भेट
या मुलाखतीदरम्यान ईशाने सांगितले की, त्यानंतर मी भरतशी बोलणे बंद केले. अनेक वर्षे दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र, भरतचे ईशावरील प्रेम कधीच कमी झाले नाही. भरत हा ईशाची धाकटी बहीण आहानाचाही जवळचा मित्र होता. 10 वर्षे न बोलल्यानंतर ते दोघेही नायगारा फॉल्स येथे भेटले.
ईशाच्या मनातही प्रेम
त्यावेळी भरतने ईशाला विचारले की, तो तिचा हात धरू शकतो का? यावर ईशा लगेच हो म्हणाली. ईशाच्या मनातही त्याच्याविषयी प्रेम होते. ईशाने संपूर्ण गोष्ट आई हेमा मालिनी यांना जाऊन सांगितली. हेमा मालिनी यांना भेटल्यानंतर भरतने धर्मेंद्र यांची भेट घेतली. दोघे तासभर एकटेच एकमेकांशी बोलले. त्यानंतर दोघांचे लग्न ठरले. लग्नाच्या पाच वर्षांनी ईशा देओल आई झाली. डोहाळ जेवणाच्या सोहळ्यात ईशा आणि भरतने पुन्हा लग्न केले. एका मुलाखतीत ईशा म्हणाली होती, ‘मी पुन्हा लग्न करणार आहे. मी माझ्या नवऱ्याशी पुन्हा लग्न करेन. सिंधी कुटुंबात हा विधी आहे. यामध्ये मी माझ्या वडिलांच्या मांडीवर आणि नंतर माझ्या पतीच्या मांडीवर बसेन.’