Happy Birthday Gulshan Grover | आईने विकले दागिने, वडिलांनी गहाण ठेवले घर आणि अभिनेता बनले गुलशन ग्रोव्हर!
बॉलिवूडचा 'बॅड मॅन' गुलशन ग्रोव्हरचा (Gulshan Grover) आज वाढदिवस आहे. दिल्लीत जन्मलेला गुलशन ग्रोव्हर बॉलिवूडचा खलनायक म्हणून ओळखला गेला. ज्यांनी संपूर्ण जगाला सांगितले की, कोणतीही कथा प्रेक्षकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवण्यासाठी त्यात वाईट माणसाची महत्त्वाची भूमिका असते.
मुंबई : बॉलिवूडचा ‘बॅड मॅन’ गुलशन ग्रोव्हरचा (Gulshan Grover) आज वाढदिवस आहे. दिल्लीत जन्मलेला गुलशन ग्रोव्हर बॉलिवूडचा खलनायक म्हणून ओळखला गेला. ज्यांनी संपूर्ण जगाला सांगितले की, कोणतीही कथा प्रेक्षकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवण्यासाठी त्यात वाईट माणसाची महत्त्वाची भूमिका असते. 80च्या दशकात आपल्या फिल्मी करिअरची सुरवात करणाऱ्या गुलशन ग्रोव्हरने आपल्या चार दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत 450हून अधिक चित्रपट केले आहेत, ज्यात त्यांनी अनेक संस्मरणीय आणि एक उत्तम पात्र साकारले आहे.
खलनायक म्हणून कोणत्याही कलाकारासाठी प्रेक्षकांना स्वतःचा द्वेष करायला भाग पाडणे, त्यांच्या मनात भीती निर्माण करणे खूप आव्हानात्मक असते. प्राण, अमरीश पुरी, प्रेम चोप्रा, रणजीत आणि अमजद खान यांच्यानंतर जर कोणी हा निकष पूर्ण केला असेल तर तो गुलशन ग्रोव्हर आहे. गुलशन ग्रोव्हरचे फिल्मी आयुष्य सर्वांना माहित आहे, पण तो या टप्प्यावर कसा पोहोचला हे जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता होती.
गुलशन ग्रोव्हरने SRCC मधून पूर्ण केले शिक्षण!
गुलशन ग्रोव्हरचा जन्म 21 सप्टेंबर 1955 रोजी दिल्लीत झाला. तो एका पंजाबी कुटुंबातून आला आहे. चित्रपटसृष्टीत अनेकदा असे दिसून आले आहे की, ज्या कलाकारांनी उच्च दर्जा प्राप्त केला आहे ते जास्त शिकलेले नाहीत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, गुलशन ग्रोव्हरने दिल्ली विद्यापीठातील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून मास्टर्स शिक्षण पूर्ण केले आहे. गुलशन ग्रोव्हरला शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. तो बस स्टँडपर्यंत 9 किलोमीटर चालत जायचा आणि नंतर कॉलेज गाठण्यासाठी तीन बस बदलून जायचा.
वडिलांनी दिला 6 महिन्यांचा अल्टिमेटम
गुलशन ग्रोव्हरला थिएटरची आवड होती. त्याला मुंबईत जाऊन चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवायचा होता. एक दिवस त्याने त्याच्या वडिलांना याबद्दल विचारले, प्रथम त्यांनी नकार दिला, परंतु नंतर त्यांनी गुलशन ग्रोव्हरला आपले नशीब आजमावण्यासाठी सहा महिने दिले. गुलशन ग्रोव्हरने आपल्या ‘बॅड मॅन’ या आत्मचरित्रात याचा उल्लेख केला आहे. जेव्हा, तो मुंबईला पोहोचला तेव्हा त्याने काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला पण त्याला यश मिळाले नाही. तो निराश झाला. एके दिवशी गुलशन ग्रोव्हरने आपले सामान बांधले आणि दिल्ली गाठली, कारण तो काम मिळवण्याच्या लढाईत हरला होता.
गुलशन ग्रोव्हर आपल्या आत्मचरित्रात लिहितो की, ‘जरी ते जास्त काही बोलले नाही तरी माझे पालक आणि भावंडे मला पाहून खरोखरच हादरले. मी सांगाड्यासारखा दिसत होतो. जेवण मिळत नव्हतं, डोळे आता गेले होते. मुंबईला जाण्यापूर्वी मी चार्टर्ड अकाउंटंटची कठीण परीक्षा पास केली होती, त्यामुळे मला बँकेकडून नोकरीच्या ऑफरही मिळत होत्या. एवढेच नाही तर मला माझ्या कॉलेजकडून प्राध्यापक आणि SRCC च्या ड्रामाटिक सोसायटीचे प्रमुख होण्यासाठी ऑफर देखील येत होत्या. जग माझ्या मागे उभे राहिले, पण माझे हृदय अजूनही मुंबईतच होते.’
गुलशन ग्रोव्हरच्या आईने दागिने विकले, वडिलांनी घर गहाण ठेवले!
मुंबईला परत जाण्याच्या त्याच्या योजनांबद्दल बोलताना, अभिनेत्याने लिहिले, ‘मी माझ्या वडिलांशी पुन्हा बोललो आणि त्यांना सांगितले की, मला मुंबईला परत जावे लागेल जरी त्या शहराने माझ्याशी वाईट वागणूक दिली असली तरी यावेळी मला करावे लागेल. मला वेळेची गरज आहे जेणेकरून मी प्रशिक्षण घेऊन अभिनेता म्हणून माझी कुवत आणि माझी ताकद समजू शकेन. मला माहित होते की, या प्रशिक्षणासाठी खूप खर्च येईल, ज्यासाठी खूप पैसे लागतील, परंतु माझ्या पालकांनी नकार दिला नाही. मला वाटते की, चायजीने (आई) तिचे दागिने विकले असावेत आणि वडीलांनी आम्ही राहत होतो ते घर गहाण ठेवले होते. त्यांनी हे सर्व कोणत्याही अडचणींशिवाय आणि मला न सांगता केले.
यानंतर गुलशन ग्रोव्हर थेट पुण्यात पोहचला, जिथे तो एफटीआयआय मध्ये अभिनय अभ्यासक्रमात सामील झाला, पण इथेही त्याचे नशीब त्याला साथ देत नव्हते. FTII मधील अभिनय अभ्यासक्रम एका आंदोलनामुळे बंद करण्यात आला. तेथून तो मुंबईला परतला, जिथे त्याने रोशन तनेजा अभिनय शाळेत प्रवेश घेतला. येथून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. कोर्स दरम्यान, तो अनेक दिग्गज कलाकारांना भेटला.
मात्र, गुलशन ग्रोव्हरचा त्रास अजून संपलेला नव्हता. अभ्यासक्रम पूर्ण करूनही त्याला अनेक वर्षे संघर्ष करावा लागला, त्यानंतर रोशन तनेजाने त्याला चित्रपटात काम मिळेपर्यंत त्याच्या शाळेत नोकरीची ऑफर दिली. यानंतर गुलशनचा पहिला चित्रपट ‘हम पाच’ हा 1980मध्ये प्रदर्शित झाला आणि त्यानंतर तो 1981मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी’ चित्रपटात संजय दत्तसोबत दिसला. आता गुलशन ग्रोव्हरच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत होते.
हेही वाचा :
राज कुंद्राच्या जामीनानंतर शिल्पा शेट्टीची सोशल मीडिया पोस्ट, चाहत्यांमध्ये सुरुये जोरदार चर्चा!