Happy Birthday Hema Malini | धर्मेंद्र यांना भेटायला घातली होती बंदी, चित्रीकरणावरही हेमा मालिनींसोबत सेटवर जायचे वडील!

बॉलीवूडमध्ये हेमा मालिनी (Hema Malini) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या प्रेमकथेबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. शोले चित्रपटाच्या वेळीही हेमा मालिनी त्यांच्या प्रेमाच्या चर्चांमुळे वर्तमानपत्र आणि मासिकांच्या मथळ्यांमध्ये असायच्या. पण तुम्हाला माहिती आहे का, की जेव्हा दोघांमध्ये प्रेम फुलले तेव्हा हेमा मालिनी यांचे वडील या नात्याच्या विरोधात होते.

Happy Birthday Hema Malini | धर्मेंद्र यांना भेटायला घातली होती बंदी, चित्रीकरणावरही हेमा मालिनींसोबत सेटवर जायचे वडील!
Hema Malini
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 9:44 AM

मुंबई : बॉलीवूडमध्ये हेमा मालिनी (Hema Malini) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या प्रेमकथेबद्दल अनेक कथा प्रसिद्ध आहेत. शोले चित्रपटाच्या वेळीही हेमा मालिनी त्यांच्या प्रेमाच्या चर्चांमुळे वर्तमानपत्र आणि मासिकांच्या मथळ्यांमध्ये असायच्या. पण तुम्हाला माहिती आहे का, की जेव्हा दोघांमध्ये प्रेम फुलले तेव्हा हेमा मालिनी यांचे वडील या नात्याच्या विरोधात होते. हेमा मालिनीने अभिनेता धर्मेंद्रला भेटून त्याच्याशी जवळीक साधायची नाही, अशी तंबी त्यांना मिळाली होती. यामुळे, हेमा मालिनी शूटिंगला जात असताना, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य शूटिंगला उपस्थित असायचे.

कधीकधी त्यांचे त्यांच्यासोबत वडील शूटला पोहोचत असत. त्यांना सतत नजरबंद ठेवण्यात येत होते आणि दोघांच्या भेटीवर बंदी घालण्यात आली होती. हेमा मालिनीला कोणत्याही वेळी धर्मेंद्रच्या संपर्कात येऊ नये म्हणून सतत नजर ठेवण्यात आली होती. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त (16 ऑक्टोबर 1948) त्यांच्या जीवनाशी संबंधित हा किस्सा जाणून घेऊया…

शूटिंगमध्ये कुटुंबातील सदस्य देखील असायचे!

अभिनेत्री हेमा मालिनी हे त्या काळात एक मोठे नाव बनले होते. पण कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या मुलीचे नाव आधीच विवाहित धर्मेंद्रशी जोडले जावे, असे वाटत नव्हते. म्हणूनच त्याची आई आणि काकू दोघेही शूटिंग दरम्यान अनेकदा सेटवर येत असत.

वडील ठेवायचे सतत नजर

कुटुंबातील सदस्यांना हेमा मालिनीच्या नात्याबद्दल कळू लागले आणि नंतर त्यांच्या वडिलांना त्यांच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. घरी येणाऱ्या सर्व फोनपासून ते शूटिंगपर्यंत, ते अचानक तिथे हजार होत असत. हेमा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, शोले चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान तिचे वडील अचानक सेटवर पोहोचले होते, जेणेकरून ती धर्मेंद्र त्यांच्या जवळ येऊ शकले नाहीत.

कारमध्ये देखील सोबत असायचे वडील

हेमा मालिनी म्हणाल्या की, अनेकदा शूटिंग दरम्यान किंवा नंतर माझे वडील माझ्यासोबत ताबडतोब कारमध्ये बसायचे. जेणेकरून मी धर्मेंद्रसोबत कारमध्ये प्रवास करू शकणार नाही. ते अनेकदा गाडीच्या पुढच्या सीटवर आधीच जाऊन बसायचे.  1970च्या दशकात धर्मेंद्र यांचे प्रेम हेमा मालिनीवर जडले होते. लाख प्रयत्नांनंतरही 1980 मध्ये धर्मेंद्रने आपला धर्म बदलला आणि हेमा मालिनी यांच्याशी दुसरे लग्न केले.

बॉलिवूड इंडस्ट्रीची ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनीने 1980 मध्ये धर्मेंद्रशी लग्न केले. त्यावेळी धर्मेंद्र प्रकाश कौरसोबत आधीच वैवाहिक जीवन जगत होते आणि ते चार मुलांचे बापही होते. पण असे असूनही हेमा धर्मेंद्रशी लग्न करण्यास आणि चार मुलांची सावत्र आई होण्यास तयार झाल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओल आणि हेमा मालिनी यांच्यात फक्त 9 वर्षांचा फरक आहे. हेमा सनीपेक्षा केवळ 9 वर्षांनी मोठ्या आहेत. मात्र, धर्मेंद्रच्या चार मुलांनी हेमा मालिनीला कधीही आईचा दर्जा दिला नाही.

हेही वाचा :

Monalisa : मोनालिसाने थाय स्लिट गाऊनमध्ये केला कहर, फोटो पाहून चाहते घायाळ

200 कोटींचं मनी लाँड्रिंग प्रकरण, दुसऱ्यांदा समन्स बजावूनही जॅकलिन फर्नांडिस ईडीसमोर गैरहजर!

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.