Happy Birthday Kay Kay Menon | जाहिरात कंपनीसाठी काम करायचे के के मेनन, असा सुरु झाला होता चित्रपटसृष्टीतील प्रवास…

‘ब्लॅक फ्रायडे’, ‘लाइफ इन अ मेट्रो’ आणि ‘हैदर’सह अनेक बॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते के के मेनन (Kay Kay Menon) 2 ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा करतात.

Happy Birthday Kay Kay Menon | जाहिरात कंपनीसाठी काम करायचे के के मेनन, असा सुरु झाला होता चित्रपटसृष्टीतील प्रवास...
Kay Kay Menon
| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 8:06 AM

मुंबई : ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘लाइफ इन अ मेट्रो’ आणि ‘हैदर’सह अनेक बॉलिवूड ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते के के मेनन (Kay Kay Menon) 2 ऑक्टोबर रोजी आपला वाढदिवस साजरा करतात. के के मेनन चित्रपटांमध्ये त्याच्या वेगळ्या आणि विशेष पात्रांसाठी ओळखले जातात. त्याने अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या वेगवेगळ्या पात्रांसह मोठ्या पडद्यावर एक अमिट छाप सोडली आहे.

अभिनेते के के मेनन यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1966 रोजी केरळमध्ये झाला, पण त्यांचे संगोपन पुण्यात झाले. के के मेनन यांनी शालेय शिक्षण देखील पुण्यातूनच केले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. सुरुवातीला के के मेनन एका जाहिरात कंपनीत काम करायचे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. जिथे त्यांची भेट अभिनेत्री निवेदिता भट्टाचार्य यांच्याशी झाली.

थिएटरपासून सुरुवात

के के मेनन यांनी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत प्रथम थिएटरमध्ये काम केले होते. त्यानंतर त्यांनी बराच काळ थिएटरमध्ये काम केले. के के मेनन यांना 1995 मध्ये ‘नसीम’ या चित्रपटात अभिनयाची पहिली संधी मिळाली. या चित्रपटात त्यांची छोटी भूमिका होती. या चित्रपटानंतर के के मेनन अनेक उत्तम चित्रपटांमध्ये दिसले. हळूहळू त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने मोहित केली.

वैक्तिक आयुष्य

के के मेनन यांनी ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘गुलाल’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘हैदर’, ‘बेबी’, ‘गाझी अटॅक’ आणि ‘वोडका डायरी’ यासह अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. के के मेनन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी अभिनेत्री निवेदिता भट्टाचार्यशी लग्न केले आहे. के के मेनन यांनी अभिनय विश्वात संघर्ष सुरू केल्यापासून निवेदिता त्यांच्यासोबत आहेत. ही तीच अभिनेत्री निवेदिता आहे, जिने ‘कुंडली’ आणि ‘सात फेरे’ यासह अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

अशी झाली भेट!

निवेदिता मुंबईतील थिएटर प्रॉडक्शनमध्ये काम करत होती, जेव्हा तिची भेट के के मेनन यांच्यासोबत झाली. यानंतर, भेटींचा सिलसिला सुरू झाला आणि दोघांनी काही वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न केले. निवेदिता यांनी देखील काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. पतीसोबत, निवेदिता 1999च्या अनुराग कश्यपचा लघुपट ‘लास्ट ट्रेन टू महाकाली’ मध्ये दिसली होती. निवेदिता, प्रीती झिंटा आणि सैफ अली खानच्या ‘क्या कहना’ चित्रपटात सैफची बहीण बनली होती.

हेही वाचा :

अभिनेत्री मानसी नाईककडे ‘गुडन्यूज’? बेबी बंप फोटोने सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

Mouni Roy | मौनी रॉय लवकरच ‘नवरीबाई’ बनणार, ‘या’ व्यावसायिकाशी बांधणार लग्नगाठ!

Shiddat Movie Review : प्रेमकथेवर आधारित चित्रपटात सनी कौशल-राधिका मदनचा दमदार अभिनय, वाचा कसा आहे ‘शिद्दत’?

Rubina Dilaik | मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर लाल बिकीनीत रुबिना दिलैकचा सिझलिंग अवतार, पाहा फोटो…