Happy Birthday Kimi Katkar | ‘जुम्मा चुम्मा’ गर्ल किमी काटकर, मनोरंजन विश्वात आल्यावर बदलले नाव!

तुम्ही 90च्या दशकातील चित्रपट पाहत असाल, तर कदाचित तुम्ही 'जुम्मा-चुम्मा दे दे' हे गाणे नक्कीच पहिले असेल. या गाण्यावर अमिताभ बच्चन आणि किमी काटकरचा (Kimi Katkar) डान्सही तुम्हाला आठवत असेल.

Happy Birthday Kimi Katkar | ‘जुम्मा चुम्मा’ गर्ल किमी काटकर, मनोरंजन विश्वात आल्यावर बदलले नाव!
Kimi Katkar
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 8:00 AM

मुंबई : तुम्ही 90च्या दशकातील चित्रपट पाहत असाल, तर कदाचित तुम्ही ‘जुम्मा-चुम्मा दे दे’ हे गाणे नक्कीच पहिले असेल. या गाण्यावर अमिताभ बच्चन आणि किमी काटकरचा (Kimi Katkar) डान्सही तुम्हाला आठवत असेल. 11 डिसेंबर 1965 रोजी जन्मलेली किमी आज 56 वर्षांच्या झाल्या आहेत.

किमी काटकर यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. किमी यांनी जेव्हा फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले तेव्हा त्या केवळ 20 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अभिनयाची सुरुवात ‘पत्थर दिल’ या चित्रपटातून झाली होती, ज्यामध्ये त्या सहाय्यक अभिनेत्री होत्या. त्याच वर्षी किमीला ‘Adventures of Tarzan’ हा चित्रपट मिळाला.

‘टारझन गर्ल’ नावाने मिळाली ओळख!

किमी काटकरला त्यांच्या पदार्पणाच्या पहिल्याच वर्षी ‘अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टारझन’ हा चित्रपट मिळाला आणि याच काळात लोक त्यांना ‘टारझन गर्ल’ म्हणून ओळखू लागते. हा किमीचा पहिला मुख्य चित्रपट होता आणि चित्रपटातील अभिनेता हेमंत बिजरेला ‘इंडियन टारझन’ हे नाव मिळाले, तर अभिनेत्री किमी यांना त्यांच्या कामुक दृश्यांमुळे प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट खूप हिट झाला आणि लोकांना किमीची बोल्ड स्टाईल आवडली.

यानंतर किमी काटकरने ‘वर्दी’, ‘मर्द की जुबान’, ‘मेरा लहू’, ‘दरिया दिल’, ‘गैरकानूनी’, जैसी करनी वैसी भरनी, ‘शेरदिल’, ‘जुलम की हुकूमत’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण किमीला जी लोकप्रियता मिळाली ती ‘टारझन’ या चित्रपटातून! इतर कोणत्याही चित्रपटातून तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. किमी अनेक वर्षांपर्यंत किमी ‘टारझन गर्ल’ म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यानंतर एक चित्रपट आला, ज्याने किमी या नवीन यांना नवी ओळख मिळवून दिली.

‘हम’ चित्रपटानंतर ‘जुम्मा गर्ल’ म्हणून ओळख!

1991 मध्ये आलेल्या ‘हम’ या चित्रपटात किमी काटकर अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकल्या होत्या. या चित्रपटात किमी आणि अमिताभ व्यतिरिक्त गोविंदा, रजनीकांत, अनुपम खेर, डॅनी डेन्झोम्पा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील ‘जुम्मा-चुम्मा’ हे गाणे इतके प्रसिद्ध झाले की, त्याच चित्रपटातील गाण्यासाठी किमीची आठवण काढली जाते. हा चित्रपट करत असताना अमिताभ 50 वर्षांचे होते आणि किमी 26 वर्षांच्या होत्या आणि दोघेही जोडी म्हणून हा चित्रपट करत होते.

चित्रपटांमध्ये आल्यावर बदलले नाव!

किमीचे खरे नाव नयनतारा काटकर होते, हे फार कमी लोकांना माहीत आहे. चित्रपटात प्रवेश करण्यासाठी त्यांनी आपले नाव बदलून किमी काटकर ठेवले. किमी काटकर यांनी यश चोप्राचा ‘परंपरा’ चित्रपट करण्यास नकार दिल्याचे फार कमी लोकांना ठाऊक आहे. यानंतर ‘बाहुबली’ फेम रम्या कृष्णनने हा चित्रपट केला. यानंतर किमीने फिल्मी जगापासून लांब जाण्यास सुरुवात केली. किमी यांचा शेवटचा चित्रपट 1992 मध्ये आला. या चित्रपटाचे नाव ‘हमला’ होते. त्यानंतर किमी यांनी मनोरंजन विश्वाला अलविदा केला आणि लग्नगाठ बांधली. 80-90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने फोटोग्राफर शंतनू शौरीशी लग्न केले. यानंतर किमी ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली होती. किमी आणि शंतनूला एक मुलगा सिद्धार्थ असून तो ऑस्ट्रेलियात राहतो.

हेही वाचा :

आम्हीही आंतरजातीय विवाह केला, तरीही तू स्वीकारलंस! मग कीर्तीच्या आईला का नाही जमलं?, अभिनेत्रीची पोस्ट होतेय व्हायरल!

Urfi Javed | निळ्या बिकिनीमध्ये उर्फी जावेदने वाढवला इंटरनेटचा पारा, हॉट फोटो पाहून चाहते म्हणतायत…

Anushka Sharma | ‘निदान आतातरी तुमच्या घरातील बांधकामाचा आवाज बंद होईल…’, अनुष्काकडून कॅट-विकीला हटके शुभेच्छा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.