Happy Birthday Konkona Sen Sharma | लग्नाआधीच आई होण्याची चाहूल, तब्बल 10 वर्षांनंतर कोंकणा सेन शर्माने मोडला संसार!
बॉलिवूडची उत्कृष्ट अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) ही कलेला समर्पित अशी कलाकार आहे. तिच्या दमदार अभिनयामुळे कोंकणाला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. कोंकणा ही चित्रपटांची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहे.
मुंबई : बॉलिवूडची उत्कृष्ट अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) ही कलेला समर्पित अशी कलाकार आहे. तिच्या दमदार अभिनयामुळे कोंकणाला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. कोंकणा ही चित्रपटांची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहे. तिची आई अपर्णा सेन या त्यांच्या काळातील एक उत्तम अभिनेत्री होत्या. कोंकणाचा जन्म 3 डिसेंबर 1979 रोजी झाला.
कोंकणाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले, तर तिचे वडील मुकुल शर्मा पत्रकार होते आणि आई अपर्णा सेन या दिग्दर्शक आणि अभिनेत्री होत्या. कोंकणा 2002 मध्ये आलेल्या ‘तितली’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिले, तर तिच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले.
बालकलाकार म्हणून पदार्पण
चित्रपटांची पार्श्वभूमी असल्याने कोंकणा सेनने लहानपणापासूनच मनोरंजन विश्वात काम करायला सुरुवात केली होती. 1983 मध्ये आलेल्या ‘इंदिरा’ या चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर तिने एका बंगाली चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ या इंग्रजी चित्रपटाने तिला मनोरंजन विश्वात खऱ्या अर्थाने ओळख निर्माण करण्यात मदत केली. या चित्रपटामधील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले आणि तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
रणवीर शौरीसोबत बांधली लग्नगाठ
2005 मध्ये कोंकणाने मधुर भांडारकरच्या ‘पेज 3’ चित्रपटात पत्रकाराची भूमिका केली होती आणि या चित्रपटासाठीही तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कोंकणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, सप्टेंबर 2010 मध्ये तिने तिचा प्रियकर रणवीर शौरी याच्यासोबत एका खाजगी समारंभात लग्न केले होते. लग्नानंतर काही दिवसांतच दोघेही आई-वडील झाल्याची बातमी आली होती.
लग्नाआधीच मातृत्वाची चाहूल
3 सप्टेंबर 2010 रोजी त्यांचे लग्न झाले आणि 15 मार्च 2011 रोजी कोंकणाने एका मुलाला जन्म दिला. लग्नानंतर सहा महिन्यांनी कोंकणाने मुलाला जन्म दिल्याने ती लग्नाआधीच गरोदर स्पष्ट झाले होते. मात्र, रणवीरसोबतचे तिचे नाते फार काळ टिकले नाही आणि त्यानंतर 2015 मध्ये दोघेही वेगळे राहू लागले. कोंकणा आणि रणवीर यांचा 13 ऑगस्ट 2020 रोजी घटस्फोट झाला. आता कोंकणा तिच्या मुलासोबत राहते.
अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय!
कोंकणाच्या चर्चित चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘वेक अप सिड’, ‘पेज 3’, ‘लाईफ इन अ मेट्रो’, ‘लागा चुनरी में दाग’, ‘दोसार’, ‘15 पार्क एव्हेन्यू’ यांसारख्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या सर्वच चित्रपटांतील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
हेही वाचा :
Video | चक्क लुंगी परिधान करून शॉपिंगला निघालीये उर्वशी रौतेला! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल!