Happy Birthday Lata Mangeshkar | ‘लग जा गले’ ते ‘अजीब दास्तान’पर्यंत, ऐका लता मंगेशकर यांची सुरेल गाणी!

आज (28 सप्टेंबर) स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा वाढदिवस आहे. लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी, त्यांची सर्वोत्तम आणि हिट गाणी ऐका ज्यांची जादू आजही कायम आहे.

Happy Birthday Lata Mangeshkar | ‘लग जा गले’ ते ‘अजीब दास्तान’पर्यंत, ऐका लता मंगेशकर यांची सुरेल गाणी!
Lata Mangeshkar
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 10:29 AM

मुंबई : आज (28 सप्टेंबर) स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा वाढदिवस आहे. लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी, त्यांची सर्वोत्तम आणि हिट गाणी ऐका ज्यांची जादू आजही कायम आहे.

भारताची गानकोकिळा लोकप्रिय गायिका लता मंगेशकर यांचा आवाज आणि त्यांच्या गाण्यांचे बरेच चाहते आहेत. 7 दशकांपासून चित्रपटांमध्ये आपल्या आवाजाची जादू करणाऱ्या लता मंगेशकर यांनी 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. लता यांच्या आवाजात असा काही गोडवा आहे की, जर कोणी त्यांची गाणी ऐकली तर, ती व्यक्ती त्यातच हरवून जायची. आजही लता मंगेशकरांच्या गाण्यांची जादू कायम आहे.

असं म्हणतात की, लता मंगेशकर यांच्यासारखी गायिका होणे नाही. संगीत उद्योगात त्यांना देवाचा दर्जा दिला जातो. आज, लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला त्यांची हिट आणि लोकप्रिय गाणी ऐकवणार आहोत, ज्यामुळे तुमचा दिवस नक्कीच आनंदी जाईल….

सत्यम शिवम सुंदरम

हे गाणे सोपे नव्हते, पण ज्या सहजतेने लता मंगेशकरांनी हे गाणे गायले, त्याची जादू आजही कायम आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी राज कपूर यांच्या चित्रपटासाठी हे गाणे तयार केले होते, ज्यात लता मंगेशकर यांनी आपला आवाज दिला होता.

ऐ मेरे वतन के लोगो

हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत आणि गाणी महत्त्वाची भूमिका बजावतात. चित्रपटाची अर्धी कथा गाण्यांमधूनच समजते. लता मंगेशकर जितकी रोमँटिक गाणी म्हणायच्या तितकीच त्या देशभक्तीपर गाण्यांमध्येही जीव ओतयच्या. आजही जेव्हा आपण स्वातंत्र्यदिनी किंवा 26 जानेवारीला लता मंगेशकरांचे गीत ‘ए मेरे वतन के लोग ऐकतो’, तेव्हा लता मंगेशकरांचा चेहरा समोर येतो.

ए दिल ए नादान

दिवंगत संगीतकार खय्याम आणि लता मंगेशकर यांच्या जोडीने हे सुंदर गाणे तयार केले होते. हे 80च्या दशकातील सर्वोत्कृष्ट शास्त्रीय गाणे आहे. हेमा मालिनी यांच्यावर चित्रित केलेले हे गाणे खूप हिट झाले आणि आजही चाहत्यांच्या हृदयात आहे.

लग जा गले

मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत लता मंगेशकरांपेक्षा चांगले कोणी गाऊ शकले नसते. राजा मेहदी अली खान यांचे बोल आणि लतादीदींचा आवाज मिळून हे गाणे बनले आहे, जे थेट ऐकणाऱ्याच्या हृदयाला स्पर्श करते.

अजीब दास्तान है ये

शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले, या गाण्याचे संगीत सुंदर होते, पण लता मंगेशकरांचा आवाज त्याच्याशी जोडताच या गाण्याने आणखी जादू दाखवली. हे गाणे आजही रसिकांच्या हृदयात आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Lata Mangeshkar | प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणारं नाव ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर, एका गाण्यासाठी करायच्या दिवसभर मेहनत!

Happy Birthday Ranbir Kapoor | अभ्यासाचा नेहमीच कंटाळा, पार्टीत ऐश्वर्या रायला देखील रणबीर कपूरने सांगितले होते खोटे मार्क्स!

'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?
'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?.
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार.
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी.
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?.
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा.
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?.
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची...
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची....
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात.
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.