मुंबई : चित्रपट निर्माते महेश भट्ट (Mahesh Bhatt) हे नेहमीच चर्चांचा भाग असतात. ते इंडस्ट्रीमधील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण, त्यांचे वादांशी जुने नाते आहे. त्यांच्या विधानांमुळे ते अनेकदा अडचणीत येतात. आज (20 सप्टेंबर) महेश भट्ट आपला 73वा वाढदिवस साजरा करत आहेत.
महेश भट्ट त्याच्या विवाहबाह्य संबंध आणि कधीकाळी मुलगी पूजा बेदीसोबत चुंबन फोटो देऊन वादांचा भाग बनले होते.
महेश भट्ट यांचे पहिले लग्न किरण भट्ट बरोबर झाले. त्यांचे लव्ह मॅरेज होते, पण या नात्यात दुरावा आला जेव्हा महेश भट्ट आणि परवीन बाबीच्या नात्याच्या बातम्या चर्चेत येऊ लागल्या. महेश भट्ट यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, परवीन बाबी यांच्याशी त्यांचे संबंध 1977 साली सुरू झाले. त्या इटलीहून भारतात परतल्या होत्या आणि त्यांचे कबीर बेदीसोबत ब्रेकअप झाले होते. त्यानंतर त्यांचे संबंध सुरू झाले. विवाहित असूनही महेश भट्ट परवीन बाबीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत होते. काही काळानंतर महेश यांनी त्यांना सोडले. तर काही काळानंतर तिने निरोप घेऊन हे जग सोडले. परवीन बाबीच्या मृत्यूनंतर महेश भट्टवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
महेश भट्टने स्वतःच्या मुलीला लिप किस केले. त्याचा हा फोटो स्टारडस्ट मासिकावर छापला गेला. या फोटोमुळे तयांच्यावर बरीच टीका झाली. या फोटोनंतर महेश भट्ट आणि त्यांची मुलगी पूजा यांच्यातील संबंध चर्चेत आले होते.
गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित झाले होते. त्या दरम्यान जिया खान आणि महेश भट्ट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांच्या जवळ उभे होते आणि एकमेकांचा हात धरत होते. या व्हिडीओमध्ये दोघेही बोलताना आणि हसताना दिसत होते. या व्हिडीओनंतर महेश भट्टवर बरीच टीका झाली. रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ जिया 16 वर्षांची होती तेव्हाचा आहे.
कंगनाची बहीण रंगोलीने गेल्या वर्षी महेश भट्टवर अनेक आरोप केले होते. महेश भट्टने कंगनासोबत गैरवर्तन केल्याचे तिने म्हटले होते. कंगनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, महेश भट्टने तिला वेडी म्हटले होते आणि चप्पल फेकून तिला मारले होते. तिने सांगितले होते की, हा प्रसंग चित्रपट ‘वो लम्हे’च्या काळातला आहे. महेश भट्ट यांनी तिला स्वतःच्याच चित्रपटच्या प्रदर्शनाला जाऊ दिले नाही.
राज कुंद्राचे दोन साथीदार अद्याप मोकाटच, दोघेही परदेशात असल्याने अटक नाही