Happy Birthday Manoj Kumar | दिलीप कुमारांमुळे मनोज कुमार यांनी बदलले नाव, चित्रपट विश्वातून निर्माण केली स्वतःची नवी ओळख!

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बरीच वर्षे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘रोटी, कापडा और मकान’, ‘पुरब और पश्चिम’, ‘क्रांती’ आणि ‘उपकार’ हे त्यांचे चित्रपट आजही सर्वांना खूप आवडतात.

Happy Birthday Manoj Kumar | दिलीप कुमारांमुळे मनोज कुमार यांनी बदलले नाव, चित्रपट विश्वातून निर्माण केली स्वतःची नवी ओळख!
मनोज कुमार
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 10:30 AM

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बरीच वर्षे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘रोटी, कापडा और मकान’, ‘पुरब और पश्चिम’, ‘क्रांती’ आणि ‘उपकार’ हे त्यांचे चित्रपट आजही सर्वांना खूप आवडतात. या चित्रपटांमधील त्यांची पात्रे बॉलिवूडमध्ये अमर झाली आहेत. अभिनेते मनोज कुमार आज (24 जुलै) आपला 84वा वाढदिवस साजरा करत आहेत.

मनोज कुमार हे त्यांचे खरे नाव नव्हते. जेव्हा त्यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला, तेव्हा त्यांनी हे नाव बदलले आणि त्यामागे दिलीप कुमार यांचे खास कनेक्शन आहे. मनोज कुमार यांचा जन्म एबटाबाद पाकिस्तानमध्ये झाला आणि फाळणीनंतर ते आपल्या कुटूंबासह भारतात आले. त्यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी आहे. पण आज लोक त्यांना मनोज कुमार किंवा भारत कुमार म्हणून ओळखतात.

दिलीप कुमार यांच्या ‘शबनम’ या चित्रपटामुळे झाले प्रभावित

मनोज कुमार. दिलीप कुमार यांच्या अभिनयाचे दिवाने होते. 11 वर्षांचे असताना त्यांनी ‘शबनम’ हा चित्रपट पाहिला. त्यांना या चित्रपटात दिलीप कुमार यांची भूमिका आवडली, त्यानंतर जेव्हा त्यांनी चित्रपटांमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी आपले नाव बदलून मनोज कुमार असे ठेवले. शबनम चित्रपटात दिलीप कुमार यांच्या पात्राचे नाव मनोज कुमार होते.

दिलीप कुमार यांच्या बरोबर केले काम

अभिनेता मनोज कुमार यांनी प्रेरित होऊन आपले नाव बदलण्याचे ठरवले होते. मनोज कुमार आणि दिलीप कुमार यांनी ‘शहीद’, ‘आम आदमी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. इतकेच नाही तर, दिलीप कुमार यांच्यासाठी दिग्दर्शन करण्याची संधीही मिळाली. दोघांनी पुन्हा एकदा ‘क्रांती’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. मनोज कुमार आणि दिलीप कुमार यांच्यासह या चित्रपटात शशी कपूर, हेमा मालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज कुमार यांनी केले होते आणि त्याची निर्मिती देखील केली होती.

मनोज कुमार यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये देशभक्ती जागृत केली होती. आजही त्यांचे चित्रपट सर्व उत्साहाने पाहतात. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. मनोज कुमार यांना 1992मध्ये ‘पद्मश्री’ आणि 2015मध्ये ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मनोज कुमार यांचे मनोरंजन विश्वात मोठे योगदान आहे.

(Happy Birthday Manoj Kumar actor changed his name after watching dilip kumar’s movie)

हेही वाचा :

Khoya Khoya Chand | अभिनयात जम बसवता आला नाही म्हणून निर्माता बनला, आता ओळखूही येत नाही ‘तुम बिन’चा ‘हा’ अभिनेता!

जेव्हा रडणाऱ्या अमिताभ बच्चन यांना मेहमूद प्रोत्साहन देतात… वाचा ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटाचा मजेशीर किस्सा!

सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.