Happy Birthday Mumtaz | आपल्या जीवाची बाजी लावत मुमताजने वाचवला होता ‘या’ बॉलिवूड सुपरस्टारचा जीव!

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मुमताज (Mumtaz) स्वभावाने अतिशय शांत अभिनेत्री होती. जवळच्यांना भरपूर प्रेम देणे ही अभिनेत्रीची खरी ओळख होती. आज या प्रसिद्ध अभिनेत्रीचा वाढदिवस आहे, जिने चित्रपटांतून आपल्याला उत्तम गाणी आणि दमदार अभिनय पाहण्याची संधी दिली.

Happy Birthday Mumtaz | आपल्या जीवाची बाजी लावत मुमताजने वाचवला होता ‘या’ बॉलिवूड सुपरस्टारचा जीव!
मुमताझ
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 11:55 AM

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मुमताज (Mumtaz) स्वभावाने अतिशय शांत अभिनेत्री होती. जवळच्यांना भरपूर प्रेम देणे ही अभिनेत्रीची खरी ओळख होती. आज या प्रसिद्ध अभिनेत्रीचा वाढदिवस आहे, जिने चित्रपटांतून आपल्याला उत्तम गाणी आणि दमदार अभिनय पाहण्याची संधी दिली. मुमताजची सर्वोत्कृष्ट जोडी राजेश खन्नासोबत जुळली होती.  प्रेक्षकांना देखील ही जोडी खूप आवडली होती. असे म्हटले जाते की, राजेश खन्नांनी दिलेल्या बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपटांपैकी बहुतांश चित्रपटांमध्ये आपल्याला मुमताज त्यांच्यासोबत पाहायला मिळतील.

या जोडीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर यात ‘दो रास्ते’ (1969), ‘आप की कसम’ (1974), ‘प्रेम कहानी’ (1975), ‘दुश्मन’ (1971), ‘सच्चा झूठा’ (1970), ‘अपना देश’ (1972), ‘रोटी’ (1974), ‘बंधन’ (1969) सारखे अनेक चित्रपट आहेत. पण पडद्यावर या जोडीची केमिस्ट्री जितकी चांगली दिसत होती, तितकेच वास्तविक जीवनातही ही जोडी खूप हसायची आणि खूप धमाल करायची.

माध्यमाच्या एका वृत्तानुसार, एक काळ होता जेव्हा मुमताजने आपल्या जीवाची बाजी लावत राजेश खन्नाचा जीव वाचवला होता. भारतात राजेश खन्ना यांच्या लोकप्रियतेला काही मर्यादाच नव्हती. रक्ताने लिहिलेली पत्रे मिळणे अगदीच सामान्य होते, त्यांच्या येण्या-जाण्याचे रस्ते देखील जाम असत. ही गोष्ट 1971ची आहे, जेव्हा मुमताज आणि राजेश खन्ना एका गावात त्यांच्या ‘दुश्मन’ चित्रपटाचे शूटिंग करत होते. शूटिंग गावात चालू होते, ज्यामुळे क्रू देखील कमी होता आणि शूटिंग दरम्यान कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती.

नेमकं काय झालं?

चित्रपटाचा नायक राजेश खन्ना आहे, हे गावकऱ्यांना समजताच संपूर्ण गाव त्यांना भेटण्यासाठी एकत्र धावले. ही गोष्ट देखील जवळच्या गावातदेखील पसरली. ज्यामुळे शेकडो लोक अर्ध्या तासात राजेश खन्नाला पाहण्यासाठी जमले. लोकांची गर्दी बाहेर वाढू लागली. राजेश खन्ना आपला शॉट देण्यासाठी घराबाहेर पडताच लोकांनी त्यांना भेटण्यासाठी जवळच बांधलेले बॅरिकेड तोडून आत प्रवेश केला. यावेळी काय करावे हे राजेश खन्नाला समजू शकले नाही. गर्दीतून कोणीतरी त्याचे कपडे ओढत होते आणि कोणीतरी त्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते.

मुमताजने उचलले मोठे पाऊल

मुमताजला माहीत होते की, एका स्त्रीला पाहून सर्व जण बाजूला होतील. यामुळे तिने थेट या गर्दीत प्रवेश केला आणि राजेश खन्नाला बाहेर काढले. जेव्हा राजेश खन्ना त्यांच्या खोलीत सुरक्षित  परत आले, तेव्हा त्यांचे केस पूर्णपणे विखुरलेले दिसले आणि त्यांचा शर्ट देखील होता थोडा फाटलेला होता. या जोडीने त्यांच्या चित्रपटांसाठी खूप मेहनत घेतली होती. ज्यामुळे प्रेक्षकांनीही त्यांना भरभरून प्रेम दिले.

(Happy Birthday Mumtaz actress had saved the life of Bollywood superstar by risking her life)

हेही वाचा :

सीबीआय कोर्ट जिया खान प्रकरणाची सुनावणी करणार, सूरज पंचोलीला दिलासा मिळेणार?

‘बिग बॉस ओटीटी’ची पहिली स्पर्धक जाहीर, ‘ही’ सुप्रसिद्ध गायिका दिसणार BB15च्या घरात!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.