Happy Birthday Prasoon Joshi | ‘माँ’पासून ते ‘हम तुम’पर्यंत, प्रसून जोशींच्या लेखणीतून उतरलेली ‘ही’ गाणी श्रोत्यांच्या कानाला करतात तृप्त!

गीतकार प्रसून जोशी (Prasoon Joshi) यांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. ते एक उत्तम लेखक, कवी, पटकथाकार तसेच गीतकार आहेत. कलेवरचे त्यांचे प्रेम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते. त्यांच्या कामाचे भारतात तसेच, परदेशातही कौतुक होत आहे.

Happy Birthday Prasoon Joshi | ‘माँ’पासून ते ‘हम तुम’पर्यंत, प्रसून जोशींच्या लेखणीतून उतरलेली ‘ही’ गाणी श्रोत्यांच्या कानाला करतात तृप्त!
Prasoon Joshi
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 10:59 AM

मुंबई : गीतकार प्रसून जोशी (Prasoon Joshi) यांना कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. ते एक उत्तम लेखक, कवी, पटकथाकार तसेच गीतकार आहेत. कलेवरचे त्यांचे प्रेम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येते. त्यांच्या कामाचे भारतात तसेच, परदेशातही कौतुक होत आहे. प्रसून जोशी आज आपला 50वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 16 सप्टेंबर 1971 रोजी उत्तराखंडमध्ये झाला. प्रसून यांनी वयाच्या 17व्या वर्षी पहिले पुस्तक लिहिले.

प्रसून यांनी 2001 मध्ये ‘लज्जा’ या चित्रपटातून गीतकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे त्यांना लवकरच खूप प्रसिद्धी मिळाली. प्रसून जोशी यांनी अनेक चित्रपटांचे संवाद लिहिले आहेत, यासोबतच त्यांनी अनेक गाण्यांचे बोल लिहिले, जे सुपरहिट ठरले.

आज (16 सप्टेंबर), प्रसून जोशीच्या वाढदिवसानिमित्त, त्यांनी लिहिलेल्या गाण्यांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी श्रोत्यांचे कान तृप्त झाले…

चांद सिफारिश

आमिर खान आणि काजोलचा ‘फना’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाच्या कथेबरोबरच त्याचे संगीतही खूप पसंत केले गेले. या चित्रपटाचे गाणे ‘चांद सिफारिश’ प्रसून जोशी यांनी लिहिले आहे. या गाण्यासाठी प्रसून यांना सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

हम तुम

राणी मुखर्जी आणि सैफ अली खानचा चित्रपट ‘हम तुम’ बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटातील सर्व गाण्यांचे बोल प्रसून जोशी यांनी लिहिले आहेत. त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.

मां

‘तारे जमीन पर’ या चित्रपटातील ‘माँ’ हे गाणे प्रत्येकाला भावनिक बनवते. या गाण्याने करोडो लोकांच्या हृदयांना स्पर्श केला आहे. या गाण्यासाठी प्रसून जोशींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

भाग मिल्खा भाग

प्रसून जोशी यांनी केवळ या सुपरहिट चित्रपटाच्या संगीतासाठी योगदान दिले नाही तर, चित्रपटाची पटकथाही लिहिली. या चित्रपटातील प्रत्येक गाण्याने प्रत्येकाची मने जिंकली. या चित्रपटामुळे प्रसून यांना त्यांचा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

रंग दे बसंती

आमिर खानचा ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट प्रत्येकामध्ये देशभक्ती जागृत करतो. हा चित्रपट आजही सर्वांना खूप आवडतो. या चित्रपटाच्या गाण्यांचे बोलही प्रसून जोशी यांनी लिहिले होते. या चित्रपटाचे प्रत्येक गाणे तुमच्यातील देशभक्तीच्या भावना जागृत करते. कधीकधी ते तुम्हाला भावनिक बनवते आणि कधीकधी ते तुम्हाला आनंदाने नाचण्यास देखील भाग पाडते.

गीतकार प्रसून जोशी यांना त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Sonu Sood Net Worth | ज्या सोनू सुदच्या घरी आयकरची टीम पोहोचलीय, तो वर्षाला किती कमावतो माहितीय का?

‘तमंचे पे व्हिडीओ करणं’ महिला पोलिसाला भोवलं, राजीनामा दिल्यानंतर पोलिसांकडून 1 लाख 82 हजाराच्या भरपाईची नोटीस

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.