Happy Birthday Raj Babbar | स्मिता पाटीलच्या जाण्याने खचून गेले होते राज बब्बर, रेखाशी जवळीक वाढतच मिळू लागल्या धमक्या!

अभिनेते राज बब्बर यांचे पत्नी आणि अभिनेत्री असणाऱ्या स्मिता पाटील यांच्यावर खूप प्रेम होते. पहिली पत्नी नादिराशी घटस्फोट घेतल्यानंतर राज बब्बर यांनी स्मिता पाटीलशी लग्न केले. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे, पण हे प्रेम फुलायला लागले आणि स्मिता राज बब्बरला कायमची सोडून निघून गेली.

Happy Birthday Raj Babbar | स्मिता पाटीलच्या जाण्याने खचून गेले होते राज बब्बर, रेखाशी जवळीक वाढतच मिळू लागल्या धमक्या!
राज बब्बर
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 11:06 AM

मुंबई : बी-टाउनमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांच्या प्रेमकथेची बरीच चर्चा झाली, पण राज बब्बर आणि रेखा यांच्यातील संबंधांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल, तर आज (23 जून) राज बब्बर (Raj Babbar) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया, स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या निधनानंतर रेखा कशा प्रकारे राज बब्बर यांच्यासाठी आधार ठरल्या आणि  या अभिनेत्याला त्याच्या दु:खापासून मुक्त होण्यास मदत मिळाली (Happy Birthday Raj Babbar know about Rekha And Raj Babbar affair).

अभिनेते राज बब्बर यांचे पत्नी आणि अभिनेत्री असणाऱ्या स्मिता पाटील यांच्यावर खूप प्रेम होते. पहिली पत्नी नादिराशी घटस्फोट घेतल्यानंतर राज बब्बर यांनी स्मिता पाटीलशी लग्न केले. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे, पण हे प्रेम फुलायला लागले आणि स्मिता राज बब्बरला कायमची सोडून निघून गेली. मुलगा प्रतीक बब्बर याला जन्म दिल्यानंतर तिला काही आरोग्यविषयक समस्या उद्भवल्या, त्यानंतर स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी एकीकडे मुलाच्या जन्माचा आनंद होता, तर दुसरीकडे पत्नी वियोगाचे दुःख, अशा परीस्थितीत ते अडकले होते.

स्मिता गेल्यानंतर रेखा बनल्या राज यांचा आधार

स्मिताच्या जाण्याने राज बब्बर पूर्ण खचले होते. दरम्यान, कामावर परतल्यानंतर राज बब्बर यांना थोडासा दिलासा मिळाला. तसेच, आपले दुःख शेअर करण्यासाठी जोडीदार देखील मिळाला. ही व्यक्ती होती अभिनेत्री रेखा. आपल्या एका मुलाखतीत राज बब्बर यांनी आपले रेखाशी नाते असल्याची कबुली दिली होती, परंतु रेखाने हे संबंध नेहमीच नाकारले होते. कदाचित या रिलेशनशिपबद्दल फक्त राज बब्बर आणि रेखा यांनाच माहिती असेल, पण बॉलिवूड कॉरिडॉरमधून एक वेगळीच कहाणी समोर येते.

पीपिंगमूनच्या एका वृत्तानुसार, राज बब्बरने रेखाबरोबरचे आपले संबंध कबूल केले होते आणि ते म्हणाले होते – ‘होय, आमच्या नात्याने मला पुढचा मार्ग शोधण्यास मदत केली. आम्ही काही परिस्थितीमुळे दु:खी होतो. त्यावेळी रेखाचे देखील हृदय तुटले होते. तिला त्यापासून दूर जायचे होते. माझीही अशीच परिस्थिती होती. आम्ही एकत्र काम करत होतो आणि भावनिक समर्थनासाठी आम्ही एकमेकांशी कनेक्ट राहिले. आम्ही एकमेकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला.’

ते पुढे म्हणाले की, ‘मी स्मिताबरोबर असल्यामुळे रेखाशी इतका संबंध नव्हता. तथापि आम्ही असेही म्हणू शकत नाही की, आम्ही मित्र होतो. होय, आम्ही कधी नात्यात होतो, हे मी कधीच नाकारू शकत नाही. असो, मी फक्त एक मानव आहे. एक माणूस असल्याने ती माझ्याशी ज्या पद्धतीने वागली त्याद्वारे मी आकर्षित झाले.’

धमक्यांचे सत्र

रेखा आणि राज बब्बर यांच्या अफेअरच्या बातम्या बॉलिवूड कॉरिडोरमध्ये पुन्हा चर्चेत असताना एक अफवा देखील निर्माण झाली की, हे वृत्त ऐकताच निर्माते हबीब नाडियाडवाला यांनी राज बब्बर यांना धमकी दिली होती. म्हणूनच ते लाईम लाईटपासून दूर गेले. मात्र, राज बब्बर यांनी या वृत्तांना नाकारले. ते म्हणाले की, मला वाटत नाही की हबीब नाडियाडवाला मला धमकावण्यास पुरेसे सक्षम होते. ते काही गोष्टींवर चर्चा करायला आले होते आणि त्यादरम्यान काही शब्दांवरून थोडा वाद झाला.

‘हे’ ठरले ब्रेकअपचे कारण

रेखा आणि राज बब्बरच्या ब्रेकअपमागील कारण नादिरा हेच होते, असं म्हणतात. काही माध्यमांच्या वृत्तानुसार असा दावा केला जात आहे की, राज बब्बरने जेव्हा त्यांची पहिली पत्नी नादिराकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा रेखाला याचा राग आला. एक दिवस या विषयावरून दोघांमध्ये बराच वाद झाला आणि त्यानंतर रेखा मुंबईतील गर्दीच्या रस्त्यावर अनवाणी चालताना दिसली. तथापि, या घटनेची पुष्टी झाली नाही.

(Happy Birthday Raj Babbar know about Rekha And Raj Babbar affair)

हेही वाचा :

Photo : सुंदर फुलांच्या बागेत मौनी रॉयचं फोटोशूट, पाहा फोटो

TMKOC | ‘दयाबेन’ साकारण्यासाठी ‘खतरों के खिलाडी’च्या ‘या’ अभिनेत्रीला ऑफर! पाहा काय म्हणाली अभिनेत्री…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.