Happy Birthday Rakesh Roshan | चित्रपट सुपरहिट व्हावा या नवसामुळे राकेश रोशनने कापले होते केस, मग घेतली ‘ही’ शपथ!

‘कहो ना प्यार है’, ‘कोयला’ सारखे अनेक उत्तम चित्रपट दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) आज (6 सप्टेंबर) आपला 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राकेश रोशन यांचा जन्म 6 सप्टेंबर 1979 रोजी मुंबईत झाला. राकेश रोशन त्याच्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात.

Happy Birthday Rakesh Roshan | चित्रपट सुपरहिट व्हावा या नवसामुळे राकेश रोशनने कापले होते केस, मग घेतली 'ही' शपथ!
राकेश रोशन
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 11:02 AM

मुंबई : ‘कहो ना प्यार है’, ‘कोयला’ सारखे अनेक उत्तम चित्रपट दिग्दर्शित करणारे दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) आज (6 सप्टेंबर) आपला 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. राकेश रोशन यांचा जन्म 6 सप्टेंबर 1979 रोजी मुंबईत झाला. राकेश रोशन त्याच्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात. आज, त्यांच्या वाढदिवसानिमित्त, आपण त्यांच्याशी संबंधित एक खास गोष्ट जाणून घेणार आहोत…

प्रत्येकाने नेहमीच राकेश रोशनला केसांविनाच पाहिले आहे. वाढत्या वयामुळे राकेश रोशनचे केस गळले आहेत किंवा काही रोगामुळे त्यांना टक्कल पडले आहे, असे अनेकांना वाटते. मात्र, असे कोणतेही कारण नाही. चला तर, जाणून घेऊया राकेश रोशनच्या डोक्यावर केस नसण्याचे कारण नेमकं काय?

चित्रपट हिट होण्यासाठी केला होता नवस

राकेश रोशन यांनी ‘खुदगर्ज’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी प्रथमच दिग्दर्शक म्हणून काम केले. राकेश रोशन यांनी या चित्रपटाच्या यशासाठी नवस मागितला होत. त्यांनी तिरुपती बालाजी मंदिरामध्ये नवस केला होता की, जर हा चित्रपट हिट झाला तर ते तिरुपतीला येऊन आपले केस दान करतील.

राकेश रोशनचा हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर राकेश रोशन आपला नवस मात्र विसरले. पण त्याची पत्नी पिंकीला त्यांचा नवस लक्षात होता. पिंकी यांनी अर्थात हृतिकच्या आई राकेश यांना नवसाची आठवण करून दिली. त्यानंतर राकेश रोशन तिरुपतीला गेले आणि त्यांनी केस दान केले.

‘ही’ शपथ घेतली

जेव्हा, राकेश रोशन तिरुपतीला केस कापण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी कधीच डोक्यावर केस ठेवणार नाही अशी शपथच घेतली होती. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आणि सर्वच चित्रपट हिट ठरले.

राकेश रोशन यांनी अभिनयातही आपले नशीब आजमावले आहे. त्यांनी ‘पराया धन’, ‘आँखों-आँखों में’, ‘सुंदर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

‘क्रिश 4’ची उत्सुकता

सध्या राकेश रोशन, हृतिक रोशनच्या ‘क्रिश’ या फ्रेंचाइजीच्या चौथ्या चित्रपटावर काम करत आहे. अलीकडेच त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहते खूप उत्साहित आहेत. आता प्रत्येकजण या सुपरहिरो चित्रपटाची वाट पाहत आहे.

या सीरीजचा पहिला चित्रपट ‘कोई मिल गया’ होता, जो राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केला होता. त्यानंतर त्यांनी ‘क्रिश’ आणि ‘क्रिश 3’ आणले. क्रिशमध्ये हृतिकबरोबर प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसली होती. चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रियंका चोप्राने देखील पोस्ट शेअर केली होती. फिल्ममेकर राकेश रोशन यांनी 2018 मध्ये ‘क्रिश 4’ची घोषणा केली होती. हा चित्रपट ख्रिसमस 2020मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. पण कोरोनामुळे हे होऊ शकले नाही.

हृतिक रोशनने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘वॉर’ चित्रपटाच्या रिलीजनंतर तो ‘क्रिश 4’चे चित्रीकरण करणार आहे. 2019 मध्ये ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हृतिक म्हणाला होता की, वॉरनंतर मी माझ्या वडिलांसोबत यावर चर्चा करणार आहे आणि क्रिश 4वर काम करण्यास देखील सुरुवात करेन. ते आजारातून बरे होत असताना त्यांना आराम मिळावा म्हणून हा प्रोजेक्ट बाजूला ठेवण्यात आला होता.

हेही वाचा :

सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत करण जोहर झाला भावूक, शोच्या सुरुवातीला दिली श्रद्धांजली

‘सोच’पासून ‘क्या बात है’ पर्यंत, ऐका हार्डी संधूची हिट आणि लोकप्रिय गाणी

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.