Happy Birthday Ranbir Kapoor | अभ्यासाचा नेहमीच कंटाळा, पार्टीत ऐश्वर्या रायला देखील रणबीर कपूरने सांगितले होते खोटे मार्क्स!

रणबीरने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये हे बिंधास्त सांगितले होते की, त्याला सुरुवातीपासूनच अभ्यासामध्ये विशेष रस नव्हता. त्याला नेहमी क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहायला आवडायचे. रणबीर कपूर दक्षिण मुंबईच्या माहीम येथील बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकला.

Happy Birthday Ranbir Kapoor | अभ्यासाचा नेहमीच कंटाळा, पार्टीत ऐश्वर्या रायला देखील रणबीर कपूरने सांगितले होते खोटे मार्क्स!
Ranbir Kapoor
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 7:57 AM

मुंबई : ऋषी कपूर (Rishi Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचा लेक आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) जन्म 28 सप्टेंबर 1982 रोजी झाला. प्रत्येकाला माहित आहे की, रणबीर बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपूर कुटुंबातील आहे. आपल्या वडिलांप्रमाणे आणि आजोबांप्रमाणेच त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रणबीर कपूरने आपले प्राथमिक शिक्षण मुंबईतूनच पूर्ण केले.

रणबीरने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये हे बिंधास्त सांगितले होते की, त्याला सुरुवातीपासूनच अभ्यासामध्ये विशेष रस नव्हता. त्याला नेहमी क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहायला आवडायचे. रणबीर कपूर दक्षिण मुंबईच्या माहीम येथील बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकला. जेव्हा त्याने दहावी उत्तीर्ण केली होती, तेव्हा रणबीरची आजी कृष्णा कपूर यांनी त्यांच्या घरी एक मोठी पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स देखील उपस्थित होते.

ऐश्वर्याला सांगितले खोटे मार्क्स!

रणबीर कपूरने दहावीत 54.3% गुण मिळवले होते. ज्यासाठी आजी कृष्णाने घरात एक मोठी पार्टी आयोजित केली होती. सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनेही या पार्टीला हजेरी लावली होती. रणबीर कपूरने पार्टीमध्ये ऐश्वर्या रायला आपल्याला 65% गुण मिळाल्याचे सांगितले होते. याचा खुलासा ऐश्वर्या राय बच्चनने स्वतः ‘द कपिल शर्मा शो’मध्ये केला होता. ऐश्वर्या रायने सांगितले की, त्या वेळी रणबीरने तिला सांगितले होते की, सगळे त्याच्या या मार्क्सवर खूप आनंदी आहेत.

रणबीरची कारकीर्द

राज कपूर यांचा नातू रणबीर कपूर याने 2007 मध्ये संजय लीला भन्साळींच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याआधी त्याने संजय लीला भन्साळी यांना अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या ‘ब्लॅक’ मध्ये सहाय्य केले होते. ‘सावरिया’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, पण या चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळवून दिली.

‘सावरिया’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘रॉकस्टार’ आणि ‘बर्फी’ नंतर रणबीर कपूरने सिद्ध केले की, तो एक प्रतिभावान कलाकार आहे. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या रोमँटिक कॉमेडीमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी रणबीरचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. 2010 मध्ये, प्रकाश झाच्या ‘राजनीती’त रणबीरने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.

‘अंजाना-अंजानी’, ‘ये जवानी है दीवानी’, ‘तमाशा’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘जग्गा जासूस’ या चित्रपटांपासून संजय दत्तच्या बायोपिक ‘संजू’ पर्यंत रणबीर कपूरने आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे. चित्रपटांव्यतिरिक्त रणबीर कपूर अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत असल्यामुळे देखील चर्चेत आहे. मात्र, दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 | एकटं फिरण्यावरही बंधन येणार, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘जोडी की बेडी’चा नवा खेळ रंगणार!

Shruti Marathe : श्रुती मराठेच्या ‘गोड गोजिरी अदा….’, फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल फिदा!

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.