Happy Birthday Ravi Kishan | घरातून केवळ 500 घेऊन स्वप्न पुरी करायला निघालेला रवी किशन, आजमितीला कामातोय कोटींचा गल्ला!

अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) हा भोजपुरी इंडस्ट्रीचा एक सुपरहिट चेहरा आहे. भोजपुरीशिवाय त्याने बॉलिवूड आणि साऊथमध्ये काम करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने आपल्या शानदार अभिनयाने त्याने सर्वांचे मन जिंकले आहे.

Happy Birthday Ravi Kishan | घरातून केवळ 500 घेऊन स्वप्न पुरी करायला निघालेला रवी किशन, आजमितीला कामातोय कोटींचा गल्ला!
रवी किशन
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 10:29 AM

मुंबई : अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) हा भोजपुरी इंडस्ट्रीचा एक सुपरहिट चेहरा आहे. भोजपुरीशिवाय त्याने बॉलिवूड आणि साऊथमध्ये काम करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने आपल्या शानदार अभिनयाने त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. त्याने अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. पण एक काळ असा होता की रवीकडे काहीच काम नव्हते. रवी किशन आजही ते दिवस विसरलेला नाही, कारण या कठीण काळात लढा देऊन तो आज या टप्प्यावर पोहोचला आहे. आज रवी किशन आपला 52वा वाढदिवस साजरा करत आहेत. रवीचा जन्म 17 जुलै 1969 रोजी मुंबई येथे झाला होता.

रवी किशनच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल ऐकून सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू येतात. रवी किशनला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते. तो अमिताभ बच्चनचा मोठा चाहत होता. अमिताभ बच्चनचा अभिनय पाहून रवीने रामलीलामध्ये सीतेची भूमिका साकारण्यास सुरुवात केली.

वडिलांनाकडून मिळायचा चोप

रवी किशनच्या वडिलांना आपल्या मुलाने अभिनय करणे अजिबात पसंत नव्हते, यामुळे त्याला बर्‍याचदा वडिलांकडून चोप मिळायचा. रवी किशनने एका मुलाखतीत सांगितले होते की, अभिनयाची आवड असल्यामुळे वडिलांनी त्याला अनेक वेळा मारहाण केली. वडिलांना त्याच्या अभिनय करणे पटत नव्हते, म्हणून तो आईकडून 500 रुपये घेऊन घर सोडून पळून गेला आणि मुंबईला आला. रवी किशनला आईने नेहमीच साथ दिली. रवीने आपले स्वप्न पूर्ण करावे अशी तिची इच्छा होती.

उपाशी पोटी कष्ट

रवी किशन मुंबईत फक्त 500 रुपये घेऊन आला होता. कालांतराने हे पैसे संपू लागले आणि रवीला काम मिळत नव्हते. ज्यामुळे त्याला रोज मुंबईत खायला देखील मिळत नव्हते. जर हाताला काम मिळालं, तर तो अन्न खायचा, नाही तर भुकेल्या पोटी झोपायचा. त्यावेळी रवी दहा बाय फूटच्या चाळीतील खोलीत राहत होता.

बी ग्रेड चित्रपटात काम मिळाले

बऱ्याच संघर्षानंतर रवी किशन यांना बी ग्रेड चित्रपट ‘पीतांबर’ या चित्रपटात नोकरी मिळाली. पहिला चित्रपट मिळाल्यानंतरच त्याला यश मिळालं असं नव्हतं. पीतांबरनंतरही रवीला खूप संघर्ष करावा लागला. तो छोट्या छोट्या भूमिका करायचा. त्यानंतर त्याला थोडेसे काम मिळू लागले, ज्यामुळे त्याचा उदरनिर्वाह होऊ लागला.

‘तेरे नाम’मुळे चमकले नशीब

बर्‍याच वर्षांच्या संघर्षानंतर रवी किशनला सलमान खानच्या ‘तेरे नाम’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्यांनी भूमिक चावलाचा होणारा नवरा पंडितची भूमिका साकारली होती. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे कौतुक केले गेले.

भोजपुरी सिनेमाचा स्टार

‘तेरे नाम’मध्ये काम केल्यानंतर अशी वेळ आली की, रवी किशनला बॉलिवूडमध्ये काम मिळत नव्हतं. या दरम्यान त्याने भोजपुरी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आजमितीला तो भोजपुरी मनोरंजन विश्वाचा सुपरस्टार आहे.

(Happy Birthday Ravi Kishan know about actors career journey)

हेही वाचा :

Katrina Kaif Net Worth | दमदार अभिनयासोबतच बक्कळ कमाई करते कतरिना कैफ, जाणून घ्या संपत्ती किती?

Happy Birthday Mummyji : शेफाली शाहच्या दिग्दर्शनात तयार होणार दूसरा लघुपट, ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’ची धमाकेदार सुरुवात!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.