Happy Birthday Richa Chadda | कधी ‘नगमा खातून’ तर कधी ‘भोली पंजाबन’ बनून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, वाचा अभिनेत्री रिचा चड्ढाबद्दल…

रिचाने बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सशक्त भूमिका केल्या आहेत आणि आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त रिचा तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अली फजलसोबतच्या नात्याबद्दलही चर्चेत असते. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Happy Birthday Richa Chadda | कधी ‘नगमा खातून’ तर कधी ‘भोली पंजाबन’ बनून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, वाचा अभिनेत्री रिचा चड्ढाबद्दल...
Richa Chadda
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 8:00 AM

मुंबई : 18 डिसेंबर 1986 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेली रिचा चड्ढा (Richa Chadda) आज तिचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. रिचाने बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सशक्त भूमिका केल्या आहेत आणि आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त रिचा तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अली फजलसोबतच्या नात्याबद्दलही चर्चेत असते. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आज ऋचाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टींबद्दल सांगणार आहोत…

रिचाचा जन्म पंजाबमध्ये झाला, पण खलिस्तान चळवळीची परिस्थिती पाहता तिचे आई-वडील दिल्लीत स्थायिक झाले. त्यावेळी रिचा फक्त दीड वर्षांची होती. यानंतर रिचाचे संपूर्ण बालपण दिल्लीतच गेले. तिचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दिल्लीतच पूर्ण झाले. रिचा सोशल मीडियामध्ये पीजी डिप्लोमा करण्यासाठी मुंबईत आली होती. रिचाच्या पालकांची इच्छा होती की, तिने टीव्ही पत्रकार व्हावे, मात्र नशिबाने रिचासाठी दुसरा मार्ग निवडला होता.

‘नगमा खातून’मुळे मिळाली प्रसिद्धी!

मुंबईत आल्यानंतर रिचाने मॉडेलिंग सुरू केले आणि थिएटर करायला सुरुवात केली. यानंतर ती ‘ओये लकी, लकी ओये!’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर कमाल दाखवली नाही, पण रिचाचा अभिनय सर्वांनाच आवडला. मात्र, अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये ‘नगमा खातून’ ही व्यक्तिरेखा साकारून रिचा सर्वांची आवडती बनली. यानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही रिचाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

‘मसान’ चित्रपटाचे कौतुक!

यानंतर रिचाला एकापेक्षा एक चित्रपट मिळाले ज्यात ‘फुक्रे’, ‘शॉर्ट्स’ आणि ‘राम-लीला’ यांचा समावेश आहे. रिचाने ‘फुकरे’मध्ये ‘भोली पंजाबन’ बनून लोकांची मने जिंकली. तर, तिने ‘राम लीला’मध्ये दीपिकाच्या वहिनीची भूमिका साकारून समीक्षकांची मने जिंकली. 2015 मध्ये आलेल्या ‘मसान’ चित्रपटासाठी रिचाने सर्वाधिक कौतुक मिळवले होते. या चित्रपटासाठी रिचाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. ‘मसान’ हा चित्रपट कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता, जिथे हा चित्रपट दोन पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला होता.

लवकरच अडकणार लग्नबंधनात!

रिचा तिच्या चित्रपटांसोबतच अभिनेता अली फजलसोबतच्या नात्याबद्दलही चर्चेत आहे. अली आणि रिचा यांची भेट ‘फुक्रे’ चित्रपटाच्या सेटवर झाली आणि तिथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. यानंतर त्यांचे प्रेम हळूहळू बहरले आणि 2019 मध्ये रिचाच्या वाढदिवशी अलीने तिला लग्नासाठी प्रपोज केले. रिचाने अलीला होकार दिला आणि या वर्षी एप्रिलमध्ये दोघे लग्न करणार होते. मात्र, लॉकडाऊनमुळे ते होऊ शकले नाही. आता दोघेही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र, लवकरच हे जोडपे त्यांच्या चाहत्यांना लग्नाची गोड बातमी सांगतील अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा :

Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!

83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर, 83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.