Happy Birthday Salman Khan | ‘दबंग खान’चं वयाच्या 56व्या वर्षात पदार्पण, अनेकांचा ‘गॉडफादर’ ठरलेल्या सलमानची जीवनशैली माहितेय का?

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) आज संपूर्ण जग ओळखते, त्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. सलमानने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जगभरात त्याचे चित्रपट आवडणारे करोडो चाहते आहेत.

Happy Birthday Salman Khan | ‘दबंग खान’चं वयाच्या 56व्या वर्षात पदार्पण, अनेकांचा ‘गॉडफादर’ ठरलेल्या सलमानची जीवनशैली माहितेय का?
Salman Khan
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 1:00 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) आज संपूर्ण जग ओळखते, त्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. सलमानने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जगभरात त्याचे चित्रपट आवडणारे करोडो चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते काहीही करायला तयार असतात. केवळ त्याचे चित्रपटच लोकांना आवडत नाहीत, तर त्याच्या चित्रपटातील गाणीही लोकांच्या ओठावर असतात. सोशल मीडियावर सलमान खानची फॅन फॉलोइंगही खूप आहे.

आपली मेहनती आणि समर्पणाच्या जोरावर सलमान आज एक यशस्वी सुपरस्टार आहे, पण तुम्हाला त्याच्या जीवनशैलीबद्दल माहिती आहे का? तुम्हाला माहीत आहे का सलमान खानकडे किती संपत्ती आहे आणि तो कोणत्या प्रकारचे आयुष्य जगतो? चला तर एक नजर टाकूया त्याच्या जीवनशैलीवर…

स्वत:ला नेहमी तंदुरुस्त ठेवतो!

सलमान खान आज म्हणजेच 27 डिसेंबरला त्याचा 56वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तो आधी सर्व काही खायचा, पण आता तो फक्त हेल्दी पदार्थच खातो. आपले वजन वाढू नये म्हणून तो सध्या खूप काळजी घेतो. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सलमान रोज वर्कआउट करतो. त्याला सायकलिंग आणि पोहण्याचीही आवड आहे.

‘या’ प्रकारचे अन्न आवडते…

सलमान खानला जेवणात चिकन बिर्याणी आणि राजमा चावल आवडतात. त्याला मोदक आणि कबाब खायलाही आवडतात. सकाळच्या नाश्त्यात सलमान चार अंड्यांचा पांढरा बलक खातो आणि कमी फॅट असलेले दूध पितो. तर दुपारी त्याला मटण, तळलेले मासे, कोशिंबीर आणि फळे खायला आवडतात. आणि रात्री चिकन, सूप, उकडलेल्या भाज्या आणि मासे खायला आवडतात.

कमाई किती?

सलमान खान केवळ चित्रपटातूनच कमाई करत नाही, तर त्याच्या कमाईचे इतरही अनेक स्त्रोत आहेत. तो जाहिराती, ब्रँड प्रमोशन, गुंतवणूक आणि सोशल मीडियाद्वारे कमाई करतो. एका ब्रँडची जाहिरात करण्यासाठी सलमान 8-10 कोटी रुपये घेतो, तर एका चित्रपटासाठी 60 कोटी रुपये आकारतो.

सलमानची घरेही अनेक!

सलमान खान मुंबईतील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो, जो आतमधून एखाद्या महालापेक्षा कमी नाही. येथे सलमान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह राहतो. या अपार्टमेंटशिवाय सलमानने 2017 मध्ये 5 BHK बंगला खरेदी केला होता. याशिवाय त्याचे पनवेलमध्ये फार्महाऊसही आहे. त्याचवेळी, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की दिल्ली, नोएडा आणि चंदीगडमध्येही सलमान खानच्या अनेक मालमत्ता आहेत.

महागड्या कार्सचे कलेक्शन

सलमान खान कारचाही शौकीन आहे. त्याच्याकडे ऑडी, बेंटले, रोल्स रॉयस आणि मर्सिडीजसह अनेक लक्झरी आणि महागड्या गाड्या आहेत. या गाड्यांची एकूण किंमत 14 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सलमान खानने चित्रपट आणि इतर अनेक गोष्टींमधून भरपूर संपत्ती कमावली आहे. जर आपण त्याच्या एकूण मालमत्तेबद्दल बोललो, तर मीडिया रिपोर्ट्सनुसार ती सुमारे 360 दशलक्ष म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 2304 कोटी आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Salman Khan | एका सुपरहिट चित्रपटानंतर तब्बल 6 महिने रिकामा बसून राहिला सलमान खान! वाचा नेमकं काय झालं?

Sunny Leone | ‘शाब्दिक’ वादानंतर सारेगामा बॅकफूटवर, अखेर सनी लिओनच्या ‘मधुबन’ गाण्यात बदल होणार!

ज्या वडिलांच्या उपचारासाठी स्पर्धेत सहभागी झाला, नियतीने त्यांनाच हिरावून नेलं! India’s Best Dancer फेम संकेतला पितृशोक

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.