Happy Birthday Shaan | वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून गायनाला सुरुवात, वाचा गायक शानच्या काही खास गोष्टी…
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक शान मुखर्जी (Shaan Mukherjee) यांचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला. शान बंगाली कुटुंबातील आहे. त्याचे पूर्ण नाव शंतनू मुखर्जी आहे. शान हिंदी संगीत क्षेत्रातील प्रतिभावान गायकांपैकी एक आहे.
मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक शान मुखर्जी (Shaan Mukherjee) यांचा जन्म 30 सप्टेंबर 1972 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला. शान बंगाली कुटुंबातील आहे. त्याचे पूर्ण नाव शंतनू मुखर्जी आहे. शान हिंदी संगीत क्षेत्रातील प्रतिभावान गायकांपैकी एक आहे. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत शानने हिंदी, बंगाली, मराठी, उर्दू, तेलुगु, कन्नड, नेपाळी, उडिया, पंजाबी आणि मल्याळमसह अनेक भाषांमध्ये गाणी गाऊन संगीतप्रेमींची मने जिंकली आहेत.
शानचे आजोबा जहर मुखर्जी, एक प्रसिद्ध गीतकार होते. त्यांचे वडील स्वर्गीय मानस मुखर्जी संगीत दिग्दर्शक होते आणि त्यांची बहीण सागरिका देखील गायिका आहे. घरात सुरुवातीपासूनच संगीताच्या वातावरणामुळे शानचा लहानपणापासूनच संगीताकडे कल होता. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्याने गायनाला सुरुवात केली. सुरुवातीला शान जाहिरातींसाठी जिंगल्स गात असे. त्याने वयाच्या 17व्या वर्षी बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली.
‘या’ गाण्यांमधून मिळाली ओळख
शान आणि त्याची बहीण सागरिका यांनी पहिल्यांदा एका म्युझिक कंपनीसाठी गाणी गायली. यात काही रीमिक्स गाण्यांचाही समावेश होता. शानचा बहिण सागरिकासोबतचा अल्बम हिट ठरला, पण तो त्याच्या ‘लव्ह-ओलॉजी’ या अल्बमने प्रसिद्धी झोतात आला. शान याला त्याची खरी ओळख ‘भूल जा’ आणि ‘तन्हा दिल’ या गाण्यांमधून मिळाली. त्याची ही दोन्ही गाणी 1999मध्ये रिलीज झाली होती. यानंतर शानने कधीही मागे वळून पाहिले नाही.
शानची कारकीर्द
शान याने ‘अशोका’, ‘कल हो ना हो’, ‘फना’, ‘जब वी मेट’, ‘तारे जमीन पर’, ‘3 इडियट्स’, ‘ओम शांति ओम’, ‘हे बेबी’, ‘हमको दिवाना कर गये’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘तेरे नाम’ आणि ‘टोटल धमाल’ यासह अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये शानने नेहमीच आपल्या सुंदर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शानने आपल्या कारकिर्दीत ‘सा रे गा मा पा’, ‘सा रे गा मा पा ली’ लिटील चॅम्प’, ‘स्टार व्हॉईस ऑफ इंडिया’ आणि ‘स्टार व्हॉईस ऑफ इंडिया 2’ सारखे शो जज केले आहेत.
वैयक्तिक आयुष्य
अवघ्या 13 वर्षांचे शानचे वडील असताना शानचे पितृछत्र हरपले. यानंतर शानच्या आईने कुटुंबाची काळजी घेतली. शानची मोठी बहीण देखील एक गायिका आहे. शानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, त्याने 18 नोव्हेंबर 2000 रोजी गायिका, उद्योजक आणि माजी फ्लाइट अटेंडंट राधिका मुखर्जी हिच्याशी लग्न केले. या जोडीला दोन मुलगे आहेत, सोहम, जो रॅपर आहे आणि शुभ, जो एक भारतीय गायक आहे.
हेही वाचा :
Bigg Boss Marathi 3 : ‘बिग बॉस’च्या चावडीवर गायत्रीने सोनालीला सुनावले खडेबोल
Binge Watch : ‘शिद्दत’ ते ‘ब्रेक पॉईंट’, पाहा या आठवड्यात OTTवर मनोरंजनाच्या मेजवानीत काय काय असणार?