Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Sussane Khan | पहिल्याच नजरेत सुझान खानच्या प्रेमात पडला होता हृतिक रोशन, पहिल्या डेटचं बिल देखील सुझानच्या नावावर!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान (Sussane Khan) तिचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुझानचे कुटुंब फिल्मी दुनियेशी संबंधित आहे. पण ती कधीही चित्रपटात दिसली नाही. सुझानची अनेक बॉलिवूड स्टार्सशी चांगली मैत्री आहे.

Happy Birthday Sussane Khan | पहिल्याच नजरेत सुझान खानच्या प्रेमात पडला होता हृतिक रोशन, पहिल्या डेटचं बिल देखील सुझानच्या नावावर!
सुजैन आणि हृतिक
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 10:39 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान (Sussane Khan) तिचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुझानचे कुटुंब फिल्मी दुनियेशी संबंधित आहे. पण ती कधीही चित्रपटात दिसली नाही. सुझानची अनेक बॉलिवूड स्टार्सशी चांगली मैत्री आहे. आज तिच्या वाढदिवसाच्या खास निमित्त जाणून घ्या तिच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी…

सुझान खान एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. ती तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. सुझान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची चांगली फॅन फॉलोइंग आहे. सुझान प्रसिद्ध अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. तिचा भाऊ झायेद खान देखील अभिनेता आहे. सुझानने अमेरिकेतून शिक्षण घेतले आहे. तिने 1996 मध्ये आपल्याला करिअरला सुरुवात केली. सुझान अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

हृतिक आणि सुझान 4 वर्षे एकमेकांना डेट करत होते!

2000 मध्ये हृतिक आणि सुझानचे लग्न झाले. 4 वर्षांपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले होते. हृतिक आणि सुझानची पहिली भेट सिग्नलवर झाली होती. खरंतर ट्रॅफिकमुळे दोघेही आपापल्या गाडीत बसले होते, तेव्हाच हृतिकची नजर सुझानवर पडली. पहिल्या दृष्टीक्षेपात हृतिक सुझानला हृदय देऊन बसला. यानंतर दोघेही बहिणीच्या लग्नात भेटले. जवळपास एक वर्ष डेट केल्यानंतरच हृतिकला वाटू लागले की, तो तिच्याशिवाय राहू शकत नाही.

सुझान खानने पहिल्या डेटसाठी पैसे दिले!

हृतिकने एका मुलाखतीत सांगितले होते की, सुझानने आमच्या पहिल्या डेटसाठी पैसे दिले होते. 13 वर्षांनंतर म्हणजेच 2013 मध्ये हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाला. घटस्फोटामुळे सुझान चर्चेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना रनौत आणि अर्जुन रामपालमुळे संबंध बिघडले. पण त्यावर कोणीही काहीही बोलले नाही. हृतिक आणि सुझान यांना दोन मुले आहेत. घटस्फोटानंतरही सुझान हृतिकच्या घरी सतत येत असते.

अफेअरची चर्चा!

घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुझानची मैत्री खूप चांगली असल्याचे दिसते. मात्र, आता हृतिकची माजी पत्नी सुझान तिच्या आयुष्यात पुढे गेली असल्याचे कळते आहे. टीव्ही अभिनेता आणि ‘बिग बॉस 14’ स्पर्धक अली गोनी (Aly Goni) याचा चुलत भाऊ अर्सलन गोनीसोबत (Arslan Goni) सुझान खान रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. एका प्रसिद्ध वेबसाईटच्या वृत्तानुसार सुझान अर्सलनला डेट करत आहे. दोघेही गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना ओळखतात. सुझान आणि अर्सलन टीव्ही जगातील त्यांच्या कॉमन मित्रांद्वारे भेटले, असे या सूत्रांनी उद्धृत केलेल्या अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Raveena Tandon | अभिनेत्री असण्याबरोबरच यशस्वी मॉडेल आणि निर्मातीदेखील!, वाचा अभिनेत्री रवीना टंडनबद्दल…

छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्रींसोबत गोविंदाचही ‘मन उडु उडु झालं’, मालिकेच्या शीर्षकगीतावरच धरला ठेका!

‘लॉकडाऊन की लव्ह स्टोरी’, ‘डॉक्टर’ बनले गीतकार-संगीतकार! अंकुर शर्मांचे गाणे ‘हम तेरे ही हो जाएंगे’ प्रेक्षकांच्या भेटीला!

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.