Happy Birthday Yash | मुलगा सुपरस्टार, कोट्यावधी कमावतो, तरीही यशचे वडील करतात ड्रायव्हरचे काम!
KGF फेम अभिनेता यश याचा आज वाढदिवस आहे. यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. यशने आपल्या करिअरची सुरुवात मोग्गीना मनसु (2008) मधून केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत राधिका होती, जिच्यासोबत यशने नंतर संसार देखील थाठला.
मुंबई : KGF फेम अभिनेता यश याचा आज वाढदिवस आहे. यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. यशने आपल्या करिअरची सुरुवात मोग्गीना मनसु (2008) मधून केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत राधिका होती, जिच्यासोबत यशने नंतर संसार देखील थाठला. यशने ‘राजधानी’, ‘मिस्टर अँड मिसेस रामाचारी’ आणि ‘किरतका’ सारखे चित्रपट केले असले तरी, तो ‘KGF चॅप्टर 1, 2’साठी अधिक ओळखला जातो. यशच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत…
यशचा जन्म कर्नाटकातील हसन जिल्ह्यात झाला. यशचे वडील अरुण कुमार जे KSRTC परिवहन सेवेत काम करायचे. नंतर तो बीएमटीसी ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करू लागले. आजही यशचे वडील बस चालवतात. या कामामुळेच ते यशला इतके मोठे करू शकले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ते ही नोकरी कधीच सोडणार नाही. यशचे बालपण म्हैसूर येथे गेले, जेथे त्याचे शालेय शिक्षण महाजन हायस्कूलमध्ये झाले. अभ्यासानंतर फावल्यावेळात तो बिनाका नाटक मंडळात सामील झाला.
KGF ठरला सुपरहिट
यशने 2013 सालानंतर यशाची चव चाखली. 2018 मध्ये रिलीज झालेला KGF हा कन्नड सिनेमातील सर्वाधिक बजेट असलेला चित्रपट होता. या चित्रपटाने जगभरात 250 कोटींचा व्यवसाय केला. जो कन्नड चित्रपटसृष्टीत आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम आहे. यशने त्याची सह-अभिनेत्री राधिका पंडितशी लग्न केले. मिस्टर आणि मिसेस रामाचारीच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
पहिल्या चित्रपटाच्या अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ!
दोघांची एंगेजमेंट 12 ऑगस्ट 2016 रोजी गोव्यात झाली होती. त्यानंतर 9 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी बंगळुरूमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. इतकंच नाही तर यशने आपल्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी संपूर्ण कर्नाटकाला आमंत्रित केलं होतं. आता या जोडीला दोन मुले आहेत. यशने आज जे विश्व घडवले आहे, ते त्याच्या मेहनतीमुळेच निर्माण झाले आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, यशकडे 40 कोटींहून अधिक संपत्ती आहे. त्याच्याकडे तीन कोटींचा बंगलाही आहे. यश आता एनजीओ चालवतो. ही संस्था अनेक गरजू लोकांना मदत करते. लोकांना शुद्ध पाणी प्यावे यासाठी त्यांनी करोडो रुपये खर्चून तलाव बनवला आहे.
हेही वाचा :
‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस लग्न करतोय ‘बन मस्का फेम’ शिवानीसोबत!
सुsssपर! बॉक्सऑफिसवर कल्ला करणारा पुष्पाचं हिंदी वर्जन OTTवर पुढच्या आठवड्यात रिलीज होतंय?
मला नेहमीच मी न केलेल्याची शिक्षा मिळते, पंकजांचे चिमटे, रोख कुणाकडे?