Net Worth | दुसऱ्यांदा पालक बनलेयत हरभजन सिंह-गीता बसरा, जाणून घ्या कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाबद्दल…

क्रिकेटपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) आणि गीता बसरा (Geeta Basra) यांच्या घरी एका छोटासा सदस्य आला आहे. गीताने मुलाला जन्म दिला आहे. ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. हरभजन आणि गीता यांना आधी एक मुलगीही आहे. सोशल मीडियावर पोस्ट सामायिक करुन हरभजनने मुलाच्या जन्माची माहिती दिली आहे.

Net Worth | दुसऱ्यांदा पालक बनलेयत हरभजन सिंह-गीता बसरा, जाणून घ्या कुटुंबाच्या एकूण उत्पन्नाबद्दल...
गीता बसरा-हरभजन सिंह
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 6:55 AM

मुंबई : क्रिकेटपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) आणि गीता बसरा (Geeta Basra) यांच्या घरी एका छोटासा सदस्य आला आहे. गीताने मुलाला जन्म दिला आहे. ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. हरभजन आणि गीता यांना आधी एक मुलगीही आहे. सोशल मीडियावर पोस्ट सामायिक करुन हरभजनने मुलाच्या जन्माची माहिती दिली आहे. हरभजन आपल्या दमदार क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जातो (Harbhajan Singh And Geeta Basra Net worth).

हरभजनने लिहिलं आहे, “आम्ही देवाला धन्यवाद करतो की आम्हाला एक स्वस्थ मुलाच्या रुपात आशीर्वाद दिले आहेत. गीता आणि मुलगा दोघेही सुखरुप आहेत. आम्ही दोघेही अत्यंत आनंदी असून सर्व शुभचिंतकाचे त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्द आभार मानतो.” गीता आणि हरभजन यांचे 29 ऑक्टोबर 2015 रोजी लग्न झाले होते. 2016 मध्ये त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता. तिचे नाव त्यांनी हिनाया असं ठेवलं होतं.

उजव्या हाताचा वेगवान मध्यमगती गोलंदाज म्हणून हरभजनने क्रिकेटमध्ये प्रवेश केला. तो अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. हरभजन क्रिकेट खेळण्याबरोबरच बर्‍याच ब्रँडला अँडोर्स करतो, एवढेच नव्हे तर, तो बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. ‘फ्रेन्डशिप’ या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आज आपण हरभजन सिंहच्या नेट वर्थविषयी जाणून घेणार आहोत.

caknowledge.comच्या अहवालानुसार हरभजन सिंहची एकूण मालमत्ता सुमारे 65 कोटी आहे. त्याचे बहुतांश उत्पन्न क्रिकेटमधून येते. हरभजन आयपीएल आणि अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधून कमाई करतो. ब्रँडचं काम करण्यासाठी हरभजन भारी भक्कम शुल्क आकारतो. गेल्या काही वर्षांत हरभजनची संपत्ती 40 टक्क्यांनी वाढली आहे.

हरभजन सिंहचे घर

जालंधरमध्ये हरभजन सिंहचे लक्झरी घर आहे. त्या घराची किंमत सध्या सुमारे 6 कोटी आहे. याशिवाय त्याच्याकडे देशात अनेक ठिकाणी मालमत्ता आहे.

कार कलेक्शन

हरभजनचे कार कलेक्शन खूपच लहान आहे. त्याच्यानंतर एसयूव्ही हमर एच 2, मारुती सुझुकी विटारा ब्रिझा यासह अनेक वाहने आहेत.

बॉलिवूड डेब्यू

हरभजन सिंह ‘मैत्री’ या चित्रपटाने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात करणार आहे. गेल्या वर्षी त्यांने आपल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती दिली होती. या चित्रपटात हरभजन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचे फॅन्स हरभजनच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दुसरीकडे, गीताच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलताना तिने ‘दिल दे दिया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती इमरान हाश्मीसोबत ती भूमिकेत दिसली होती. त्यानंतर ती बर्‍याच चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओंमध्ये दिसली आहे.

(Harbhajan Singh And Geeta Basra Net worth)

हेही वाचा :

PHOTO | एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या रश्मिका मंदनाच्या हातात दिसला ‘छोटा पाहुणा’, पाहा क्युट फोटो

‘तलाक’च्या घोषणेनंतर पुन्हा एकत्र दिसले आमिर-किरण, ‘लाल सिंह चड्ढा’च्या सेटवरचा स्मायलिंग फोटो चर्चेत!

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.