Haryanvi Dance Song: ‘बिजली’ बनून स्टेजवर घातला धुमाकूळ, गोरी नागौरीचा हाय वोल्टेज हरयाणवी डान्स पाहिलात का?

इंटरनेटवर हरियाणवी नृत्याची (Haryanvi Dance Song) क्रेझ झपाट्याने वाढत आहे. हरियाणा आणि त्याच्या सीमावर्ती भागात अशा नृत्य सादरीकरणाला खूप मागणी आहे. यातील नर्तक खेड्यांमध्ये आणि शहरांमध्ये त्यांचे दमदार सादरीकरण करतात.

Haryanvi Dance Song: ‘बिजली’ बनून स्टेजवर घातला धुमाकूळ, गोरी नागौरीचा हाय वोल्टेज हरयाणवी डान्स पाहिलात का?
Gori Naguari
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 11:39 AM

मुंबई : इंटरनेटवर हरियाणवी नृत्याची (Haryanvi Dance Song) क्रेझ झपाट्याने वाढत आहे. हरियाणा आणि त्याच्या सीमावर्ती भागात अशा नृत्य सादरीकरणाला खूप मागणी आहे. यातील नर्तक खेड्यांमध्ये आणि शहरांमध्ये त्यांचे दमदार सादरीकरण करतात आणि या नर्तकांचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी अफाट गर्दी जमलेली असते. हरियाणवी नृत्यांगनांमध्ये गोरी नागौरीचीही (Gori Nagauri) क्रेझ सध्या खूप वेगाने वाढली आहे. गेल्या काही वर्षांत तिचे फॅन फॉलोईंग खूप वाढले आहे.

स्टेजवर नृत्याने लावली आग

लाल रंगाची लेहेंगा-चोळी परिधान केलेल्या गोरी नागौरीचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि चाहते तिच्या डान्सचे व्हिडीओ यूट्यूबवर खूप पाहतात. तिच्या अशाच एका डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. या व्हिडीओमध्ये, गोरी नागौरी ‘खुदा गवाह’ चित्रपटातील ‘तेरे इश्क में नाचेंगे’ या गाण्यावर लाल लेहंगा चोली परिधान करून नाचताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

गोरी नागौरी ‘उफ क्या रात आई है’ वर तिच्या जबरदस्त पॉवर आणि सुपर बोल्ड डान्स मूव्हसाठी देखील ओळखली जाते आणि या परफॉर्मन्स दरम्यान ती असेच काही करताना दिसली. गोरी नागौरीने तिच्या हाय व्होल्टेज परफॉर्मन्स दरम्यान भरपूर डान्स केला आणि तब्बल 50 हजार लोकांनी तिच्या नृत्याचा आनंद घेतला. गोरीचा हा डान्स ‘उफ क्या रात आय है’  सोशल मीडियावर जोरदार शेअर केला जात आहे.

सपना चौधरीला टक्कर देतेय गोरी

सपना चौधरी रुपेरी पडद्यावर पोहोचण्यापूर्वी तिने देखील अनेक वर्षांपासून गोरी नागौरी प्रमाणेच रंगमंचावर सादरीकरणही केले होते, पण तिची फॅन फॉलोइंग अशी वाढली की, ती आधी टीव्ही आणि नंतर रुपेरी पडद्यावर पोहोचली. गोरी नागौरीचे सतत वाढत जाणारे फॅन फॉलोइंग देखील अशाच भविष्याकडे निर्देश करते. परंतु, आता गोरी नागौरी देखील त्याच पातळीवर पोहचू शकतील की नाही, हे मात्र तिच्या चाहत्यांच्या हातात आहे.

लोकांना आवडते सपनाची देसी शैली

‘हरयाणवी क्वीन’ सपना चौधरी तिच्या देसी शैलीसाठी खूप प्रसिद्ध आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले सपनाचे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. तिच्या ‘घूम घाघरा’ ला आतापर्यंत 10 कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. केवळ हे गाणेच नाही, तर BTS अर्थात या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ देखील लोकांना आवडला आहे. या व्हिडीओमध्ये सपना चौधरी जमिनीवर बसून तिचा पल्लू हवेसोबत उडवत आहे. तिची हीच देसी शैली प्रेक्षकांना खूप आवडते.

‘घागरा’वर सपनाचे ठुमके

काही दिवसांपूर्वी सपनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक नवीन डान्स व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये सपना तिच्या घरात टीव्हीसमोर हरियाणवी गाणे ‘घागरा’वर पिवळ्या ड्रेसमध्ये डान्स करताना दिसली होती. या डान्स व्हिडीओला सपनाचे चाहते प्रचंड पसंती देत ​​आहेत आणि कमेंट करत आहेत. सपनाची लोकप्रियता अशी आहे की, तिच्या कोणत्याही गाण्यावर लगेचच कोट्यावधी व्यूव्ह मिळतात.

हेही वाचा :

Shaheer Sheikh | ‘पवित्र रिश्ता 2.0’मधील नव्या ‘मानव’च्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव!

Birthday Special : तेरा ही जलवा… सुरभी चंदना छोट्या पडद्यावरील सर्वात हॉट अभिनेत्री; बिकिनी फोटोंमुळे सोशल मीडियात धुमाकूळ

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.