उषा मंगेशकरांचं भोजपूरी गाणं ऐकलात का? ऐन नवरात्रोत्सवात बिहारमध्ये धूमाकुळ
देवी शक्तीच्या उपासनेचा उत्सव दुर्गा पूजा आजपासून सुरू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भोजपुरी भाषेतील देवीची गाणी यूट्यूबवर एकामागून एक रिलीज होत आहेत. शक्तीच्या उपासनेच्या या उत्सवात दुर्गापूजा पंडालमध्ये भक्त देवीच्या गाण्यांवर ठेका धरत आहेत.
मुंबई : देवी शक्तीच्या उपासनेचा उत्सव दुर्गा पूजा आजपासून सुरू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भोजपुरी भाषेतील देवीची गाणी यूट्यूबवर एकामागून एक रिलीज होत आहेत. शक्तीच्या उपासनेच्या या उत्सवात दुर्गापूजा पंडालमध्ये भक्त देवीच्या गाण्यांवर ठेका धरत आहेत. या सगळ्या दरम्यान, बॉलिवूडमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या मंगेशकर घराण्याची लेक उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांनी भोजपुरीमध्ये त्यांच्या आवाजात मातेचे गाणे गायले आहे, जे रिलीज होताच व्हायरल झाले आहे.
उषा मंगेशकर या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या धाकटी बहीण आहेत आणि ‘जय संतोषी माँ’ या हिंदी चित्रपटात त्यांनी गायलेली बरीच गाणी तुम्ही ऐकली असतील.
लाईक्सच पाऊस!
उषा मंगेशकर यांच्या आवाजात ‘अपनी ममता की छैया’ या देवीच्या गाण्याचा व्हिडीओ आज रिलीज करण्यात आला आहे. या गाण्याचा व्हिडीओ माँ अम्मा फिल्म्सच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हे गाणे आतापर्यंत 45,603 पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे, तर त्याला 2 हजारांहून अधिक लाईक्स देखील मिळाले आहेत.
पाहा व्हिडीओ :
उषा मंगेशकर यांचे हे नवे नवरात्री स्पेशल देवी गीत यूट्यूबवर खूप व्हायरल होत आहे. या गाण्याने काही तासांमध्ये व्ह्यूजची नोंद केली आहे. भोजपुरी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री नीलम गिरी या देवी गाण्याच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. नीलम गिरी याआधीही अनेक व्हिडीओमध्ये दिसल्या आहेत. या व्हिडिओमध्ये नीलम गिरी यांनी पांढरी साडी घातली आहे, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे. या गाण्यात, देवीला आपल्या मायेची सावली भक्तांवर कायम ठेवण्याची विनंती केली जात आहे.
यूट्यूबवर गाण्याचा धुमाकूळ!
‘अपनी ममता की छैया’ हे जय माता दी अल्बममधील गाणे आहे. या गाण्याचे बोल सतीश तिवारी यांनी लिहिले आहेत. तर त्याचे संगीत संदीप डांगे यांनी दिले आहे. त्याचबरोबर हे गाणे भारद्वाज फिल्म्सच्या दिग्दर्शनाखाली बनवण्यात आले आहे. या गाण्यातील उषा मंगेशकर यांचा आवाज अतिशय मधुर आहे आणि या गाण्याचे बोलही अतिशय मधुर आहेत. लोक हे गाणे यूट्यूबवर सतत पहिले जात आहे.
नवरात्रीची महात्म्य
शक्ती स्वरुप दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा करण्याचे दिवस म्हणजेच नवरात्रीचा (Shardiya Navratri 2021) महाउत्सव आजपासून (7 ऑक्टोबर) सुरु झाला आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या दुर्गा पूजेचा हा नऊ दिवसांचा सण शारदीय नवरात्र म्हणून ओळखला जातो. हा सण देशाच्या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. या दिवसांमध्ये देवी दुर्गाच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. यासाठी घटस्थापना केली जाते आणि अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. यावेळी शारदीय नवरात्र 7 ऑक्टोबर रोजी गुरुवारपासून सुरु होणार आहे आणि 15 ऑक्टोबर रोजी संपेल.
हेही वाचा :
Video | आर्यन खान आणि शाहरुख खानची गळाभेट झाली? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य…
Madalsa Sharma : मिथुन चक्रवर्तीची सून मदलसा शर्मा सुद्धा झाली कास्टिंग काउचची शिकार, म्हणाली…